केवळ ४ पपईच्या बिया खा, मग तुमच्याबरोबर जे होईल ते तुम्ही स्वत: बघा….

केवळ ४ पपईच्या बिया खा, मग तुमच्याबरोबर जे होईल ते तुम्ही स्वत: बघा. मित्रांनो, आज मी तुम्हाला एका अशा औषधाबद्दल सांगणार आहे कदाचित त्याबद्दल तुम्हाला जास्त माहिती नसेल. पपई आपल्या सगळ्यांच्या घरी आपण आणतो व आपण सगळेच पपई खातो. पपई खाल्ल्यानंतर आपण साधारण पपईच्या बिया कचर्‍याच्या डब्यात टाकतो, आपण त्या फेकून देतो. परंतु, तुम्हाला आश्चर्य वाटेल, की या ज्या पपईच्या बिया आहेत सोन्यापेक्षा जास्त महाग आहेत, कारण पपईच्या बिया आपल्याला कितीतरी आजारांपसून वाचवितात.

आज या माहितीमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे, की काही दिवस जर तुम्ही पपईच्या बिया खाल्ल्या, तर तुम्ही स्वत: समजून जाल की याचे किती फायदे आहेत. सगळी माहिती इथे मी शेअर करीत, की किती प्रमाणात या बिया सेवन करायच्या आहेत, कधी सेवन करायच्या आहेत. तसेच या बिया सेवन केल्यामुळे, तुम्ही कोणत्या आजारांपासून वाचू शकता ते पण सांगणार आहे.

मी इथे पपई घेतला आहे. नारिंगी रंगाचे दिसणारे हे फळ स्वादिष्ट आणि गुणकारी आहे. पपई फळ असुदे किंवा बिया किंवा पाने ती पण खूपच गुणकारी असतात. पानांचा रस जर तुम्ही सेवन केला, तर डेंगू, मलेरिया, चिकनगुनीया यासारख्या आजारांवर गुणकारी आहे. हा https://www.youtube.com/watch?v=fx-0eCMp15k विडियो मी शेअर केला आहे, की कशाप्रकारे याच्या पानांचा रस काढायचा आहे व किती प्रमाणात घ्यायचा आहे.

जेव्हा आपल्या शरीरात रक्ताची कमतरता होते, पांढर्‍या पेशी कमी होतात, तेव्हा हा रस उपयोगी आहे. हल्ली पपईमध्ये बिया कमी असतात. जेव्हा पण पपईच्या बिया निघतील तेव्हा फेकून देऊ नका. त्या बिया तुम्ही उन्हात चांगल्या वाळवून घ्या. नंतर त्याची पाऊडर बनवून ठेवू शकता. आपण गोळ्यांप्रमाणे पण या घेऊ शकतो.

कमीत कमी ३ ते ४ पपईच्या बिया तुम्हाला रोज खायच्या आहेत. दुधाबरोबर पण तुम्ही याचे सेवन करू शकता. पपई हे फळ पण किती गुणकारी आहे तुम्हाला माहीतच आहे. जे लोक आपले वजन कमी करू इछितात, त्यांनी पपईचे सेवन जरूर करावे. रोज अर्धा पपई ते सेवन करू शकतात. यामध्ये फैट नसतात, कॅलरी नसतात, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी उपयोगी आहे.

जसे हे फळ फायदेशीर आहे, त्यापेक्षा जास्त त्याच्या बिया गुणकारी आहेत. पोटाच्या वेदना असतील, घशात वेदना असतील, तर तुम्ही पपईच्या बिया मधाबरोबर घेऊ शकता. आपले पचन सुधारतात, कफ, गॅस, आंबट ढेकर यासारख्या त्रासापासून आपल्याला आराम देतात. ज्या लोकांच्या लिवरमध्ये कोणत्याही प्रकारचा जंतुसंसर्ग आहे, ज्यांना जेवण पचत नसेल, पोट भरल्यासारखे वाटत असेल, त्यांनी या बियांचे सेवन करावे. याचा कोणताही दुष्परिणाम नाही.

सोन्यापेक्षा मौल्यवान आहेत या पपईच्या बिया. तुम्ही काही दिवस ह्या सेवन करून बघा. ४ ते ५ दिवस याचे सेवन करा. कोणतेही फळ आपण नियमित तेच तेच खात नाही. सर्दी, खोकला तसेच कॅन्सर सारख्या गंभीर आजारापासून हा आपले रक्षण करतो. कॅन्सर पेशी वाढण्यापासून हा थांबवतो. पपईच्या बियांची पेस्ट जर चेहर्‍याला लावली, तर चेहर्‍यावरची मुरूमे, डाग नाहीसे होतात.

चेहरा तजेलदार दिसतो. कोणत्याही रूपात पपईच्या बिया तुम्ही घेऊ शकता. गर्भवती महिला व लहान मुले यांनी याचे सेवन करू नये. मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती आवडली तर कमेंट करून सांगा आणि लाईक व शेयर नक्की करा. अश्याच माहितीपूर्ण पोस्टसाठी आमचे पेज नक्कीच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *