दातातील कीड 1 मिनिटात बाहेर, दाढ दुखी साठी घरगुती उपाय, मरेपर्यंत दात हलणार नाही…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो आपल्या शरीरातील दात हा असा अवयव आहे की जी अन्नपचनामध्ये महत्वाचे काम करतो. आयुर्वेदामध्ये दातांना असे म्हटले जाते की ज्यांचे दात मजबुत त्यांची प्रकृती नेहमी चांगली राहते. परंतु या दातांकडे आपण पाहिजे तितके लक्ष देत नाहीत. आयुर्वेदामध्ये असे सांगितलेले आहे की जेवणानंतर चूळ भरावी याने दातांमध्ये अन्नकण अडकत नाहीत.

तसेच ब्रश सुद्धा रात्री झोपताना केला पाहिजे त्यामुळे दात नेहमी चमकदार, मजबुत राहतात. दात कधीच किडत नाहीत. परंतु आपण असे न केल्यामुळे दातांमध्ये अन्नकण अडकतात आणि यामुळे दात किडतात. दात किडल्यामुळे दात खूप दुखतात आणि आपल्याला दात काढावे लागतात. मित्रांनो काही लोक मावा, गुटखा खातात त्यामुळे त्यांच्या दातांवर पिवळा थर साठतो.

दातांमध्ये किड असेल, थंड किंवा गरम खाल्यामुळे दातांना येणार सनक असेल, दातांमधून येणारे रक्त कमी करणारा, आजचा उपाय खूप महत्वपूर्ण ठरणार आहे. तुमचे आरोग्य नेहमी चांगले राहण्यासाठी आयुर्वेदामध्ये असंख्य वनस्पतीचा वापर करायला सांगितले आहेत. याच वनस्पतीच्या मदतीने खूप सारे दंत मंजन बनवतात. शास्त्रशुद्ध पद्धतीने दंतमंजन बनवण्यासाठी कोणकोणते घटकांची आवश्यकता लागणार आहे. हे आपण आता पाहूया..

मित्रांनो असा हा महत्वपूर्ण उपाय बनवण्यासाठी आपल्याला पहिला घटक लागणार आहे कापूर. कापूर हा अनेक ब्युटीप्रोडक्ट, पूजाहोम इत्यादी कार्यात वापरला जातो. दातांमध्ये वेदना होत असतील, दात दुखत असतील, तर या मधील अँटीबॅक्टेरियल घटक त्या वेदना कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. म्हणून आजच्या उपायसाठी आपल्याला छोटा एक चमचा कापूर पावडर लागणार आहे.

यानंतर दुसरा घटक आपल्याला लागणार आहे तुरटी. तुरटीमध्ये मॅग्नेशियम, सल्फेट, असते ज्याद्वारे सूज व वेदना कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. मित्रांनो तुरटी बारीक करून घ्या. बारीक केलेली जी एक चमचा पुड आहे ती आपल्याला तव्यावरती गरम करून घ्यायची आहे. थोडा वेळाने त्याची लाही तयार होईल. आणि ही जी लाही तयार होणार आहे ती आपण या उपायसाठी वापरायची आहे.

तिसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे कडूलिंब. भारतीय वेदांमध्ये कडूलिंबाचे नाव हे सर्व प्रकारच्या आजारांवर औषध म्हणून घेतलं जातं. यामधील अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल, हे गुण असतात जे कुडुलिंबाल औषधी बनवतात. म्हणून दात आणि हिरड्यांच्या आजाराना ते मजबुत ठेवतात. मित्रांनो आपल्याला हा झाडाचे जे खोड आहे त्याच्या आतील साल आपल्याला या उपायासाठी लागणार आहे.

या साली आपण घरी आणायच्या आहेत. घरी आल्यानंतर त्या साली वाळवायच्या आहेत. यानंतर त्या साली एका मडक्यात जाळायच्या आहेत. जाळून घेतल्याच्या नंतर आपल्याला याची काळी पूड मिळेल. ही पूड आपण साहित्याच्या साहाय्याने बारीक करून घ्या.बारीक केल्यानंतर आपण गाळणीच्या साहाय्याने गाळून घ्या जेणे करून दात घासताना आपल्याला कोणतीही त्रास होणार नाही.

मित्रांनो हे तिन्ही पदार्थ आपले तयार झाले आहेत. कडुलिंबाच्या झाडाची पूड आपण एक चमचा घ्यायची आहे. त्या मध्ये आपण तुरटीची लाही एक चमचा टाकायची आहे. यानंतर आपण या मध्ये एक चमचा कापूर पूड टाकायचा आहे. यानंतर थोडं मीठ टाकायचं आहे.

हे सर्व पदार्थ आपण एकजीव करा. हे जे मिश्रण तयार झालेलं आहे त्याने आपण दात घासायला चालू करा. सकाळ व संध्याकाळी दोन्ही वेळेस आपण ही पूड घासा. तुम्हाला याचा 15 दिवसात परिणाम दिसून येईल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.