कधीच म्हातारे होणार नाही, ५० वर्षांच्या वयात २५ वर्षांची शक्तीआणि स्फूर्ती…

काही दिवस तुम्ही हे घेऊन बघा, कॅल्शियमची कमतरता, हात-पाय, कंबरदुखी, लठ्ठपणा हे सगळे आजार दूर होतील. रक्ताची कमतरता पण नाहीशी होईल. मित्रांनो, आज मी तुमच्याबरोबर खूपच सोपा घरगुती उपाय शेअर करणार आहे. हे तुमच्या खूपच कामाचे आहे. तुम्ही स्वत: अनुभव कराल, की काही दिवस याच्या सेवनाने तुम्हाला सांधेदुखी, कंबरदुखी यापासून आराम पडेल.

मी इथे घेतले आहेत, मखाने. असे याचे पॅकेट येते, जसे मी दाखवते आहे. कोणत्याही मॉलमध्ये, दुकानात, ड्रायफ्रूइट्सच्या दुकानात तुम्हाला मखाना मिळेल. खूप ठिकाणी याला “फूल मखाना” म्हणतात. शाकाहारी आहे, असे या मखान्याचे दाणे असतात. आता जर हे तुम्ही दाबून बघितले, तर ते कुरकुरीत नाहीत. त्यासाठी आपल्याला त्याला थोडे शेकून घ्यावे लागते. त्यामुळे यामध्ये स्वाद खूप छान येतो. सर्वात प्रथम मी तुम्हाला मखान्याचे काय फायदे आहेत ते सांगणार आहे.

मखाना गुणांचे भांडार आहे. भरपूर प्रमाणात यामध्ये कॅल्शियम, मैगांनेशियम, झिंक असते. आपल्या हाडांसाठी खूपच फायदेशीर आहे. दुसरे म्हणजे आपल्याला मखान्याबरोबर जे घ्यायचे आहे, ती म्हणजे खसखस. खसखस ज्याला इंग्लिशमध्ये पोप्पीसीड्स म्हणतात. यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते, हाडांच्या वेदनांपासून आपल्याला आराम देते तसेच सगळ्यात मोठा फायदा म्हणजे यात मेगा३ फैटी अॅसिड, जे खूपच कमी वस्तूंमध्ये आढळते.

त्याचबरोबर त्यामध्ये प्रोटीन असते, फायबर असते, थायमीन, कॅल्शियम आणि मैग्ंनेशियम असते. खसखशीचा जो मोठा फायदा आहे, तो म्हणजे ते आपल्या शरीराला हायड्रेट करते. बद्धकोष्टतेच्या समस्येला दूर करते. उन्हाळ्यात खसखस सेवन केल्यामुळे आपल्या शरीरातील पाण्याची कमी दूर होते. अनिद्रेला दूर करते. ज्यांना झोप स्वस्थ येत नसेल, त्यांनी रोज अर्धा चमचा खसखस दुधात मिसळून घेतली तर अनिद्रेपासून सुटका होईल.

मी इथे २ माणसांसाठी दूध बनवते आहे. मी इथे दीड चमचा खसखस घेतली आहे. ती पाण्यात भिजवून ठेवा. तुम्हाला घ्यायची आहे १ टीस्पून. तुम्ही खसखशीचे दूध रात्री झोपताना घ्या. याचे कोणतेही वाईट परिणाम नाहीत. दुसरी वस्तु दूध. लहान, मोठे सगळ्यांनी हे दूध घेतले पाहिजे, कारण सर्वांनाच कॅल्शियमची जरूरी असते. गाईचे दूध घेतले तर उत्तम. मलाई विरहित दूध घ्यायचे आहे.

१ मोठा ग्लास मी दूध घेतले आहे. ते गरम करायला ठेवले आहे, आता त्यात पाण्यात भिजवलेली खसखस घाला. नंतर त्यात घालायचे आहेत १ मूठ मखाने. दुधात ते शिजवा. नंतर त्यात खडीसाखर घाला, जर दूध गोड हवे असेल तर. खडीसाखर शरीराला थंडावा देते. दूध उकळू लागले की गॅस बंद करा. रात्री झोपायच्या आधी अर्धा तास हे दूध घ्या. उत्तम झोप लागेल, शरीरात स्फूर्ति येईल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.