कोणी मागता मागता मेले तरी घरातील ही वस्तू देऊ नका

नमस्कार मित्रांनो, कोणी मागता मागता मेले तरी चालेल पण आपल्या घरातील एक गोष्ट कोणालाही सांगू नका. कोणालाही देऊ नका. मित्रांनो आजही स्वामींनी केलेला उपदेश आपल्या कानी येतो व वापरला जातो . आज आम्ही तुम्हाला स्वामींचा एक संदेश सांगणार आहे. याद्वारे जीवनात कसे वर्तन करावे वागावे? काय करू नये? याविषयी सविस्तर सांगणार आहोत. प्रामाणिकपणे केलेल्या कष्टाचे फळ आपल्याला जरूर मिळते. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्ती नेहमी प्रसन्न असतात.

आपले लक्ष्य गाठण्यासाठी कितीतरी अडथळे येतात. कितीतरी वेळा आपल्याला अपयशाचा सामना करावा लागतो. परंतु बुद्धिमान व्यक्ती या सर्व गोष्टीतून मार्ग काढून आपले ध्येय व लक्ष पूर्ण करतात. सर्वात मोठा स्वामी मंत्र हा आहे. आपले भविष्याबद्दल किंवा करियर बद्दलचे सिक्रेट किंवा आपल्या सफलतेचे काही राझ कोणालाही सांगू नका. स्वामींच्या मते पत्नी किंवा पतीला देखील हे राझ सांगू नये. कारण आपले सर्व गुपित इतरांना माहीत असतील तर ते आपल्याला वेळप्रसंगी बरबाद करू शकतात.

आपल्यामध्ये काही उणीव असेल किंवा कमतरता असेल तर ती इतरांना दाखवू नये. आपल्यामध्ये काहीही कमजोरी असेल तर ती इतरांना दाखवू नये.आपण आतून कितीही कमजोर असलो तर समोरच्या व्यक्तीला आपली मजबुती व ताकद दाखवावी. आपण किती शक्तिशाली आहोत हेच दाखवावे. नाहीतर समोरची व्यक्ती आपल्या कमजोरीचा फायदा घेते. आपल्यातील कमीपणा इतरांना दाखवून स्वतःचा अनादर करू नये.

मित्रांनो, भीती तर सर्वांनाच वाटते परंतु आपण जितके जास्त घाबरतो तितकी जास्त भीती वाढत जाते. हे भीती दूर करण्याचा सर्वात चांगला उपाय आहे ज्यामुळे भीती निर्माण होत नाही ही बाबच नष्ट करून द्यावी म्हणजे मनातील भीती नाहीशी होईल. कोणतेही कार्य सुरू करण्याआधी स्वतःला हे तीन प्रश्न विचारा. पहिला म्हणजे मी हे काम का करतोय? दुसरा म्हणजे याचे काय परिणाम होतील? आणि तिसरा म्हणजे मी यामध्ये यशस्वी होईल का? याचा गंभीरपणे विचार केल्यानंतर या तीनही प्रश्नांची उत्तरे सकारात्मक येत असतील तरच या कामाला सुरुवात करा.

एखाद्या प्रश्नाचे उत्तर नकारात्मक येत असेल तर कामात बदल करा. आणि असे काम निवडा ज्याची सर्व उत्तरे सकारात्मक येतील. फुलांचा सुगंध हवेच्या दिशेने पसरतो. परंतु चांगल्या व्यक्तींचे कर्तुत्व चारही दिशांना पसरते. आपल्या भूत काळातील घडून गेलेल्या गोष्टींबद्दल पश्चाताप करत बसू नका. तसेच भविष्य काळाबद्दल विचारही करत बसू नका. चांगल्या माणसांची ओळख ही वर्तमानात जगणे आहे. कारण जे घडून गेले त्याबद्दल पश्चाताप करून काहीही उपयोग नाही. आणि भविष्यात काय होईल हे माहीत नसताना त्याबद्दल चिंता करून काय उपयोग? म्हणून आजचा दिवस चालतो तो चालतो.

