प्रतिकारशक्तीसाठी गुळवेलाचा वापर, या तीन लोकानी गुळवेल घेऊ नये…

नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचे स्वागत आहे. 2020 या वर्षामध्ये एका आयुर्वेदिक वनस्पतीची प्रचंड प्रमाणामध्ये मागणी वाढली आणि त्याचा वापर सुद्धा लोक करू लागलेत. ती वनस्पती म्हणजे गुळवेल. याला संस्कृतमध्ये गडूची आणि हिंदीमध्ये गिलोय असे म्हणतात. या वनस्पतीची मागणी एवढी प्रमाणामध्ये का वाढली? ही वनस्पती खरंच सर्वांना वापरता येते का? तर निश्चित नाही.

असे सर्वसामान्य आजार आहेत जे जास्तीत जास्त लोकांमध्ये आढळतात अशा व्यक्तींनी ही गुळवेल वापरायची नसते. असे कोणते तीन आजार आहेत, त्याचबरोबर ही गुळवेल ताजी असेल तर कशी वापरावी? या वनस्पतीची गोळी असेल तर याचा वापर कसा करावा? या वनस्पतीचे चूर्ण असेल तर त्याचा वापर कसा करावा? किंवा या वनस्पतीचे लिक्विड म्हणजे या वनस्पतीचा गुळवेल ज्युस असेल तर त्याचा वापर कसा करावा?

असे एक ना अनेक प्रश्न लोकांच्या मनामध्ये आहेत म्हणून आज आपण या गुळवेलाची संपूर्ण माहिती पाहणार आहे. कारण हे अत्यंत महत्त्वाचे आहे. चुकीचे पद्धतीने किंवा चुकीच्या वेळेला गुळवेलाचा वापर करणे हे आरोग्यासाठी घातकसुद्धा असू शकते. गुळवेल ही आयुर्वेदातली अत्यंत महत्वाची वनस्पती आहे. या वनस्पतीने शरीरातील पांढऱ्या पेशींची संख्या वाढते. पांढऱ्या पेशी या शरीरातील सैनिकी पेशी असतात.

ज्या शरीरामधील झालेलं संक्रमण किंवा व्हायरल इन्फेक्शन असेल त्याला मारण्याचे काम करतात. म्हणून गुळवेलाने प्रतिकारशक्ती वाढते. म्हणून वृद्ध किंवा लहान मुलांमध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी गुळवेलाचा वापर करा असं सांगितलं जातं. म्हणून गुळवेलाचा वापर सर्वजण करत आहेत. तर ही गुळवेल काय आहे? तर ही एक वेलवर्गीय वनस्पती आहे. जी साधारणतः आंबा किंवा कडुलिंबाच्या झाडावर वाढते.

परंतु आंब्याच्या झाडावर वाढणाऱ्या वनस्पतीचे गुणधर्म हे वेगळे असतात आणि कडुलिंबाच्या वृक्षावर वाढणाऱ्या गुळवेलीचे गुणधर्म वेगळे असतात. आयुर्वेदामध्ये कडूलिंबावर वाढणारी जी गुळवेल आहे तिला सर्वश्रेष्ठ मानलं जातं आणि या वनस्पतीचा वापर हा आपल्याला करायला सांगितला जातो. या वनस्पतीचे गुणधर्म असे सांगितले आहेत की ही वनस्पती कफनाशक आहे, ऍलर्जी प्रतिबंधक आहे, वातनाशक आहे, सुजनाशक आहे. त्याचबरोबर ही वनस्पती मलेरिया प्रतिबंधक आहे आणि या वनस्पतीचा वापर करणाऱ्या व्यक्तीला मधुमेह होत नाही. यकृत संरक्षक ही वनस्पती आहे.

या वनस्पतीमध्ये अँटीऑक्सिडंट आहेत. रोगप्रतिकारशक्ती वर्दक आहे. असे अनेक आयुर्वेदिक गुणधर्म आहेत ज्यांचा वापर हा शरीरामधील वातकफ आणि पित्तदोष व्यवस्थित ठेवण्यासाठी केला जातो. म्हणून या वनस्पतीचा वापर करा असं जरी सांगितलं असलं तरी या वनस्पतीचा वापर कोणत्या व्यक्तीने करू नये हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. कोणते तीन आजार आहेत ते शेवटी पाहणार आहे. त्याआधी या वनस्पतीचा वापर कसा केला पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे ताजी गुळवेल असेल तर या वनस्पतीचा वापर कसा करावा हे ही खूप महत्त्वाचे आहे.

ताजी गुळवेलीचा वापर असा करायचा आहे की एक इंच तुकडा आपल्याला घ्यायचा आहे आणि डायरेक्ट चावून खायचा आहे. ताज्या वेलीचा वापर जर चावून खाऊन केला तर त्याचे आयुर्वेदिक गुणधर्म असतात ते अनेक पटीने चांगल्या रीतीने मिळतात. सकाळी उपाशीपोटी म्हणजेच अनुशापोटी तोंड न धुता सकाळच्या लाळेबरोबर जर चावून खाल्ला. तर सकाळची लाळ आणि गुळवेलाची आयुर्वेदिक गुणधर्म असा दुहेरी फायदा आपल्याला होतो आणि अनेक पटीने चांगले गुणधर्म आपल्याला मिळतात.

जर तुमच्याकडे वाळलेली वेळ असेल ही वाळवून देखील याचा वापर करू शकता किंवा बाजारातून याच चूर्ण आणलं असेल तर त्याचा वापर कसा करायचा आहे. तर चमचाभर चूर्ण आपल्याला घ्यायचं आहे किंवा एक इंच वाळलेला तुकडा आपल्याला घ्यायचा आहे. एक ग्लास पाण्यामध्ये रात्री झोपताना भिजत घालायचा आहे. रात्रभर त्या पाण्यामध्ये भिजू द्यायचं आहे आणि सकाळी उठल्याबरोबर त्याच पाण्यामध्ये ही एक इंच गुळवेल किंवा चूर्ण उकळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते थंड झाल्यानंतर त्याचा वापर करायचा आहे.

आता जर तुमच्याकडे गुळवेलाची गोळी असेल तर बाजारामध्ये गुळवेलाच्या गोळ्या सुद्धा उपलब्ध झाल्या आहेत. तर ही गुळवेलाची गोळी याचा सुद्धा वापर तुम्ही करू शकता. याचा वापर असा करायचा आहे की वयानुरूप एक किंवा दोन गोळ्या घ्यायच्या आहेत. सकाळी उठल्याबरोबर उपाशीपोटी आणि त्यानंतर थोडस कोमट पाणी प्यायचं आहे. साधं पाणी न पिता कोमट पाणी प्यायचं आहे. अशापद्धतीने गुळवेलीच्या गोळीचा वापर करता येतो. आता जर तुमच्याकडे गुळवेलाच सत्व असेल तर त्याचा

वापर असा करायचा आहे की हरभऱ्याच्या डाळी एवढं गुळवेलाचा सत्व घ्यायचं आहे. एक कप दुधामध्ये टाकून ते घ्यायचं आहे. त्याचा वापर तसा करायचा आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की बाजारामध्ये बऱ्याच ठिकाणी गुळवेलाच ज्युस किंवा लिक्विड मधील सत्व आहे ते मिळते. तुम्हाला मी असं सांगेल की गुळवेलाच लिक्विड ज्युस अजिबात वापर करू नका. कारण त्यामध्ये प्रिझर्वेटीव्ह वापरलेले असतात. ज्यामुळे गुळवेलाच जे आयुर्वेदिक गुणधर्म आहेत ते पूर्णपणे नष्ट झालेले असतात.

कुठलाही सकारात्मक परिणाम आपल्याला मिळत नाही. गुळवेल शरीरामधील फक्त प्रतिकारशक्तीच वाढवत नाही तर अनेक प्रकारचे आजार त्यामध्ये जर तुम्हाला भूक लागत नसेल तर ताज्या गुळवेलाचा वापर करायचा. एक इंच तुकडा चावून खायचा. कडू लागतो सुरवातीला नंतर चावत चावत रस गेल्यानंतर तो गॉड लागायला सुरुवात होते. असे जर तुम्ही सहा ते सात दिवस केलं तर शरीरामधून तुमच्या पित्तप्रवर्ती पुर्णपणे नष्ट होते. भूक व्यवस्थित लागते. पचनक्रिया तुंकगी चांगली होते. जर तुम्हाला सर्दी किंवा ऍलर्जी असेल, सतत सर्दी होण्याची समस्या असेल तर तुम्ही गुळवेलाचा काढा घेतला पाहिजेल.

