रात्री झोपताना २ लवंगा खाऊन पाणी प्यायल्यामुळे मूळापासून नाहीसे होतील हे आजार….

लवंगेचा वापर: आपल्या सगळ्यांना माहीत आहे की लवंगेचा उपयोग जेवणात गरम मसाल्यात केला जातो. गरम मसाल्यात लवंग मिसळल्यामुळे त्याचा स्वाद वाढतो. जखमेसाठी एंटीसेप्टिक म्हणून खूप वर्षांपासून लवंगाच्या तेलाचा वापर केला जातो. लवंगमध्ये युजेनॉल असते जे सायनस तसेच दातदुखी सारख्या आजारांवर रामबाण उपाय आहे. लवंगेचा प्रभाव हा गरम आहे, म्हणून लवंग सर्दी आणि थंडीत खूप फायदेशीर आहे.

आपले आरोग्य निरोगी व तंदुरुस्त ठेवू शकेल असे अनेक गुणधर्म लवंगामध्ये आहेत. लवंगेत भरपूर प्रमाणात पोटॅशियम, आर्यन,
विटामीन, मैग्ंनेशियम, सोडीयम, आणि फायबर असतात. ज्यामुळे शरीराचा विकास होतो आणि रोग प्रतिकार क्षमता वाढते. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की रात्री झोपताना पाण्याबरोबर लवंग सेवन केल्यामुळे काय काय फायदे होतात. चला तर मग जाणून घेऊया:

पचन तंत्र: एक ग्लास पाण्यामध्ये हलक्या गरम पाण्याबरोबर झोपताना जर २ लवंगांचे सेवन केले तर शरीराचे पचनतंत्र मजबूत होते आणि पोटाच्या समस्या दूर होतात. कारण की लवंगेमध्ये फायबर आणि अन्य पोषक तत्व भरपूर प्रमाणात असतात.

बद्धकोष्टता: जर तुम्हाला सुद्धा बद्धकोष्टता या समस्येपासून सुटका करून घ्यायची असेल, तर तुम्ही रात्री झोपताना गरम पाण्याबरोबर २ लवंगांचे सेवन जरूर करा. त्यामुळे तुमचे अनेक आजार दूर होतील. तसेच तुमची आजाराबरोबर लढण्याची प्रतिकारशक्ति वाढेल.

गुडघेदुखी: गुडघेदुखीने पीडित व्यक्तीने याचा उपयोग जरूर केला पाहिजे त्यामुळे त्या व्यक्तिला खूप लवकर गुडघ्याच्या वेदनांपासून आराम मिळेल. भोजन स्वाद वाढवते: लवंग भोजनाचा स्वाद तर वाढवतेच त्याचबरोबर आपल्या शरीराला कितीतरी आजारांपासून वाचवते व आपल्याला तंदुरुस्त ठेवते.

पोटाच्या दुखण्याव्यतिरिक्त लवंग हे डोकेदुखी बरे करण्यास अतिशय चांगले औषध आहे. म्हणून जेव्हा जेव्हा तुम्हाला डोकेदुखी होते तेव्हा पेन किलरच्या ऐवजी तुम्ही एक किंवा दोन लवंगा कोमट पाण्यासोबत घ्या, तुम्हाला काही वेळात फरक जाणवेल व आराम मिळेल.

ऋतुबदल: जेव्हा जेव्हा हवामानात बदल होतो किंवा ऋतु बदलतो, तेव्हा आपल्याला घशात खवखव जाणवते. त्याचप्रमाणे,आपण बाहेरून काही जंक फूड सेवन केले असेल, तर त्यातील तेलकट, किंवा चाईनीज सॉस मुळे आपल्या घशात खवखव किंवा घसा दुखणे हे जाणवते. अशावेळी, जर लवंग तोंडामध्ये फिरवत राहिले किंवा जिभेवर ठेवली, तर घश्यात दुखणे किंवा वेदना या दोन्ही गोष्टींमध्ये आराम मिळतो.

खोकला व श्वास दुर्गंधी: खोकला आणि श्वासाच्या दुर्गंधांवर रामबाण उपाय आहे लवंग. नियमितपणे लवंगेचा वापर केल्यास आपण या त्रासातून मुक्त होऊ शकतो. आपण आपल्या जेवणात त्याचा वापर करा,किंवा बडीशोपबरोबर लवंग सेवन करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published.