पुजा करतांना असे घडले तर समजा साक्षात देव तुमच्या सोबत आहे !

हिंदू धर्मात भगवंतांचे पूजन देवपूजा करताना फार महत्त्व आहे. असे म्हणतात की श्रद्धापूर्वक आपण भगवंतांचे पूजन केले तर आपल्यावर भगवंतांची कृपा नक्कीच होते. कधीकधी पूजा करताना आपल्याला काही संकेत मिळतात परंतु आपण त्या संकेतांकडे दुर्लक्ष करतो. आपण ते संकेत मानत नाही. आपल्या हे लक्षातच येत नाही की हे संकेत साक्षात भगवंतांनी दिले आहेत.

आपल्यावर भगवंतांची कृपा आहे, आपली पूजा भगवंतांनी स्वीकारली आहे. आज आपण त्याच संकेतांबद्दल जाणून घेणार आहोत. त्यातील पहिला संकेत म्हणजे आपण देवपूजा करताना धूप किंवा अगरबत्ती लावतो. देवपूजेदरम्यान जर त्यात अगरबत्ती किंवा धुपचा धूर संपूर्ण घरात पसरला व आपल्याला अचानक सकारात्मक व प्रसन्न वाटू लागले तर समजावे साक्षात भगवंत आपल्या घरात प्रकट झाले आहेत. लवकरच आपले भाग्य चमकणार आहे.

ही सकारात्मक ऊर्जा आपल्याला आपल्या आजूबाजूला असलेली जाणवते. अचानक घरातील वातावरण सुखद व प्रसन्न वाटू लागते. दुसरा संकेत म्हणजे आपण देवपूजा करत असताना किंवा देवपूजा झाल्यानंतर लगेचच आपल्या दारात भीक मागण्यासाठी एखादा भिकारी किंवा एखादे लहान बालक जरी आले तर समजावे की आपल्या दारात साक्षात भगवंत आलेले आहेत. त्या भिकाऱ्याला तसेच परत जाऊ देऊ नये.

काहीना काही खाद्यपदार्थ त्यांना खायला द्यावे. दान केल्याने आपल्या धनात कधीच कमी येत नाही. तर त्यात वाढच होत राहते. पूजेदरम्यान भुकेल्या व्यक्तींना अन्न देणे हा भगवंतांना प्रसन्न करण्याचा खूप चांगला मार्ग आहे. पुढील संकेत म्हणजे आपण देवपूजा करीत असताना हात जोडून भगवंतांना प्रार्थना करीत असताना अचानक पणे दिव्याचा प्रकाश तेजस्वी झाला, दिव्याची ज्योत अचानकपणे वाढली तर समजावे भगवंत साक्षात आपल्या समोर आहेत व आपण जे काही प्रार्थना भगवंतांजवळ करीत आहोत ती प्रार्थना त्यांनी स्वीकारली आहे व त्यांचाच हा संकेत आहे त्यांनी आपल्याला दिलेला आहे.

अशावेळी आपण साक्षात भगवंत समोर असताना आपल्या जीवनातील ज्या काही अडीअडचणी असतील किंवा आपल्या ज्या काही इच्छा असतील त्या लगेचच भगवंतांना सांगून द्यायच्या आहेत. म्हणजे आपल्या अडीअडचणी व इच्छा अपेक्षा प्रत्यक्ष भागवंतांकडे पोहचतील व त्या लगेचच पूर्णही होतील. पुढील संकेत म्हणजे आपण देवपूजा करताना धूप किंवा अगरबत्ती लावतो.

त्या धुरात भगवंतांची प्रतिमा किंवा ओम, स्वस्तिक असे एखादे शुभचिन्ह तयार झालेले आपल्याला जर दिसले तर समजावे भगवंत आपल्या पूजनाने खूप प्रसन्न झाले आहेत व लवकरच आपल्या जीवनातील अडचणी व संकटे नष्ट होणार आहेत. हिंदू धर्मात अतिथींना देवाचे रूप मानले जाते. आपण देवपूजा करीत आहोत आणि अशात मध्ये कोणीतरी पाहुणे आपल्या घरी आले तर समजावे साक्षात भगवंतानी आपल्या घरी प्रवेश केला आहे. हा भगवंताचा विशेष संकेत मानाला जातो.

परंतु आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचा चुकूनही अपमान करू नये. त्यांचे मन दुखवू नये. घरी आलेल्या पाहुण्यांचा योग्य प्रकारे आदर सत्कार करावा. पुढील संकेत म्हणजे आपण देवपूजा करताना भगवंतांना एखादे फुल अर्पण केले आणि ते पूजेदरम्यान आपल्या समोर पडले तर समजावे भगवंत आपल्या पूजनाने खूप प्रसन्न झाले आहेत व त्यांनी आशीर्वाद स्वरूप ते फुल आपल्याला दिले आहे.

या प्रकारे हा संकेत मिळतो की भगवंतांच्या कृपेमुळे आपल्या जीवनातील सर्व अडचणी नष्ट होतील व भगवंतांच्या आशीर्वादामुळे आपल्या सर्व इच्छा व मनोकामना पूर्ण होतील. मित्रांनो हे आहेत ते संकेत जे देवपूजेदरम्यान आपल्याला मिळतात व त्याद्वारे आपल्याला आपल्या आसपास भगवंतांच्या उपस्थितीची जाणीव होते. धन्यवाद..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *