अंगाला शहारे आणणारा स्वामींचा अक्कलकोटला घडलेला एक अद्भुत अनुभव…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो आज आम्ही तुम्हाला असा अनुभव सांगणार आहे जो एका स्वामी भक्ताला आलेला आहे. हा अनुभव वाचून तुमच्या अंगाला नक्की शहारे येतील. कृपया हा अनुभव संपूर्ण वाचा. मित्रांनो एकदा अक्कलकोटला गाडी येऊन थांबली. त्यातून एक साहेब आणि एक बाई उतरल्या. साहेब नास्तिक होते. त्यांना देवावर अजिबात विश्वास नव्हता.

साहेब उतरले आज त्या बाईना बोलले आलं एकदाच तुझं अक्कलकोट.. आता हे सामान कोण नेणार.? इथे राहायची सोय कुठे होणार.? म्हणून मला इथे यायचं नव्हते. या स्वामींच्या नादात सगळे वाया घालवलस तू. त्या बाई म्हणाल्या बास की आता, तितक्यात एक वयस्कर गृहस्थ तिथे आले आणि म्हणाले हे सामान न्यायचे आहे का? साहेब त्या वयस्कर गृहस्थाला वरपासून खाली निरखुन पाहत होते.

बाई म्हणाल्या हो सामान न्यायचे आहे. पण कुठे राहायचं ते ठरलं नाही आमचं. तुम्ही कुठे नेणार आम्हाला. साहेब अजूनही त्या माणसाकडे संशय्याने पाहत होते आणि साहेब बाईना म्हणाले कोण आहे हा तुला माहीत आहे का? तो कोण आहे तुला माहीत नाही आणि तू लागली त्याच्या सोबत बोलायला. तो गृहस्थ म्हणाला मला माहिती आहे मी सोडतो तुम्हाला बरोबर. राहायची चांगली सोय सुद्धा करतो.

बाई म्हणाल्या मग घे हे सामान आणि चल. तेवढ्यात साहेब बोलले कोण रे तू आणि नेणार कुठे? नाही त्या ठिकाणी नेशील आम्हाला. तो वयस्कर गृहस्थ बोलला आणि हसला म्हणाला माझे नाव नरसु आहे. मी का फसवेल तुम्हाला. मी इथे जे येऊन फसतात त्यांना मार्ग दाखवतो. तुम्ही चला तर असे म्हणून त्याने सामान डोक्यावर घेतले.

नरसु ने त्यांना एका चांगल्या घरात राहण्याची सोय करून दिली. साहेब लंगडत चालत होते. नरसु ने पाहिले आणि साहेबांना विचारले , पायाला काय झाले आहे. बाई म्हणाल्या दोन वर्ष्यापूर्वी अपघात झाला होता. त्या मुळे यांचा पाय असा झाला आहे. साहेब घरात आरामात बसले होते त्यावेळी नरसु त्यांच्या पायाजवळ येऊन बसला. त्यांच्या डोळ्यात करून दाटली आणि म्हणाला स्वामींची कृपा व्हावी म्हणून आलात ना तुम्ही. तेवढ्यात साहेब जोरात बोलले कसले स्वामी आणि कसले काय. माझा विश्वास नाही स्वामींवर. हिच्या साठी आलोय इथे. मी तर कधीही इथे आलो नाही आहे. मी तर नास्तिक आहे.

साहेब बाईना बोलले तू जा दर्शन करून ये मी घरी आराम करतो. तेवढयात नरसु बोलला जा बाई तुम्ही मी साहेबांचे पाय चेपून देतो. बाई म्हणाल्या मी जाऊन येतो. नरसु ने साहेबांचा पाय घेतला आणि मॉलिश करू लागला. जसा नरसु पाय चोळत गेला तसे साहेबांचा डोळा लागला. थोड्या वेळाने साहेबांना जाग आली तेव्हा खूप बरे वाटत होते. त्यांनी पाहिले उषाजवळ नरसु होता.

साहेबांनी पायाकडे पाहिले तर पायाला कोणतेतरी पान बांधून पट्टी बांधली होती. तेवढ्यात साहेब म्हणाले नरसु पाणी हवं आहे. नरसुने लगेच पाणी आणले. नरसु बोलला साहेब बरे वाटेल तुम्हाला आता. साहेब म्हणाले नरसु तुझ्यात देव आहे. हाच देव असतो आणि लोक मूर्खपणा सारखे मंदिरात जातात. नरसु बोलला बरोबर आहे साहेब तो नांदतो मंदिरात आणि मठात आणि राहतो हृदयात. यावर साहेब म्हणाले भोळा आहेस तू. एवढे केलेस माझ्यासाठी हाच तर देव असतो.

नरसु बोलला आधी तुम्ही संशय घेतला माझ्यावर. साहेब म्हणाले तसे वागावे लागते. फसवणूक होते. नरसु बोलला बरोबर आहे साहेब माणूस नेहमी फसत असतो. नरसु उठला आणि म्हणाला मी जाऊ का आता? झाले माझे काम. साहेबांना त्यांचा हात पकडला आणि बोलले बस की थोडा वेळ. नरसु बोलला मी आहे इथेच. तुमच्याकडे कायमचा. पण कोणीतरी आले असेल अजून बघायला हवे आणि नरसु तिथून निघून गेला.

तेवढ्यात बाई घाई घाईने घरी आल्या आणि बोलल्या नरसु कुठे आहे. साहेब म्हणाले गेला तो. बाई इथेच कोसळल्या आणि रडायला लागल्या. साहेबांना कळेल काय झाले. ते उठले पायातील कळ गेलेली होती. दुखणे बंद झालेले होते. त्यांना आश्चर्य वाटले. साहेबांनी बाईना धीर दिला आणि बोलले काय झाले आहे. काही चोरीला गेले काय आपले. बाई म्हणाल्या काय विचारता, तुम्ही हो गेलय चोरीला. मीच गेली आहे चोरीला. मी मठात गेले इथे नमस्कार केला आणि स्वामी मुखात नरसु ची मूर्ती दिसली.

कितीतरी वेळ नरसु ची मूर्ती दिसत होती. साहेब झटकन खाली बसले आणि त्यांना नरसु चे बोल आठवले. मी आहे इथे तुमच्याकडे कायमचा. समोर असून लोकांना कळत नाही. साहेब रडू लागले. देव असाच भेटत असतो. अहंकारा पायी तो दिसत नाही. म्हणून नास्तिकता वर्चस्व गाजवते. त्यांनी अंतःकरणाने हाक मारली स्वामी.. मित्रांनो हा अनुभव तुम्हाला कसा वाटला आम्हाला कंमेंट करून नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published.