हे १ फळ रोज खा, फुफ्फुसे स्वच्छ व निरोगी, ऑक्सीजन कमी होणारच नाही…

नमस्कार मंडळी, जीवन विकास या चॅनलवर आपले स्वागत आहे. आत्ताची प्रतिकूल परिस्थिती पाहता आपल्या शरीरातील म्हणजेच रक्तातील ऑक्सिजनची पातळी मेन्टेन ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. ऑक्सिजन कमी झाल्यानंतर अनेक व्याधी होतात, आपली प्रतिकारशक्ती कमी होते. आणि म्हणून आपल्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढली पाहिजे.याचा प्रमुख मार्ग म्हणजे ऑक्सिजन कमी झाल्यावर तो वाढवला पाहिजे.

तर सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही जिथे राहता तर वातावरण बघा. प्रदूषण विरहित वातावरण असेल तर अतिउत्तम. परंतु जर मात्र प्रदुषण असेल तर तुम्हाला बदलाव लागेल.तसेच दुसरा उपाय म्हणजे “पाणी”. पाण्याचे सूत्र तुम्हाला माहित आहे. H२O म्हणजेच यामध्ये ऑक्सिजन आहे. म्हणून तुम्ही शुद्ध व भरपूर पाणी प्या. मंडळी एक गोष्ट लक्ष्यात ठेवा, रक्तामधील ऑक्सिजन वाढवायचा असेल तर तुमच्या संपूर्ण आहारातील ८०% आहार अल्कलाईनयुक्त असावा.

काहीही समोर आलेले खाल्ल्याने दुष्परिणाम ही होऊ शकतात म्हणून काही अल्कलाईन रीच फूड देखील खाल्ले पाहिजे. हे अल्कलाईन रीच फूड शरीरातील ऑक्सिजन लेव्हल वाढवते.शरीरातील विविध कार्य सुरळीत पार पाडण्यास मदत करते. शारीरिक प्रोसेस उत्तेजित करते. प्रोसेसला मदत करते. आपल्या शरीराचा पीएच मेंटेन करते. आणि विविध अवयवांचे कार्य सुरळीत पार पाडते. यामुळे प्रतिकारशक्ती वाढते.

बाहेरील कोणत्याही विषाणूचा जंतू असेल तर त्याचा संसर्ग आपल्याला होत नाही. व्हिटॅमिन आणि मिनरल शोषून घेण्याची क्षमता वाढवते. म्हणून असा एक पदार्थ जो आज तुम्हाला सांगणार आहे तो पदार्थ म्हणजे “लिंबू”. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल की लिंबू हा ऑक्सिजन रिच कसा असू शकतो. लिंबू हा ऍसिडिक आहे पण लक्षात घ्या शरीराबाहेर लिंबू जरी ऍसिडिक असला तरी शरीरात गेल्यानंतर अल्कलाइन होतो.

इलेक्ट्रोलाईट प्रॉपर्टीज लिंबू मध्ये असतात. कफ, सर्दी, ताप आणि ऍसिडिटी पासून त्वरीत आराम देण्याचे काम हे करत असते. व्हायरल इन्फेक्शन पासून बचाव करण्याचे काम हे लिंबू करत असतात. लिंबामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऑक्सिजन शोषून घेण्याची क्षमता असते. ऑक्सिजन चे प्रमाण जास्त असल्यामुळे याला ऑक्सिजन रीच फ्रुट म्हटलं जात.

यामुळे आपल्या शरिरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. अल्कलाईन आणि ऑक्सिजन रिच असल्यामुळे हायपॉक्समिया किंवा ऑक्सिजन चे प्रमाण कमी असणे असे आजार होऊ देत नाहीत. फायबर, लोह, अँटी ऑक्सीडंट यांनी परिपुर्ण असलेली फळे आपण खाल्ली पाहिजेत. आपल्या रक्तामध्ये ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या पेशींच संरक्षण ही फळे करतात. आणि म्हणून लिंबू आपण आपल्या आहारामध्ये सदैव ठेवला पाहिजे.

रोज एक लिंबू आपल्या शरीरामध्ये गेला पाहिजे. त्यासाठी तुम्ही सरबत प्या किंवा पाण्यातून लिंबाचा रस घ्या. एक वेळेस किंवा दिवसातून दोन तीन वेळेस तुम्ही हा रस घेऊ शकता. मंडळी फक्त एक लक्षात घ्या हा पदार्थ सध्याच्या काळामध्ये महत्वाचा आहे. हे फळ आपण रोज खाल्ल पाहिजे. जैविक फळे आणि पालेभाजी नक्की खा. पण जंक फूड किंवा प्रक्रिया केलेला आहार घेणं टाळा. कारण यामध्ये अजिबात त्रान किंवा शक्ती नसते.

नैसर्गिक पदार्थ, आयुर्वेदिक पदार्थ आपल्या आहारात घ्या. यामध्ये खूप प्रमाणात शक्ती असते. तुम्हाला अस्थमा किंवा ॲनेमिया किंवा हृदयाच्या समस्या यामुळे होऊ शकतात. आपले शरीर डेटॉक्स म्हणजेच पुर्णपणे शुद्ध होणे फार गरजेचे असते. त्यासाठी लिंबू हा खूप गुणकारी आणि महत्वाचा मानला जातो.

सध्याच्या या धावपळीच्या जीवनशैली मध्ये लिंबू एवढे काम कोणताच पदार्थ करणार नाही. सहज उपलब्ध होणारा हा लिंबू लहान मुलापासून ते वयोवृध्द माणसांपर्यंत सर्वजण घेऊ शकतात. सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही माहिती गरजू व्यक्तींपर्यंत नक्की पोहचवा. तुम्ही ही या फळांचा समावेश आपल्या आहारामध्ये करा. आणि निरोगी व आनंदी जीवन जगा. धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *