३ दिवस रिकाम्या पोटी गुळवेलचे सेवन करा मूळापासून नष्ट होतील हे २० आजार…

मित्रांनो, स्वागत आहे. मी आज तुमच्यासाठी एकदम नवीन माहिती घेऊन आले आहे. चला तर मग बघूया. मित्रांनो, जर तुम्ही या प्रकारे गुळवेलीचे सेवन कराल, तर २० आजारांपासून तुम्ही स्वत:ला वाचवू शकाल. तुम्हाला माहीत नसेल की गुळवेलीचे किती फायदे आहेत. वात, पित्त, कफ या तिन्ही आजारांमध्ये गुळवेलीचा उपयोग केला जातो.

तुम्ही गुळवेलीचा रस प्या, त्याचा काढा प्या, किंवा गुळवेलीची पाऊडर गरम पाण्यामध्ये मिसळून प्या. कोणत्याही वयाची व्यक्ति गुळवेलीचा रस किंवा काढा घेऊ शकते. सांधेदुखी, हाडांचे दुखणे यापासून गुळवेलीचा रस आपल्याला आराम देतो. तसेच आपल्या चेहर्‍यावर जे फोड, मुरूमे येतात खासकरून मुलींना जी मुरुमांची समस्या असते, ती खूप प्रमाणात दूर होते गुळवेलीचा रस घेतल्यामुळे. सर्दी, खोकला, ताप यापासून आराम देतो गुळवेलीचा रस. तर मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे,

गुळवेलीचा वेल खूपच सहजतेने लावता येतो. मी पण एक छोटी फांदी माझ्या टेरेसवर लावली होती. पावसाच्या दिवसात ही लावली तर चांगली वाढते. कुठेही तुम्हाला याची वेल मिळू शकते. पावसात ठिकठिकाणी ही उगवते. ही बघा मी फक्त २० दिवसांपूर्वी ही लावली होती, त्याला आता चांगली पाने आली आहेत. त्याला १० ते १५ नवीन पाने आली आहेत. याची वाढ इतकी झटपट होते की १० ते १५ दिवसात ही वाढते.

त्याला मी थोडे खत पण घातले आहे, त्यामुळे ती चांगली वाढली आहे. आपल्याला गुळवेलीच्या फांदीचे काम आहे, पानांचे काही काम नाही. फुलांचे काम नाही. याच्या फांदीमध्ये जास्त ताकद असते. खूप आजारांपासून हे आपल्याला वाचवते. आयुर्वेदात याचे खूपच महत्व आहे. आयुर्वेदात याला अमृत मानले गेले आहे. म्हणूनच याचे दुसरे नाव आहे “अमृता”. तुम्ही पण तुमच्या घरी ही वेल लावू शकता.

ह्या दांडया अशा प्रकारे तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत. ५ ते ६ दांडया मी काढल्या आहेत. तुम्ही याचा काढा बनवा किंवा मिक्सर मध्ये टाकून रस बनवा. वाढणारा जंतुसंसर्ग बघून आपण हा रस जरूर घेतला पाहिजे. कितीही जास्त ताप आलेला असेल, तर हा रस पिऊन आराम पडतो. गुळवेलीचा रस आपल्याला यूरिन इन्फेकशन पासून वाचवतो., हृदयासंबंधी जे आजार आहेत, मधुमेही लोकांनी सकाळ संध्याकाळ हा रस घेतला पाहिजे.

३ ते ४ इंच लांब तुकडे घ्या, ते खलबत्यात कुठून घ्या. साले काढून घ्या. १ ग्लास गरम पाण्यात हे तुकडे टाकून ४ ते ५ मिनिटे उकळायचे आहेत. काळी मिरी तुम्ही त्यात टाकू शकता. काळी मिरी आपली रोगप्रतिकार शक्ति वाढवते म्हणून ते पाऊडर करून घाला. गुळवेलीचा रस घेतल्याने आपली स्मरणशक्ती वाढते.

कोणत्याही वयाची व्यक्ति हा घेऊ शकतो. हे हेल्थ टॉनिक आहे. आता हे पाणी उकळले आहे. ते गाळून घ्या. याचा खर्च पण फार नाही. दालचीनी पण तुम्ही टाकू शकता. मंद गॅसवर ७ ते ८ मिनिटे ठेवा म्हणजे रस त्यात उतरेल. अर्धा कप रोज घेऊ शकता. खूपच फायदेशीर आहे. तुम्ही प्रयोग करून बघा.

Leave a Reply

Your email address will not be published.