नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे.ही एक खूप छान स्टोरी आहे. खरच खूप काही शिकवून जाणारी आहे. जोडीदार या नावाची स्टोरी आहे आणि लग्न, से क्स त्यानंतर आपण उडवणारी खिल्ली काय केलं, कसं केलं हे मित्रांमध्ये चालणारे विषय जरा वेगळी आहे, हटकी आहे. तुम्हाला ऐकायला बरी वाटेल पण शेवटी खूप संदेश देऊन जाणारी आहे…
काल रात्री तीन कट काढलेस आंघोळीनंतर डोके पुसतंच बाथरूमधून बाहेर पडलेले केतनकडे पाहत श्रेयाने तो प्रश्न केला होता. सॉरी समजलो नाही. अगदी अचंबित होऊन केतनने त्यावेळी ते वाक्य श्रेयाकडे चालत जात विचारलं. अरे काल रात्री से क्स करताना तू मला तीन वेळेस केलस ना. तेच कन्फर्म करतेय. हातातील मोबाईलमधील मॅसेज वाचतच श्रेयाने ते वाक्य सलग उच्चारले होते. तू माझा मोबाईल चेक केला, तू माझ्यावर संशय घेतेय.
लग्नाला अजून पाच दिवस झाले नाहीत अजून आणि लगेच तुला माझा मोबाईल चेक करावासा वाटला. श्रेयाच्या हातातील मोबाईल हिसकावून घेत रागाच्या भरात केतनने ते वाक्य उच्चारले. केतन तुझ्या मोबाईलला पॅटर्न लॉक नाही आहे आणि त्यात अचानक सलग मॅसेज आले आणि उत्सुकतेपायी तुमचा ग्रुप चेक केला. त्यावेळी ओघळणाऱ्या अश्रुंचे थेंब बाजूला सारत श्रेयाने ते वाक्य उच्चारले होते. अरे पण प्रा य व्ह सी नावाची गोष्ट आहे की नाही. लग्न म्हणजे माझं स्वतःच अस आयुष्यच नाही.
अगदी संतापलेल्या देहबोलीने चढलेल्या आवाजातच केतनने ते दोन प्रश्न श्रेयाकडे बघत उच्चारले होते. प्रा य व्ह सी, माझं आयुष्य अरे मला तर वाटत होते लग्न झाले त्या दिवशी आपल्या दोघांचं एकच आयुष्य झालंय. म्हणजे यापुढे आहे ती प्रा य व्ह सी आपल्या दोघांची प्रा य व्ह सी असेल. मात्र बरं झालं त्यानिमित्ताने माझा तो ही भ्रम दूर झाला. चेहऱ्याला दोन्ही हातांनी झाकून घेत श्रेयाने अगदी अस्वस्थ स्वरात ते वाक्य उच्चारले होते. तू गैरसमज करून घेतेस श्रेया.
माझा उद्देश अजिबात तसा नव्हता आणि मुलांमध्ये तशी चर्चा होतच असते. तुला नाही समजणार ते. तू उगाच इशू करतेस. अंगामध्ये येणारे चढवून हातातील सि गा रे ट पेटवतच निर्ढावलेल्या स्वरात केतनने ते वाक्य उच्चारले. काय गैरसमज रे. मला तू सगळ्या मित्रांसोबत तू अक्षरशः ना ग डी केलीस काल रात्री माझ्या ब्रा चा रंग, माझ्या अंगावरच तीळ आणि माझा स्टॅ मि ना. अरे लाज कशी वाटली नाहि रे तुला नालायक माणसा.
अगदी आक्रमक देहबोलीने केतनच्या दिशेने धावून जाण्याने श्रेयाने स्वतःच्या रागावर आवर घातला आणि ती पुन्हा बेडवर बसली. सॉरी त्यावेळी हातातील सि गा रे ट खिडकीच्या काचेवर विझवत तो एक शब्द उच्चारला होता. काय सॉरी! स्वतःच पुरुषार्थ सिद्ध करण्यासाठी कुठल्याही थराला जाणार. मला माझ्या मैत्रीनींनी देखील सकाळी मॅसेज केला. पहिल्या रात्रीबद्दल खोदून खोदून विचारत होत्या पण काय सांगावं आणि काय सांगू नये याची अक्कल मला आहे.
तुझ्यासारखी नाही मी आणि हाच फरक आहे आपल्या दोघांमध्ये. स्वतःच्या हातातील मोबाईल केतनच्या दिशेने फिरकावत श्रेयाने ते वाक्य उच्चारले होते. श्रेया सॉरी ना, चुकलो मी. मान्य करतो माझी चूक झाली. त्यावेळी दोन्ही हात जोडून जणू केतनने हातबल देहबोलीने विनवणी करण्याचा सर्वोत्तपरी प्रयत्न करत होता. अरे मी सांगू का माझ्या मैत्रिणींना काल रात्री तुझं शी घ्र प त न झाले ते. म्हणजे तुझ्या भाषेत सांगायचे झाले तर पंधराव्या सेकंदाला गळलं तुझं.
असं काही सांगितलं तर त्यांनाही वाचायला मजा येईलच ना. मात्र तुझ्या परपुरुषत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होईल त्याचं काय? बेडच्या बाजूला ठेवलेल्या पाण्याचा गोठ उतरवत श्रेयाने ते सलग वाक्य उच्चारले. चुकलो मी. माफ कर मला. माझी चूक झाली. यापुढे असं काही होणार नाही. एक संधी दे मला. श्रेयासमोर दोन्ही गुडघे टेकून बसलेल्या केतनने स्वतःचे डोके तिच्या गुडघ्यावर ठेवतच तेव्हा आपला माफीनामा सादर केला.
अरे जोपर्यंत तू मला मादी आणि स्वतःला नर समजून वागशील तोवर हेच होणार आहे. फक्त तुझी बायको एक माणूस आहे तीलाही एक मन आहे, भावना आहे. या गोष्टी तुला जाणवतील त्याच दिवसापासून आपला संसार खऱ्या अर्थाने सुरू होईल. नाहीतर तो आयुष्यभर एक व्यवहार असेल.
रात्री मी तुझ्या शरीराची भूक भागवण्याचा आणि दिवसा तू माझ्या पोटाची भूक भागवण्याचा. श्रेयाने ते वाक्य उच्यारल्यानंतर रूम मध्ये एकच निरव शांतता पसरली. मात्र त्यानंतरही बराच वेळ त्या दोघांमध्ये हुंदके एकमेकांशी जिव्हाळ्याचा संवाद साधत होता. धन्यवाद.
नोट: जर तुम्हाला कथा उत्तम वाटली, तर खाली दिलेल्या कमेन्ट बॉक्समध्ये तुम्ही कमेन्ट करू शकता. ही पोस्ट आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. या प्रकारे आम्ही नवीन माहिती लेखाच्या माध्यमातून तुमच्यासाठी घेऊन येऊ. धन्यवाद!