गुळवेलाचा काढा सर्दी किंवा अलर्जीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. ताज्या गुळवेलाचा वापर न करता किंवा गोळीचा वापर न करता गुळवेलाचा काढा कोमट असताना घेतला तर ऍलर्जी, सर्दीची समस्या पूर्णपणे नष्ट होते. आता प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कुठल्या पद्धतीचे गुळवेल घेता येतं तर प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही या चार पाच पद्धतीमधलं कुठल्याही पद्धतीचा गुळवेल घेऊ शकता. फक्त गुळवेलाचा ज्युस सोडून. बाकी सर्व पद्धतीचा गुळवेल तुम्ही वापरू शकता. ताप आल्यास किंवा तापेचा त्रास असेल किंवा तुमचे शरीर सतत गरम लागत असेल तर अशा वेळेलासुद्धा गुळवेलाचा काढाच घेतला पाहिजे.

मधुमेह असलेल्या व्यक्तींनी उठल्याबरोबर सकाळी ताज्या गुळवेलाचा तुकडा आपण एक इंच चावून खाल्ला पाहिजे एकवीस दिवसापर्यंत. शरीरामधील शुगरचे प्रमाण पुर्णपणे निघून जाते. यकृत संरक्षक असल्यामुळे इन्सुलिनची निर्मिती व्हायला लागते आणि त्यामुळे डायबेटीसचा जो त्रास आहे तो पुर्णपणे निघून जातो. आता अशा कोणत्या व्यक्ती आहेत त्यांना गुळवेलाचा वापर अजिबात करता येत नाही. हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. बऱ्याच जणांकडून यात चुका होतात आणि गुळवेलाचा सर्रास वापर केला जातो. ज्याचा त्यांच्या शरीरावर वाईट परिणाम होतो.

पहिली व्यक्ती जी सर्वसामान्य कॉमन आजार आहे जो बऱ्याच जणांमध्ये आढळतो. ज्यांचा बीपी लो होतो अशा व्यक्तींनी गुळवेलाच सेवन करू नये किंवा फार कमी प्रमाणामध्ये गुळवेलाच सेवन करावे. कारण गुळवेलामुळे बीपी आणखी लो होतो. हाय बीपी आहे अशा व्यक्ती याचा वापर करू शकतात. परंतु ज्यांना लो बीपीचा त्रास आहे त्यांनी गुळवेलाचा वापर करू नये किंवा अत्यंत कमी प्रमाणामध्ये करावा. दुसरी आणि अत्यंत महत्त्वाची व्यक्ती रुमेटाइट अर्थरायटीटचा आजार आहे अशा व्यक्तींनी गुळवेलाच सेवन करू नये.

यामुळे रुमेटाइट अर्थरायटीटचा त्रास जास्त प्रमाणात वाढतो. त्याचबरोबर ज्या प्रेग्नेंट महिला आहेत त्यांनीसुद्धा गुळवेलाच कमी प्रमाणात सेवन केलं पाहिजे. त्याचबरोबर आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे गुळवेलामुले प्रतिकारशक्ती वाढते. परंतु जास्त सुद्धा रोगप्रतिकारशक्ती वाढणे चांगलं नसते. जास्त रोगप्रतिकारशक्ती सुद्धा नुकसानदायक असते. त्यामुळं गुळवेलाच वापर कमी प्रमाणात केला पाहिजे आणि सांगितलेल्या दिवसाइतकाच केला पाहिजे.

रोज गुळवेलाचा वापर करणे हितकारक नसते. जास्तीत जास्त तुम्ही एकवीस दिवसापर्यंत गुळवेलाचा वापर करू शकता. त्यानंतर दहा ते अकरा दिवसांचा गॅप देणं अत्यंत महत्त्वाचे असते. गुळवेलाचा वापर हा सांगितलेल्या पद्धतीने आणि सांगितलेल्या व्यक्तीने जर टाळला तर गुळवेल ही आयुर्वेदामधल अमृत आहे. याचा वापर तुम्ही अवश्य करा. परंतु सांगितलेल्या पद्धतीने वापर करा. तुम्हाला याचे जबरदस्त फायदे मिळतील. तर गुळवेलाचा या पद्धतीने वापर करा. धन्यवाद…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *