घरासमोर हे झाड असेल, तर घरात पैसा टिकत नाही ! हे झाड तत्काळ हटवा !!

मित्रांनो तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, श्रीमंत व गरीब असणे हा नशिबाचा भाग असतो. परमेश्वराने आपल्या भाग्यात जे लिहिले आहे, त्याप्रमाणे आपल्याला त्याचे फळ मिळत असते, मग ते सुख असुदे नाहीतर दू:ख. परंतु, ह्याचा अर्थ असा नाही की जर आपण गरीब असलो, तर नेहमीच गरीब राहू, किंवा श्रीमंत असू तर नेहमीच श्रीमंत राहू, गरीबी येणार नाही. काळ हा खूपच बलवान असतो. तो राजाला रंक व रंकाला राजा बनवण्याची क्षमता ठेवतो. परंतु, हे पण सत्य आहे, की काळ पण ईश्वराच्या आज्ञेने चालतो.

कधीतरी असे पण होते, की ईश्वराची भक्ति बरोबर खूप मेहनत करूनही कोणाची परिस्थिति सुधरत नाही, व त्याच्या जीवनात दारीद्र्य वाढतच जाते. ती व्यक्ति अशा विचारात राहते की एवढे सगळे करून समस्या कमी होत नाहीत. मित्रांनो, याचे कारण काही अशा चुका असतील ज्या माणूस नकळत करतो व धनाची देवी माता लक्ष्मी त्यांच्यावर नाराज होते.

वास्तुशास्त्रामध्ये अशा खूप गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यामुळे घरात नकारात्मकता वाढते व त्याचा परिणाम आपल्या आर्थिक परिस्थितीवर पडतो. चला तर मग बघूया त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या माता लक्ष्मीला नाराज करतात, व कोणते वृक्ष आहेत, जे आपल्या घराजवळ असता कामा नयेत.

पहिली गोष्ट, दू:ख आणि संकटे प्रत्येक घरात येतात, पण त्याचे निवारण शांततेने केले पाहिजे. तरच माता लक्ष्मी तुमच्या घरात निवास करेल. घरात विनाकारण कलह करू नयेत. त्यामुळे गरीबी तुमच्या घरात टिकून राहाते. दुसरी गोष्ट अस्वछ वातावरण- अशा वातावरणात देवी देवता आपल्या वास्तव्य करीत नाहीत. जरूरी नाही की तुमचे घर मोठे असले पाहिजे, किंवा मोठ्या वस्तु आहेत.

पण स्वछ्ता असणे खूप जरूरी आहे. जिथे स्वछता नाही, तिथे ईश्वर नाही, व जिथे ईश्वर नाही तिथे सुख, शांति व संपन्नता नाही. त्याचबरोबर, आपल्याला आपल्या शरीर व मनाची स्वछता/ काळजी घेतली पाहिजे. घर स्वछ असेल, पण मनात कपट, द्वेष दुसर्‍यांसाठी वाईट विचार असतील, तर अशा घरात माता लक्ष्मी राहाणे पसंत करत नाही. तिसरी गोष्ट म्हणजे घ्या घरात वडीलधार्‍यांचा, अतिथिंचा, महिलांचा, संतांचा सतत अपमान होत असेल, त्या घरात माता लक्ष्मी राहत नाही. सुख सुविधा मिळतात, पण मानसिक शांति मिळत नाही.

चौथी गोष्ट म्हणजे आपल्या काही सवयींमुळे आपल्या घरात गरीबी येऊ शकते जसे की घरातील लोकांचे सूर्योदयानंतर झोपून राहणे, किंवा संध्याकाळी झोपून राहणे, उठल्यावर बसून राहाणे, दारू पिणे, जुगार खेळणे अशा वाईट सवयींमुळे माता लक्ष्मी नाराज होते. ईश्वराची प्रार्थना घरात रोज झाली पाहिजे. नाहीतर घरात क्लेश व दरीद्र्य राहते.

पाचवी गोष्ट म्हणजे दुसर्‍याना आपल्या घरातील वस्तु देणे ज्यामुळे आपल्या घराचे नुकसान होऊ शकते. आपला उद्देश लोकांना मदत करण्याचा असतो, पण मीठ, दही, लिंबू, सफेद वस्तु दुसर्‍याना देऊ नयेत. त्यामुळे आपल्या धनसंपत्तीला नजर लागते व दारिद्र्य येते. सहावी गोष्ट म्हणजे ज्या घरात अन्नाचा अपमान कोणत्याही प्रकारे होतो, मग ते जास्त शिजवलेले अन्न फेकून देणे असुदे, किंवा वाढलेल्या ताटावरून उठणे त्यामुळे अन्नाचा अपमान होतो. माता लक्ष्मीचा त्यामुळे अपमान होतो.

सातवी गोष्ट म्हणजे घराच्या पूर्व दिशेला जर पिंपळाचा वृक्ष असेल, तर ते गरीबीचे कारण होऊ शकते. पिंपळाची सावली शीतल असते, पण ती शुभ मानली जात नाही. जर ती सावली सकाळी तुमच्या घरावर पडत असेल, तर त्या घरात अनेक समस्या येतात. हा वृक्ष निर्जनता तयार करतो. म्हणून घराच्या जवळपास पिंपाळाचा वृक्ष असू नये.

Leave a Reply

Your email address will not be published.