कसलेही औषध न घेता भयंकर गुडघेदुखी, अवधना व पाय ठणकने बंद…

बऱ्याच व्यक्तींना गुढघेदुखीचा त्रास, सांधेदुखीचा त्रास, बऱ्याच व्यक्तींना पायाला लागले असेल किंवा पायाला जखम झाल्याच्या नंतर आपल्या जांगेमध्ये एक गाठ तयार होते. आपण त्याला अवधना म्हणतो. तुमच्याकडे वेगळा शब्द असेल तर समजून घ्या. जांगेमध्ये गाठ आल्यासारखी होते आणि खूप दुखते.

अशा या दोन्ही समस्येसाठी तसेच पाय ठणकने यासाठी आपण चमत्कारिक उपाय पाहणार आहोत. या उपायाने या समस्या एकदम कमी होतात. पाय दुखण्याची समस्या सर्वसाधारणपणे वजन वाढलेल्या व्यक्तींमध्ये जास्त पाहायला मिळते. तसेच काही व्यक्ती खूप कष्ट करतात.

अति कष्ट केलेल्या व्यक्तींनाही वय झाल्यानंतर शरीरातील कॅल्शियम कमी झाल्या कारणामुळे सांधेदुखी, गुडघेदुखीचा त्रास कालांतराने उद्भवतो आणि हाच झालेला त्रास कमी करण्यासाठी आजचा उपाय प्रत्येकाच्या घरी, आजूबाजूला, बाजारात सर्वत्र उपलब्ध होणारी काकडीचा वापर करणार आहोत. हा उपाय करताना सुरुवातीला काकडी ठेचून घ्यायची आहे. म्हणजे त्याचे तुकडे करून ठेचून घ्यायची आहे. खलबत्ता मध्ये ठेचून घेऊ शकता.

ही ठेचून घेतलेली काकडी तुम्ही कढई किंवा तव्यावर काढून घेऊ शकता. या काकडीला आपल्याला गरम करून घ्यायचे आहे. अशी ही गरम केलेली काकडी नंतर थंड होऊ द्यायची. जेणेकरून जास्त गरम नको कारण चटके पायाला बसतील याची काळजी घ्यायची. सहन होईल एवढीच गरम काकडी पायावर बांधायची. म्हणजेच ज्या ठिकाणी अवधना आलेली आहे तिथे.

ज्या ठिकाणी गुढघे दुखतात, काही व्यक्तींचे गुढघे सुजलेले असतात त्यांच्यासाठी हा उपाय चांगला आहे. ज्या व्यक्तींचे गुढघे दुखतात त्या व्यक्तींनी ही गरम केलेली काकडी गुढघ्यावर लावायची. लावल्याच्या नंतर कपडा घ्यायचा आणि कपड्याच्या मदतीने बांधून घ्यायचा आणि रात्रभर हे असच ठेवा. सकाळी उठल्यानंतर गुढघेदुखीचा त्रास एकदम बंद. ज्या व्यक्तींना अवधना आहे तो ओसरलेला असेल.

असा हा उपाय सलग तीन दिवस केला तर गुढघेदुखीला एकदम चांगल्या प्रकारे आराम मिळतो. गुढघेदुखी एकदम कमी होते. या उपयासोबत आहार हा व्यवस्थित ठेवला तर गुढघेदुखी कायमची संपते. तसेच बऱ्याच व्यक्तींचे पाय ठणकतात अशा व्यक्तींसाठी सर्वात सोपा उपाय संध्याकाळी बसल्यानंतर मसाज करा.

एक ते दोन मिनिटे वरच्या बाजूपासून खालच्या बाजूपर्यंत मसाज करा आणि आपले पाय मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. बऱ्याच ठिकाणी रॉकेल लावलं जात पायाला त्यानेही मसाज केली जाते. त्यानेही चांगल्या प्रकारे फरक पडतो. त्यानंतर मिठाचे पाण्याने पाय शेकून द्या. लगेच तुमचे पाय ठणकने की होते. असा हा उपाय आहे. धन्यवाद.

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.