उंबरठ्यात बसणार्‍या महिलांनी हि माहिती एकदा वाचाच – वास्तुशास्त्र काय सांगते?

मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. भाग्य आणि कर्म दोन्ही मनुष्याच्या जीवनाची दशा आणि दिशा निर्धारित करतात. हे दोन्ही एक दुसर्‍याना पूरक आहेत. मित्रांनो, श्रीमंत होणे कोणाला आवडत नाही., किंवा कोण आपल्या जीवनात सगळ्या प्रकारची सुख इछित नाही? वास्तवात प्रत्येक माणूस असे इछितो, असे म्हणतात, जो मेहनत करतो तोच सफल होतो व प्रगति करतो.

रुपये, धन दौलत कमावण्यासाठी मेहनत तर करावीच लागते हे सत्य आहे. परंतु, हे पण सत्य आहे की श्रीमंत होण्यासाठी आणखी एका गोष्टीची जरूर असते ते म्हणजे नशीब किंवा भाग्य. मेहनत आणि भाग्य याची साथ असेल, तर मनुष्य सफल होतो. यात काही शंका नाही कारण एक कामगार जो सामान्य व्यक्तिपेक्षा जास्त मेहनत करतो, तो करोडपती झाला असता.

वास्तूचे आपल्या जीवनात खूप महत्व आहे. ज्या जागी आपण आपला जास्तीत जास्त वेळ व्यतीत करतो, त्या जागेच्या वास्तूवरपण आपली आर्थिक परिस्थिति अवलंबून असते. आपल्या काही सामान्य दिसणार्‍या चुकांमुळे आपल्या जीवनात खूप परिवर्तन घडत असते. आज आम्ही त्याच चुकांबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुमच्या घरात दरीद्र्य राहते.

महिला पण अशा काही चुका करून बसतात, ज्यामुळे घरातील आर्थिक स्थितीवर वाईट परिणाम होतो आणि घरातून लक्ष्मी नाराज होऊन निघून जाते. तर चला मग जाणून घेऊया अशा कोणत्या चुका आहेत, ज्या कारणामुळे घरात दारिद्र्याचा निवास होतो. सगळ्यात पहिली गोष्ट, मित्रानो, घरातील जास्तीत जास्त लोक ईश्वराची आराधना करतात आणि नियमितपणे पूजा पण करतात. पण त्यात होणार्‍या चुकांकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे त्यांच्या आराधनेला काही महत्व राहात नाही.

जसे की पुजा करताना शरीराची व मनाची पवित्रतेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. मां सा हा री व म द्य पा न करून, पान, गु ट खा, इत्यादीचे सेवन करून पुजा करण्यामुळे ईश्वर नाराज होतो. ते पाप आहे. तसेच कोणताही धर्मग्रंथ वाचताना पवित्रता आणि शुद्धतेकडे लक्ष दिले पाहिजे. तसेच दिवासमोर ठेवेलेल्या दिव्याला फुंकर मारून विझवणे आणि पुजा सामुग्रीचा वास घेणे, प्रसाद चाखून ठेवणे त्यामुळे दारिद्र्याचा शाप लागतो.

नखांसारखी सामान्य वाटणारी गोष्ट आपल्या जीवनात दू:ख आणि दरिद्र्याचे कारण बनु शकते. रात्रीच्या वेळी नखे कापणे हे अशुभ चुकीचे आहे. राहू आणि केतू ग्रह त्यामुळे आपल्याकडे आकर्षित होतात. त्यामुळे आपली आर्थिक स्थिति प्रभावित होते.
तिसरे म्हणजे घराचा मुख्य दरवाजा. दरवाजासमोर किंवा आजूबाजूला धूल माती कचरा जमा होऊ देऊ नये. दरवाजा हे माता लक्ष्मीचे आगमनाचे ठिकाण आहे. त्यासाठी सदैव सज्ज राहिले पाहिजे. केर व घाण बघून माता लक्ष्मी निघून जाते व दारिद्र्य घरात येते.

चौथी गोष्ट म्हणजे माता लक्ष्मी चंचल असते. तिला आपल्या घरात थांबवून ठेवणे तेवढे सोपे नाही. पैशाची लालसा करणे, त्याचा सदुपयोग न करणे, जुने कपडे घालणे, वाद विवाद ह्या सर्वांमुळे घरात सुख समृद्धि टिकत नाही. त्या घरातील नकारात्मकता दू:ख व दारिद्रयाचे कारण बनते. माता लक्ष्मी तिथून निघून जाते.

पाचवी गोष्ट, पैशाची घमेंड करून कोणाचा अपमान करू नये. ते तुमच्या विनाशाचे कारण होऊ शकते. दारात आलेल्या भिकारी, पशू पक्षी, यांना उपाशी जाऊ देऊ नका. साधू संतांचा अपमान करू नका. सहावी गोष्ट, घराच्या उंबरठ्यात बसणे, तिथे भोजन करणे, हे दारीद्र्याला आमंत्रण देण्यासारखे आहे. माता लक्ष्मी अशा घरात प्रवेश करत नाही. घराच्या उंबरठ्याला स्वछ ठेवले पाहिजे.

सातवी गोष्ट, कोणत्याही प्रकारची तुटलेली वस्तु, आरसा, घड्याळ, ठेवू नये. त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतात. मित्रानो माहिती आवडली तर जरूर लाइक आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.