या पदार्थाने कपाळावर मसाज करा, चष्मा काढून फेका – डॉ स्वागत तोडकर उपाय….

नमस्कार मित्रांनो, या पदार्थाने कपाळावर मसाज करा आणि कायमचा चष्मा काढून टाका. आज काल आपण बघतो की बऱ्याच स्त्रियांना चष्मा लागलेला असतो. त्याचबरोबर डोकेदुखीचा त्रास , डोळे दुखी चे देखील प्रमाण वाढत चालले आहे. याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे आपली संस्कृती लोप पावत चालली आहे.

पूर्वीच्या स्त्रिया कपाळाला कुंकू लावत असत. व कुंकू टिकून राहण्यासाठी मेणाने अर्धा ते एक मिनिट मसाज करत असत. आणि या मसाजमुळे त्यांचे चित्त शांत राहत असे. व शांत स्वभाव, संस्कारी वृत्ती देखील यामुळे उत्पन्न होत असे. तसेच स्त्रियांचा चिडचिडेपणा देखील आपोआपच कमी होत असे. स्मरणशक्ती वाढण्यासाठी देखील याचा उपयोग होत असे.

परंतु आजकालच्या फॅशनमुळे ही संस्कृती लोप पावत चालली आहे. एवढे मोठे कुंकू लावणे म्हणजे काहीतरी वेगळे केल्यासारखे आज-काल वाटते. परंतु यामुळे चष्मा लागणे, डोके दुखणे, डोळे दुखणे अशा समस्या निर्माण होत चालल्या आहेत. तसेच विसराळूपणाचे प्रमाण देखील वाढत चालले आहे. त्यासाठी तुम्हाला आज एक पर्याय सांगणार आहोत.

आपल्याला सर्वप्रथम देशी गाईचे तूप लागणार आहे. रोज सकाळी शुद्ध गाईचे तूप घ्या आणि कपाळावर गोलाकार मसाज करा. हे मसाज एक मिनिट करायचे आहे. परंतु न चुकता हे रोज मसाज करत चला. यामुळे तुमचा चष्मा निघून जाईल, डोकेदुखीचा त्रास कमी होईल.

हे जर स्त्रियांना करायचे असेल तर गोलाकार मसाज करायचे आहे आणि पुरुषांना करायचे असेल तर आपण ज्याप्रमाणे टीका लावतो त्याप्रमाणे तीन वेळा करायचे आहे. जर असे केले तर पुरुषांचा देखील चष्मा निघून जाण्यास शंभर टक्के मदत होणार आहे आणि गोलाकार मसाज केल्यामुळे स्त्रियांची स्मरणशक्ती वाढणार आहे.

असे केल्याने स्त्रियांची व पुरुषांची डोकेदुखी व डोळ्यांचा त्रास पूर्णपणे कमी होणार आहे. ही माहिती आपल्या मित्रमैत्रीणी पर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *