फक्त 1 कफ रात्री झोपताना घ्या सकाळी सर्दी खोकला छातीत कफ गायब झालेला असेल…

आपण सगळेच जाणतो की आपल्याला आज प्रतिकारशक्तिची किती जरूर आहे. प्रतिकारशक्ति जर चांगली असेल, तर कोणतेही आजार आपल्याला स्पर्श करू शकत नाहीत. आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे असे जबरदस्त नैसर्गिक इम्युनिटी बूस्टर जे १०० टक्के सिद्ध झालेले, शक्तीशाली, पौष्टिक, हर्बल आणि आयुर्वेदिक जो घशाच्या वेदना, सर्दी, खोकला, किंवा कोणताही घशाचा त्रास दूर करेल. हा तुम्हाला वायरसशी लढण्याची जबरदस्त ताकद देईल.

हे एकदा बनवले, तर खूपच शक्तिशाली आहे, तुम्हाला बाजारात जाऊन खर्च करावा लागणार नाही. पूर्ण परिवारासाठी खूपच औषधी असे हे पेय आहे. हे तुम्हाला काढयाप्रमाणे प्यायचे नाही, तर चहा, कॉफी सारखे पिऊ शकता. तुम्हाला हे पेय आजारांपासून दूर ठेवेल. आताच्या ह्या महामारीच्या काळात मला असे वाटते की हे पेय तुमच्याबरोबर मी जरूर शेअर केले पाहिजे. चला तर मग सुरू करूया.

शक्तिशाली इम्युनिटी बूस्टर आयुर्वेदिक पेय बनविण्यासाठी आपल्या स्वयंपाकघरातच आपल्या शरीराच्या तंदुरुस्तीचा खजाना लपलेला असतो. फक्त त्याचे योग्य प्रमाण व काय सामान घ्यायचे ते माहीत असले पाहिजे. सगळ्यात प्रथम आपण पॅनमध्ये घेऊया ६ मोठे चमचे अक्खे धणे. गॅसची ज्योत मंद ठेवायची आहे. त्यात आता ४ मोठे चमचेजिरे घालायचे आहे.

ह्या वस्तु प्रकृतीने गरम असल्यामुळे आपण घेणार आहोत २ मोठे चमचे बडीशेप. सगळ्यामध्ये अॅंटी-ओकसिडेंट मोठ्या प्रमाणात असतात. त्याचबरोबर त्यांच्यात असते अॅंटी-व्हायरल गुणधर्म. नंतर त्यात घेऊया ४ ते ५ वेलची. नंतर त्यात २ काड्या दालचिनी जी घशासाठी खूपच फायदेशीर आहे. लहानपणापासून आपल्याला संगितले जाते की घसा खराब असेल तर दालचिनीचा चहा प्यायला पाहिजे. ही मधुमेहासाठी खूपच फायदेशीर आहे.

नंतर त्यात ८ ते १० लवंग घालायच्या आहेत. नंतर १ मोठा चमचा काळी मिरी. ह्या वस्तु अशा आहेत ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात विटामीन सी, अॅंटी-ओकसिडेंट व त्यांच्या तेलामध्ये अॅंटी-व्हायरल गुणधर्म असतात., जी आपल्याला थंडी, खोकला, सर्दी यापासून वाचवते. तसेच शरीराची रोगांशी लढण्याची शक्ति वाढवते. हे आयुर्वेदीक मिक्स १०० टक्के खात्रीशीर व फायदेशीर आहे. हे जरूर बनवून ठेवा. आता मी त्यात घालते आहे, १ चमचा मेथी दाणे.

आता ३ मिनिटे ह्या सर्व वस्तु हलक्या भाजायच्या आहेत. कच्चेपणा निघून जाईल. माझा विडियो आवडला असेल, तर लाइक, शेअर करायला विसरू नका. कधीतरी आपण प्रमाण जाणून घेत नाही काढे बनवतो. जेव्हा तुम्हाला योग्य पद्धत कळेल, तर त्याचा फायदा जबरदस्त मिळेल. आताच्या कालावधीत सुरक्षित राहाणे खूपच गरजेचे आहे. आता हे मिश्रण थंड होऊ द्या.

नंतर मिक्सरवर याची चांगली पाऊडर तयार करा. नंतर यामध्ये टाकणार आहोत अशा २ वस्तु ज्या खूपच फायदेशीर आहेत. ते म्हणजे हळदी, जी अॅंटी-बायोटीक गुणधर्माने परिपूर्ण आहे. हळद ही डोकेदुखी, घसा दुखणे, सर्दी, खोकला या सर्वांवर लगेच आराम देते. हळद आपल्याला १ छोटा चमचा घालायची आहे. दुसरी वस्तु घालायची आहे, १ चमचा सुंठ पाऊडर.

तुम्ही ही पाऊडर १ महिना साठवून ठेवू शकता एयर टाइट कंटेनर मध्ये. आता हे तुम्हाला कसे प्यायचे आहे ते बघा. तुम्ही हे २ प्रकारे घेऊ शकता सगळ्यात प्रथम गॅसवर दीड कप पाणी ठेवा. पाणी गरम व्हायाला लागले की १ चमचा गूळ घाला. नंतर त्यात १ छोटी चमचा आयुर्वेदिक पाऊडर जी आपण तयार केली आहे. नंतर हे पेय गाळून प्या. तुम्ही ही सकाळी किंवा संध्याकाळी कधीही घेऊ शकता. चहाच्या ऐवजी तुम्ही हे पेय पिऊ शकता. दुसर्‍या प्रकारे म्हणजे, कपात हे पेय घाला व त्यात गरम दूध घाला व चहाप्रमाणे हे पेय तुम्ही पिऊ शकता.

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.