या महिलांनी तुळशीला कधीही जल अर्पण करू नये- देवी लक्ष्मी रागावते.

मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. अशा महिलांनी तुळशीची पुजा करू नये. तुळशीचे झाड प्रत्येक हिंदू घरात असते. प्राचीन ग्रंथांमध्ये तुळशीच्या झाडाचे महत्व सांगितले आहे. ही पृथ्वीवरील सर्व वनस्पतिमध्ये पवित्र आहे. तुळशीचे रोप कितीतरी प्रकारच्या आजारांचा नाश करणारे व सकारात्मक ऊर्जेचा संचार करणारे आहे. तुळशीचे रोप घरात असल्यामुळे सुख समृद्धि ऐश्वर्य याची प्राप्ती होते व घरातून रोग आणि आजार दूर राहातात.

म्हणूनच, प्राचीन ऋषिमुनि यांनी तुळशीची पुजा करण्याचे विधान केले आहे. रोज जर कोणी व्यक्ति तुळशीपत्र खात असेल, तर ती व्यक्ति कितीतरी प्रकारच्या रोगांपासून मुक्त राहाते. हे मनुष्याच्या स्वास्थ्याच्या दृष्टीकोणातून गुणकारी औषधी आहे. आजचे विज्ञान पण या गोष्टीला मानते. परंतु, शास्त्रांमध्ये तुळशीच्या रूपाशी निगडीत काही अशा मान्यता आहेत, जो तुळशीचे झाड लावताना लक्षात ठेवली पाहिजेत.

तुळशीचे रोप कोणत्याही बुधवारी लावू शकतो. तुळशीचे रोप लावण्यासाठी कार्तिक हा महिना सगळ्यात उत्तम आहे. कार्तिक महिन्यात तुळशीच्या झाडाची पुजा केल्यामुळे सगळ्या मनोकामना पूर्ण होतात. तुळशीचे झाड घरातील अंगणाच्या मध्यभागी लावले पाहिजे. आपल्या झोपण्याच्या खोलीच्या बाल्कनीमध्ये तुळशीचे झाड तुम्ही लावू शकता. सकाळी तुळशीच्या झाडाला पाणी घालून त्याची पुजा केली पाहिजे.

संध्याकाळी तुळशीच्या झाडात तुपाचा दिवा लावणे सगळ्यात उत्तम असते. त्यामुळे घरात सुख समृद्धि टिकून राहते. धार्मिक मान्यतेप्रमाणे तुळशीच्या बाबतीत काही विशेष नियम सांगितले गेले आहेत. जे लक्षात ठेवल्यामुळे वाईट नशीब पण उजळून निघते. तुळशीची पाने नेहमी सकाळी तोडली पाहिजेत. रविवारच्या दिवस तुळशीच्या झाडात दिवा लावू नये. भगवान विष्णु आणि त्यांच्या अवतारांना तुळशीपत्र जरूर अर्पित करा.

भगवान गणेश आणि माता दुर्गेला तुळशी कधीही वाहू नयेत. तुळशीची पाने कधीही शिळी होत नाहीत. म्हणून पूजेमध्ये तुळशीच्या पानांचा वापर करतात. चंद्रग्रहणाच्या वेळी अन्नामध्ये तुळशीची पाने ठेवली तर ग्रहणाचा त्या अन्नावर प्रभाव पडत नाही. चला तर जाणून घेऊया कोणत्या व्यक्तींनी तुळशीचे रोप किंवा झाड लावू नये व त्याची पुजा कोणत्या स्त्रिया करू शकत नाहीत.

तुळशीचे झाड बुधाचे प्रतिनिधित्व करते., जे भगवान कृष्णाचे एक स्वरूप मानले गेले आहे. भगवान कृष्णाला तुळशी सगळ्यात प्रिय आहे. भगवान कृष्णाला कोणताही प्रसाद चढवताना तुळशीशिवाय ठेवला जात नाही. ज्या परिवारातील लोक भगवान श्रीकृष्णाला मानतात, त्यांच्या घरात तुळशीचे रोप जरूर असले पाहिजे व त्यांनी तुळशीची पुजा अवश्य केली पाहिजे. त्यामुळे घरात सुख समृद्धि येते.

तुळशीला परम वैष्णव मानले गेले आहे. अर्थात हे भगवान विष्णूचे प्रिय झाड आहे. ज्याप्रमाणे भगवान विष्णूच्या पूजेत तामसी वस्तूंचा वापर केला जात नाही त्याचप्रमाणे तामसी क्रिया करणार्‍या लोकांनी आपल्या घरात तुळशीचे झाड लावू नये. ते अशुभ फळ देते. अर्थात ज्या घरात मास शिजवले व खाल्ले जाते, अशा घरात तुळशीचे रोप लावू नये. भगवान विष्णूच्या भक्तांसाठी मद्यपान वर्जित मानले गेले आहे.

ज्या घरातील लोक दा रू पितात किंवा ज्या घरात बसून लोक म द्य पा न करतात, त्या घरात तुळशीचे झाड लावू नये. त्या स्थानी तुळशी ठेवल्यामुळे लाभ ऐवजी हानी होते. जर तुम्ही या कठोर नियमांचे पालन केले नाही, तर घरात तुळशीचे रोप लावू नका. कधीही तुळशीचे रोप दक्षिण दिशेला ठेवू नये. कारण या दिशेकडे ठेवली गेलेली तुळशी नेहमी अशुभ फळ देते. तुळशीला नेहमी उत्तर दिशेकडे लावावे., जी बुधाची दिशा मानली जाते. तुळशी जमिनीत लावू नका. ती नेहमी कुंडीत लावावी.

जर कोणत्या स्त्रीची मासिक पाळी चालू असेल, तर तिने तुळशीची पुजा करू नये. जेव्हा दू:शासन द्रौपदीला वस्त्रहरणासाठी आणण्यासाठी गेला, तेव्हा असे म्हटले जाते की तिचा मासिक धर्म चालू होता, ती एकवस्त्रा होती व पवित्र स्थानी जात नव्हती. म्हणून मासिक धर्माच्या वेळी पवित्र स्थानी स्त्रियांनी जाऊ नये. चरित्रहीन स्त्रीने तुळशीची पुजा करू नये. दुष्ट स्त्रीने कपटी स्त्रीने तुळशीची पुजा करू नये. त्याचे अशुभ फळ मिळते.

Leave a Reply

Your email address will not be published.