भगवान श्री कृष्ण म्हणतात घरातील या ५ गोष्टी दुसऱ्याला दिल्याने घरात येते भयंकर गरिबी….

नमस्कार, मित्रांनो तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, भगवान श्रीकृष्णाच्या अनुसार मनुष्याने आपल्या घरातील या ५ वस्तु चुकूनही दुसर्‍या कोणाला उधार किंवा भेट म्हणून देऊ नयेत. ह्या वस्तूंबरोबर घरातून लक्ष्मी माता निघून जाते. मित्रांनो, आपल्याला लहानपणापासून असे शिकवले गेले आहे, की दुसर्‍यांची मदत केल्यामुळे, दुसर्‍याना दान दिल्यामुळे मनुष्याला पुण्य प्राप्त होते.

भगवान श्रीकृष्णाच्या म्हणण्याप्रमाणे जो मनुष्य चांगले कर्म करतो त्यांना त्याचे चांगले फळ मिळते. परंतु, काही वस्तु अशा असतात, जो तुम्हाला चुकूनही दुसर्‍याना देऊ नयेत, कारण त्यामुळे तुमच्या घरातील सुख-समृद्धि निघून जाते. कारण या वस्तूंबरोबर तुमच्या घराची शांति, सुख समृद्धि जोडली गेलेली असते. जर या वस्तु तुम्ही दुसर्‍याना देता, तर तुम्हाला दारिद्रयाचा सामना करावा लागू शकतो.

विष्णुपुराणात या वस्तूंचा उल्लेख केलेला आहे. या वस्तूंचा संबंध माता लक्ष्मीशी आहे व आपण सगळेच जाणतो की माता लक्ष्मीचे आपल्या जीवनात किती महत्व आहे. ज्या घरावर माता लक्ष्मीची कृपा असते, तिथे सदैव धन, वैभव, सुखशांतीचे आगमन होते. जर कोणत्याही कारणामुळे माता लक्ष्मी रुष्ट झाली, तर घरातील सुखसंपत्ति व वैभव नष्ट होते.

म्हणून तुम्ही हे लक्षात ठेवा, तुमच्या घरातील वस्तु ज्यांचा संबंध माता लक्ष्मीशी आहे, त्या दुसर्‍याना कधीही देऊ नका. जर तुमची इछा असेल, की माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहावी, तर या विडियोला लाइक आणि शेअर करा. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या वस्तु ज्या दुसर्‍याना कधीही देऊ नयेत.

सगळ्यात पहिली वस्तु आहे पत्नीचे दागिने- मित्रांनो, स्त्रियांची आभूषणे हे माता लक्ष्मीचे प्रतिक मानले जाते. सुंदर आभूषणांमुळे सुशोभित स्त्री माता लक्ष्मीच्या प्रतिबिंबप्रमाणे दिसते. म्हणून जेव्हा आपण दागिने खरेदी करतो, तेव्हा प्रथम माता लक्ष्मीच्या समोर ठेवून त्याची पुजा करतो नंतर ते वापरतो. घरातील स्त्री ही लक्ष्मीचे रूप मानले जाते. म्हणून तिचे दागिने कधीही कोणाला उधार किंवा दान करू नका. वापरायला देऊ नका. घरातील भाग्य त्याबरोबर निघून जाते. माता लक्ष्मी रुष्ट होते.

दुसरी वस्तु म्हणजे झाडू जो आपण साफसफाईसाठी वापरतो. नकारात्मक ऊर्जा आपल्या घरातून दूर करतो. झाडू माता लक्ष्मीचे प्रतिक मानला जातो. म्हणून झाडू कधीही कोणाला देऊ नका. दुसर्‍याच्या घरातील झाडूचा आपल्या घरात वापर करू नका. असे केल्यामुळे त्याच्या घरातील नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात येऊ शकते.

तिसरी वस्तु म्हणजे सूर्यास्तानंतर तांदूळ, नारळ, कणीक, दूध व मीठ अशा सफेद वस्तूंचे दान करू नका. म्हणून सूर्यास्तानंतर आपल्या घरातील या वस्तु दुसर्‍याना देऊ नका. या वस्तु दान केल्यामुळे तुमच्या घरातील सकारात्मक ऊर्जा नाहीशी होते. त्यांना बाजारातून खरेदी करून देऊ शकता.

चौथे म्हणजे माता लक्ष्मी आपल्या घरात सदैव विराजमान राहील असा प्रयत्न आपण केला पाहिजे. ज्या घरावर माता लक्ष्मीची कृपा असते, तिथे धनाची कमतरता कधीच पडत नाही. म्हणून आपल्या पत्नीकडे जर काही पैसे ठेवले असतील, तर ते कोणाला उधार देऊ नका. तर तुमच्या घरातून लक्ष्मी निघून जाईल. भविष्यात पैशाच्या तंगीचा सामना करावा लागेल.

पाचवे म्हणजे माता लक्ष्मी वैभव देणारी, सौभाग्य प्रदान करणारी व ममतेची देवी आहे, ती अन्नपूर्णा आहे. म्हणून अन्न ग्रहण करण्याच्या आधी माता अन्नपुर्णेला धन्यवाद दिले पाहिजेत. पाचवी वस्तु म्हणजे पोळपाट लाटणे व तवा. आपल्या घरातील पोळपाट लाटणे व तवा दुसर्‍याना कधी उधार देऊ नये. भाग्य त्याच्याबरोबर निघून जाते. आपल्या घरात दुर्भाग्य येऊ शकते. म्हणून या ५ वस्तु कोणाला उधार किंवा दान करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.