घरातील कटकट भांडणे अशांती दूर करण्यासाठी 1 दिवा या कोपऱ्यात लावा

नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे. जर आपल्या घरामध्ये सतत कटकटी होत असतील, घरातील लोक सतत एकमेकांशी भांडत असतील, वादविवाद होत असतील, तर हे नक्की वाचा. कारण आज आम्ही घरातील कटकटी संपवणार असा एक उपाय घेऊन आलो आहोत. हा उपाय केल्यानंतर आपल्या घरामध्ये होणारी भांडण शांत होतील. आपल्या घरामध्ये सुख आणि समाधान नांदु लागेल.

मित्रांनो आपल्या घरातील वातावरण सतत कटकटीचे असेल, घरातील लोक एकमेकांशी कुरघोडीने वागत असतील तर अश्या घरामध्ये माता लक्ष्मी राहणे पसंत करत नाही. आणि त्यामुळेच ज्या घरामध्ये माता लक्ष्मी राहत नाही त्या घरातील सुख शांती कधीच निघून गेलेली असते. मित्रांनो लक्षात ठेवा माता लक्ष्मी यांचं घरातील वास्तव्य हे अतिशय महत्वाचे आहे. म्हणून प्रत्येकाने संयम बाळगायला हवा.

दुसऱ्याचे म्हणणे ऐकून घ्यायला हवे. आणि दुसऱ्या प्रती आदराची भावना आपल्यामध्ये जोपासली तर असे उपाय करण्याची गरज पडणार नाही मात्र आपण पाहतो की प्रत्येकजण आपला स्वतःचा मोठेपणा दाखवण्यासाठी किंवा स्वतःचा इगो सांभळण्यासाठी कधीही माघार घेत नाहीत. आणि मग जर असा प्रॉब्लेम आपल्याही घरी असेल ते हा ज्योतिष शास्त्राचा उपाय नक्की करून पहा.

आपल्या घरातील कटकटी थांबतील. हा उपाय अतिशय साधा सोपा आहे. यासाठी आपल्याला एक तेलाचा दिवा लावावा लागणार आहे. ज्याप्रकारे आपण दिवा देवघरात प्रज्वलित करतो अगदी तसाच एक दिवा आपल्याला लावायचा आहे. आणि लक्षात ठेवा हा दिवा आपण घरात ज्याठिकाणी पाणी भरून ठेवतो अश्या ठिकाणी लावायचा आहे. हा दिवा लावताना कोणतेही तेल वापरू शकता. शक्यतो मोहरीचे तेल (मस्तर्ड ऑईल) वापरू शकता. कारण मोहरीच्या तेलाने खूप लवकर फायदे होतात असे शास्त्र मानत.

असा कोणताही तेलाचा दिवा ज्याठिकाणी पाणी भरून ठेवलेले असते त्या ठिकाणी लावायचा आहे. आणि हा दिवा लावल्यानंतर अत्यंत विशेष आणि महत्वाची गोष्ट करायची आहे ती म्हणजे या दिव्याची वात खालच्या बाजूला करून ठेवायची आहे. जर दिव्याची वात खालच्या बाजूला करून ठेवली तर त्यामुळे आपल्या घरात सुख शांती नांदणार आहे. घरातील भांडणे, कटकटी बंद होणार आहेत. या उलट ही वात वरच्या दिशेला केली तर मात्र भांडण कमी होण्याऐवजी वाढणार आहेत.

जी रूई आहे, जो कापूस आहे त्याची वात ही दिव्या लगत ठेवायची आहे. मित्रांनो असा हा उपाय करून पहा. दिवस मावळताना तसेच सकाळी ज्या वेळी देवपूजा कराल अशा दोन्ही वेळेला हा दिवा नक्की प्रज्वलित करा. आणि पहा कि तुमच्या घरातील भांडणे ही लवकरच कमी होतील. काही दिवसांतच तुमच्या घरातील भांडणे संपून जातील. मित्रांनो तुमच्या घरातील देवपूजा करताना कुटुंबातील सर्व लोकांनी मिळून ही देवपूजा केली तर अतिशय चांगले होईल.

परंतु जर हे शक्य नसेल तर घरातील मुख्य श्रीं नी ही पूजा करावी. आणि घरातील इतर लोकांनी दर्शन घ्यावे. असे केल्याने घरातील एकोपा वाढीस लागेल. बऱ्याचदा आपण पाहतो की लोक देवदर्शन करत नाहीत. देवाच्या पायासुद्धा पडत नाहीत. तर त्यांना विनंती करा, आग्रह करा आणि या उपायासोबत असणाऱ्या काही चांगल्या गोष्टींचे पालन करा. यामुळे तुमच्या घरातील कटकटी तर मिटतीलच त्याबरोबर संस्कारांची निर्मिती होईल.

आजकाल हिंदू परिवारामध्ये संस्कृती खालावत चालली आहे. म्हणून हिंदू संस्कृतीचे जतन करण्यासाठी आम्ही हे उपाय आपल्यासमोर घेऊन येत असतो. आजपर्यंत या उपायाचे दुष्परिणाम कोणालाही झालेले नाहीत. आणि भविष्यामध्ये देखील कोणाला होणार नाहीत. जे लोक हिंदू आहेत त्यांनी हिंदू धर्माचा अभिमान बाळगायला हवा. आपल्या हिंदू धर्माबद्दल कोणी टीपा- टिप्पणी करत असेल तर त्यांना योग्य भाषेत आपण उत्तर द्यायला हवे. सोबतच हिंदू धर्माचा प्रचार व प्रसार करणाऱ्या अश्या उपायांना सपोर्ट करायला हवा.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा Mahiti.in उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात. Mahiti.in कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका. धन्यवाद!.

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.