तोच खरा त्या तत्त्वाप्रमाणे जे करायचे आहे ते आज आणि आत्ताच करा. काल किंवा उद्याकडे बघत बसू नका. जे वर्तमानात जगतात त्यांना नक्कीच सफलता मिळते. कोणतेही कार्य करायचे असेल तर मनापासून त्या कार्याकडे लक्ष द्या. काही व्यक्ती कामाला जोषात सुरुवात करतात. पण नंतर त्यांचा त्या कामातील जोश कमी होतो. व ते त्या कार्यामध्ये सफल होत नाहीत. यशस्वी होत नाहीत म्हणुन आपले ध्येय व लक्ष बनवा. त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करा. आपले शंभर टक्के प्रयत्न त्या कार्यामध्ये लावा. तुम्हाला नक्कीच सफलता मिळेल. तुम्ही त्या कामामध्ये यशस्वी नक्कीच व्हाल.

पण आपण असे म्हणतो की आपल्या स्वतःच्या चुकांमधून शिकले पाहिजे. परंतु आपले आयुष्य इतके मोठे नाही की प्रत्येक गोष्ट करताना चुकाल व त्यातून शिक्षा घेऊन ते काम नीट करावे म्हणून इतरांच्या चुका बघून आपणही आपल्या जीवनात सुधारणा करू शकतो. याद्वारे आपल्याला खूप काही शिकता येते. आणि आपण आपल्या कार्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. तुम्ही नेहमी आनंदात राहणे हे तुमच्या शत्रुसाठी सर्वात मोठी सजा आहे. तुमचा कोणताही शत्रू तुम्हाला आनंदात बघू शकणार नाही. तुम्हाला दुःखात बघून शत्रूला आनंद होईल. व त्यासाठी तो काहीही करू शकतो.

म्हणूनच तुम्ही आनंदी राहणे, बाकी काही न करता तुमच्या शत्रूला दुःख देण्यासारखे आहे. मैत्री अशा व्यक्तींसोबत करावी जे आपल्या बरोबरीचे आहेत. आपल्यापेक्षा खूप मोठ्या किंवा आपल्यापेक्षा लहान व्यक्तींबरोबर मैत्री करू नये. जर तुमचा मित्र तुमच्यापेक्षा श्रीमंत असेल तर त्याच्या सुख-सुविधा आणि पैसा-अडका बघून तुम्हाला इर्षा होईल व तुम्ही दुःखी व्हाल. आणि जर मित्र गरीब असेल तर त्याच्या मनात तुमच्या बद्दल इर्षा उत्पन्न होईल. अशा दोन्ही स्थितीत तुम्ही आनंदी राहू शकत नाही.

काही व्यक्ती अशा असतात की आपल्या नशिबात सर्व काही लिहले असेल तर इतके प्रयत्न करून काय उपयोग? परंतू आपल्या नशिबात असे लिहले असेल की पर्यंत केले तरच यश मिळते तर म्हणून प्रयत्न करणे कधीही सोडू नये. नशीब त्याचे त्याचे बनत नसते त्याला कर्माद्वारे चांगले किंवा वाईट घडवावे लागते. स्वामी म्हणतात जर कुबेर आपल्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करू लागला तर एक दिवस तोही कंगाल होईल.

जर आपले उत्पन्न कमी असेल आणि खर्च जास्त असतील तर आपण लवकरच कंगाल होऊ शकतो. म्हणून खर्चाला आळा घाला आणि उत्पन्ना मध्ये वाढ कशी होईल ते पहा. मूर्खाकडून प्रशंसा ऐकण्यापेक्षा विद्वणांकडून बोलणे खाणे कधीही चांगले. कारण मूर्ख व्यक्ती कधीही खरे बोलत नाही. विद्वान लोकांच्या रागवण्यामध्ये चांगला उद्देश असतो. कोणतेही काम करताना त्यात मिळणाऱ्या अपयशाला घाबरून न जाता कार्य करत रहा. धन्यवाद!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.