तुळशीचे रोपटे कधीही या दिशेला लावू नका, नाहीतर…

तुळशीच्या रोपट्याचे महत्व हिंदू धर्मात अनन्यसाधारण आहे. ही रोपटे देवी वृंदेच्या आत्म्यातून प्रकट झालेले आहे तसेच भगवान विष्णूचे हे सगळ्यात प्रिय असे रोपटे आहे आणि म्हणून प्राचीन काळापासून याचे महत्व सांगितले गेले आहे. हे एक औषधी रोपटे असून अनेक रोग बरे करण्याची अद्भुत शक्ती या रोपट्यात आहे, इतकेच नाही तर नकारात्मक उर्जेला दूर ठेवण्यातसुद्धा हे खूप प्रभावी आहे.

जर तुमच्या घरात हे रोपटे असेल तर नकारात्मक उर्जेला दूर ठेवण्याचे काम हे करेलच पण अनेक रोगांचा नाशसुद्धा करेल. हे रोपटे योग्य ठिकाणी आणि योग्य दिशेला लावले गेले जाईल याची मात्र खात्री करून घेणे आवश्यक आहे. असे झाले तर तुमच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुद्धा सुधारेल.

प्राचीन काळापासून ऋषीमुनी आपल्या आश्रमात हे रोपटे लावत आले आहेत आणि पूर्वीच्या काळात राजे महाराजेसुद्धा त्यांच्या अंगणात तुळशीचे रोप लावत असत. तुळशीच्या रोपाला रोज सकाळी पाणी घालण्याची प्रथा सुद्धा चालत आली आहे.

काही शास्त्रात तुळशीच्या रोपाचा उल्लेख महालक्ष्मीचे रूप म्हणूनही केला गेला आहे इतकेच नाही तर ज्या ठिकाणी तुळशीचे रोप लावलेले असते तिथे लक्ष्मीचा वास हा असतोच . हे रोपटे जर घरात लावले असेल तर आपले मनही प्रसन्न व शांत राहाते.

रोज तुळशीची पाच पाने चावून खाल्ली तर याने आजारांपासून आपले रक्षण होते इतकेच नाही तर तुमची आर्थिक उन्नतीसुद्धा होते. किंबहुना शास्त्रात असे काही दिवस सांगितले आहेत ज्या दिवसात तुळशीला पाणी घालायचे नसते. आज आम्ही तुम्हाला ह्या रोपट्याबाबत काही शास्त्रोक्त गोष्टी सांगणार आहोत.

दर रविवार , एकादशी , सूर्य आणि चंद्र ग्रहण या दिवसांत तुळशीला पाणी घालू नये. तसेच सूर्यास्तानंतर तुळशी ची पाने तोडणे निषिद्ध मानले गेले आहे. असे केल्याने वास्तू दोष लागतो. जे लोक दर गुरुवारी तुळशीच्या रोपट्यात कच्चे दूध घालतात तसेच रविवार सोडून इतर दिवशी तुळशीच्याजवळ दिवा लावून पूजा करतात त्यांना कधीही पैशांची कमी जाणवत नाही कारण महालक्ष्मीचा वास त्यांच्या घरी असतो.

नेहमी हे लक्षात ठेवा की तुळशीचे सुकलेले रोपटे कधीही घरात ठेवू नये. जर सुकलेले रोपटे असेल तर ते वाहत्या पाण्यात किंवा एखाद्या विहिरीत विसर्जित करावे आणि नवीन रोपटे लावावे. तुळशीचे रोपटे हे उत्तर पूर्व किंवा पूर्व दिशेला लावलेले कधीही चांगले.

यांमुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. याशिवाय उत्तर पूर्व दिशेलाही हे रोपटे लावलेले चांगले असते. वास्तुशास्त्र असे सांगते की दक्षिण दिशेला कधीही तुळस लावू नये. असे केल्याने नकारात्मक ऊर्जा तयार होते. योग्य पद्धतीने तुळस घरात लावल्यास तुमचे नशीब नक्कीच उजळून निघेल.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा Mahiti.in उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात. Mahiti.in कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका. धन्यवाद!.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *