एकदा प्या , सर्दी , खोकला , छातीतील कफ झटपट बाहेर फेका, खूप उपयोगी उपाय…

या वेळी कोव्हिड परत आपल्या आसपास आला आहे. खूप लोक आजारी पडत आहेत. अशावेळी आपल्याला काळजी घ्यायची आहे. घरातून बाहेर पडायचे नाही. जोपर्यंत खूप गरज पडत नाही तोपर्यंत घरातच राहा. आपल्याला स्वत:ची काळजी घेणे आवश्यक आहे. घरातच अन्न शिजवा, घरातलेच अन्न खा व घरातच स्वस्त व तंदुरुस्त राहा. पण इतकी सगळी काळजी घेऊन सुद्धा कधीतरी ऋतूच्या बदलांमुळे आपल्याला सर्दी किंवा खोकला होतो.

आपल्याला दुसरे कोणी काही बोलायच्या आधी आपणच घाबरून जातो. काय झाले? कोव्हिड तर नाही? अशा वेळी जर तुम्हाला वाटले की तुम्ही स्वस्थ आहात पण खोकला होतो आहे तर हा घरगुती उपाय मी घेऊन आले आहे.

घरातील वस्तु वापरुन ज्या तुमच्या स्वयंपाकघरात मिळतील. हा जलद उपाय तुम्हाला फायदेशीर होईल व लहान मोठे वृद्ध सगळ्यांसाठी उपयोगी आहे. हे कसे तयार करायचे आहे, ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे. तुम्ही लवंग आणि काळी मिरी पाऊडर बनवून ठेवा.

जेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा असेल, तेव्हा बाकीच्या वस्तु त्यात मिसळा. तुमच्या घशाला ठीक ठेवेल, तुमचा कफ कमी होईल असा हा उत्तम उपाय आहे.तर इथे मी आणले आहेत स्वयंपाकघरातील काही पदार्थ. तुम्हाला इथे जे दिसते आहे ते आहे, आले, सैधव मीठ, थोडी हळद व मध व लवंग ,काळी मिरी पाऊडर. तुम्ही लवंग किंवा दालचीनी घेऊ शकता. २० दाणे काळ्या मिरीचे मी घेते आहे. ही घशासाठी रामबाण उपाय आहे. जेवढी काळी मिरी आहे त्याच्या अर्धी म्हणजे १० लवंगा घ्यायच्या आहेत.

पण लक्षात ठेवा, लवंग फूल असलेली घ्यायची आहे. मंद गॅसवर हे दोन्ही शेकायचे आहे. नंतर त्याची पाऊडर करायची आहे. त्याच गरम पॅन मध्ये आले तुकडा टाका. मध देशी वापरा. आले धुवून किसून ठेवा. नंतर ते पातळ कपड्यावर टाकून त्याचा रस काढा. मी हे एका मोठ्या माणसासाठी बनवीत आहे. आता ४ चुटकी पाऊडर, आले रस, मध व सैधव मीठ टाका.

आता हळद टाका जी अॅंटी-बायओटीक आहे. हे सकाळी रिकाम्या पोटी घ्या किंवा रात्री झोपताना घेऊ शकता. रिकाम्या पोटी घेतल्यावर अर्धा तास काही सेवन करू नका. यापेक्षा कमी प्रमाणात लहान मुलांना द्यायचे आहे. सर्व पदार्थ गरम असल्यामुळे काळजीपूर्वक मुलांना द्या. अगदी लहान मुलांना मात्र डॉक्टरचा सल्ला घ्या. हा पूर्णत: घरगुती उपाय आहे. तुम्ही करून बघा. विडियो आवडला असेल तर लाइक व शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *