झोपेत बघलेली हि स्वप्ने चुकूनही कोणालाही सांगू नका नाहीतर….

झोपल्यावर बघितलेल्या या ५ स्वप्नांचा कोणाजवळही उल्लेख करू नका. नाहीतर तुम्ही संकटात सापडू शकता. आज आम्ही तुमच्याशी बोलणार आहोत, अशा ५ स्वप्नांबद्दल जी तुम्ही कधीतरी नक्की बघितली असतील व ती बघितल्यानंतर तुम्ही ती दुसर्‍या कोणाला तरी सांगितली असतील. तर मित्रांनो, तुम्हाला सांगतो, तुम्ही ही ५ स्वप्ने कोणालाही सांगू नका.

ही स्वप्ने आपल्या परिवारातील लोकांनासुद्धा सांगू नका. आज तुम्हाला माहिती होईल, की जितके शक्य असेल, तर ही ५ स्वप्ने दुसर्‍या कोणाशीही मोकळेपणी सांगू नका, त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. चला तर मग सुरू करूया. झोपल्यावर स्वप्न तर प्रत्येक व्यक्ति बघते. स्वप्न बघणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे., जे प्रत्येकाच्या बाबतीत घडत असते.

काही स्वप्ने अशी असतात, की जी झोप झाल्यावर आपल्या लक्षात राहात नाहीत. पण काही स्वप्ने अशी असतात, की जी झोपून उठल्यावरसुद्धा आपल्या चांगली लक्षात रहातात. तुम्ही कितीतरी लोकांच्या तोंडून ऐकले असेल, की माहीत आहे, आज मी हे स्वप्न बघितले. हो, आपण नेहमी दुसर्‍यांना आपली स्वप्ने सांगत असतो. काही स्वप्ने आपण कोणालाही सांगू नयेत. शास्त्रानुसार हे चुकीचे आहे. त्यामुळे भविष्यात त्या स्वप्नांचे मिळणारे फळ समाप्त होते. तर जाणून घेऊया, ती ५ स्वप्ने कोणती आहेत.

अशा प्रकारच्या स्वप्नांमध्ये सगळ्यात पहिले प्रकृतीच्या संबंधित स्वप्ने- मित्रांनो जर तुम्ही असे स्वप्न बघितले असेल, ज्यात तुम्ही प्रकृती म्हणजेच निसर्गाच्या अगदी जवळ आहात, स्वप्नात समुद्र, झाडे, डोंगर, नदी अशा वस्तु दिसल्या, तर याचा अर्थ आहे, खूप लवकर तुमच्या जीवनात मोठी खुशखबर येणार आहे. जसे निसर्गाच्या जवळ जाऊन आपले मन प्रसन्न होते, तसेच अशा स्वप्नाचा अर्थ तोच असतो. पण या स्वप्नाबद्दल कोणाजवळ बोलू नका, नाहीतर तुम्ही त्याच्या लाभापासून वंचित राहू शकता.

दूसरे स्वप्न म्हणजे, मृ त्यु संबंधी. नेहमी आपल्याला अशी स्वप्ने पडतात, ज्यात आपण स्वत:चा किंवा दुसर्‍या व्यक्तीचा मृ त्यू बघतो. त्यामुळे आपण घाबरून जातो. तर कधी मन उदास होते. पण तुम्हाला असे स्वप्न पडले तर तुम्ही घाबरू नये. कारण मृ त्यु चे स्वप्न तुमच्या समस्या दूर होण्याचा संकेत आहे. पण हे तुम्ही कोणाजवळ बोलू नका कारण त्यामुळे त्याचा परिणाम कमी होतो.

तिसरे स्वप्न म्हणजे साप दिसणे: आपल्याला जर स्वप्नात साप दिसत असेल, तर आपण घाबरतो. पण घाबरायचे कारण नाही. ते तुमच्या भविष्यात होणार्‍या व्यापाराच्या वृद्धीचे संकेत आहेत. कार्यात सफलता मिळण्याचे ते संकेत आहेत. धनलाभ संभवतो. याबद्दल कोणाला बोलू नये, कारण शास्त्रानुसार, त्यामुळे तुम्हाला त्याचे फळ मिळणार नाही.

चौथे स्वप्न म्हणजे ईश्वराचे दर्शन. जर स्वप्नात कोणत्याही देवाचे दर्शन झाले, तर त्याचा अर्थ आहे, की लवकरच तुमच्या जीवनात खुशी येणार आहे. देवच्या दर्शनांचा अर्थ काहीतरी सफलता मिळण्याचे संकेत आहेत. मोठी खुशखबर मिळणार आहे. म्हणून याचा उल्लेख कोणाजवळ करू नका.

पाचवे स्वप्न आहे मासे दिसणे. स्वप्नात जर कोणत्याही प्रकारचे मासे तरंगत असलेले दिसले, किंवा खाताना बघितले, तर ते शुभ मानले गेले आहे. मासे दिसण्याचा अर्थ आहे, अचानक मोठा धन लाभ होणे. १ महिन्याच्या आत तुम्हाला हा धनलाभ होऊ शकतो. म्हणून याचा उल्लेख कोणाजवळ करू नका, नाहीतर विलंब होऊ शकतो.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा Mahiti.in उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात. Mahiti.in कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका. धन्यवाद!.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *