सध्या हा काढा 1 वेळा तरी घ्यावा! फुफ्फुसे निरोगी राहतील, श्वसन नलिका साफ, ऑक्सीजन नेहमी 100 टक्के राहील…

मित्रांनो आज आपण खास माहिती म्हणजेच एक खास काढा घेऊन आलो आहोत. मित्रांनो संकट आणीबाणीच आहे आणि अशा परिस्थितीमध्ये स्वतःची, आपल्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे. बाहेर पडलं नाही पाहिजे मास्क वापरला पाहिजे, वेळोवेळी हात धुतले पाहिजेत. याचबरोबर काही आयुर्वेदिक उपाय येतात ते केले पाहिजे. आजचा देखील काढा देखील उपयुक्त आहे.

तुमच्या फुफ्फुसाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी त्याचबरोबर ऑक्सिजन लेव्हल चांगली राखण्यासाठी हा काढा अतिशय उपयुक्त आहे. मित्रांनो एका व्यक्तीसाठी काढा कसा बनवायचा तो पाहणार आहे. जर तुम्हाला प्रमाण वाढवायचं असेल तर वाढवू शकता. एक पातेलं घ्यायचं आहे. त्यात एक ग्लास पाणी घ्यायचं. ते पाणी उकळू द्यायचं. अर्धा ग्लास होईपर्यंत उकळू द्यायचं आहे.

त्याच्यामध्ये जे पदार्थ टाकलेत ते देखील उकळून आपण घेणार आहोत. पहिला पदार्थ म्हणजे जेष्ठमध. सहज तुम्हाला मेडिकलमध्ये उपलब्ध होईल किंवा आयुर्वेदिक दुकानांमध्ये उपलब्ध होईल. घसा खराब झाला असेल किंवा खोकला येत असेल तर जेष्ठमध आपण चगळण्यास सांगत असतो. मधाबरोबर घेतल्यास चांगला फरक पडतो. परंतु याशिवाय अनेक फायदे या जेष्ठमधामध्ये असतात.

चवीला गोड असणारे जेष्ठमध कॅल्शियम, अँटीऑक्सिडंट, अँटी बायोटिक तत्वांनी परिपूर्ण आहे. यामध्ये प्रथिने देखील असतात. जेष्ठमधाच्या वापराने डोळ्याशी निगडित विकार दूर होतात. तोंड येणं, घसा खराब होणं, दम लागणं, हृदयरोग, श्वसन घ्यायला त्रास होत असेल तर याचा काढा आपण पिला पाहिजे. वात, कफ, पित्त दूर करण्यासाठी सुद्धा या जेष्ठमध कांडीचा उपयोग होत असतो. याची पावडर करून घ्या किंवा रेडिमेड मेडिकलमध्ये सहज याची पावडर उपलब्ध होईल.

ही पावडर घरी घेऊन या आणि याचा काढा पित जा. म्हणजे श्वसनाचे तुमचे विकार निघून जातील. ऑक्सिजन लेव्हल उत्तम राहील. फुफ्फुस हे अगदी निरोगी राहण्यासाठी ही पावडर अतिशय उपयुक्त आहे. या पावडरचे प्रमाण लक्षात घ्या. एका वेळच्या उपायासाठी एका व्यक्तीसाठी एक चमचा घ्यायचा आहे. तुम्हाला प्रमाण वाढवायचे असेल तर तुम्ही जास्त चमचे टाकू शकता. यासाठी दुसरा पदार्थही अतिशय महत्वाचा आहे तो म्हणजे आले.

आलं हे मसाल्याचा पदार्थ म्हणून वापरलं जातं. तसेच स्वयंपाकामध्ये, भाजी मध्ये टाकत असतो. त्याचबरोबर चहामध्ये आपण आल्याचा उपयोग करतो. संसर्गजन्य रोगांना दूर ठेवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. कफ असेल, खोकला असेल, त्याचबरोबर सर्दी असेल तर यामध्ये याचा आपल्याला फायदा होत असतो. म्हणूनच वात, पित्त, कफ दूर करण्यासाठी आपल्या काढ्यामध्ये खोकला दूर करण्यासाठी आल्याचा वापर करत आहोत. एक चमचा एका व्यक्तीसाठी आलं खिसून टाकायचं आहे. खिसून टाकल्यामुळे याचा जास्त आर्क यामध्ये येणार आहे.

तिसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे लिंबू. लिंबूमध्ये सायट्रिक ऍसिड आहे. व्हिटॅमिन C तुमची प्रतिकारशक्ती साठी अतिशय उपयुक्त आहे. म्हणून आहारामध्ये, भाजीमध्ये लिंबू टाका. त्याचबरोबर त्याचा रस करून प्या. सरबत करून प्या. आपल्या काढ्यामध्ये अर्धा लिंबू एका व्यक्तीसाठी टाकणार आहोत. याने आपली प्रतिकारशक्ती चांगली होते. खोकला असेल, सर्दी असेल तर लवकर रिकव्हरी येण्यासाठी लिंबू उपयुक्त आहे.

चौथा पदार्थ ऍड करणार आहे तो म्हणजे गुळ. मित्रांनो गुळ प्रकृतीने शीतल असलेला वात, पित्त आणि कफ दोष दूर करणारा गुळ आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि काढ्यातली उष्णता वाढू नये यासाठी आपण गुळाचा वापर करत आहोत. ज्या लोकांना मधुमेह आहे त्यांनी मात्र गुळ टाकु नये. अशाप्रकारे चार पदार्थ टाकून आपला काढा तयार होईल.

फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा. याला अर्धा ग्लास होईपर्यंत उकळू द्या. सगळे जे पदार्थ आहेत त्यांचे आर्क यामध्ये आले पाहिजेत. दोन वेळेस हा काढा तुम्ही घ्या. सकाळी घ्या, सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी घेतला तर उत्तम आणि संध्याकाळी चहा जेव्हा पितो त्यावेळी काढा घेत चला. शरीरासाठी चहाऐवजी काढा घेणे चांगले आहे. धन्यवाद..

Leave a Reply

Your email address will not be published.