होळी येण्यापूर्वी घरात आणा हि १ वस्तू पैसा इतका येईल कि सांभाळू शकणार नाही…

मित्रांनो, हिंदू धर्मामध्ये सणांची काही कमतरता नाही. हे सण जितके आनंदी, उत्साही तितकेच अर्थपूर्ण ही आहेत. शेवटचा मराठी महिना म्हणजे फाल्गुन. या महिन्यातील पौर्णिमेला येणारा सण म्हणजे होळी. हा होळीचा सण जवळ आला आहे. होळीचा सण म्हणजे दुष्ट प्रवृत्ती, वाईट विचारांचा नाश करून चांगली प्रवृत्ती, चांगले विचार अंगी बाळगावे, हा या सणामागील उद्देश आहे. दुसरा दिवस म्हणजे रंगपंचमीचा. आपले जीवन देखील आनंदाने रंगात रंगून जावे. असा संदेश रंगपंचमीचा सण देत असतो.

मित्रांनो होळी, दिवाळी या सारख्या तांत्रिक रात्री धन, पैसा मिळवण्यासाठी अनेक तांत्रिक उपाय केले जातात. माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी विविध उपाय तंत्र शास्त्रामध्ये केले जातात. जर आपल्या घरांमध्ये आर्थिक समस्या आहेत, आर्थिक अडचणी आहेत, पैसा टिकत नाही किंवा येत नाही, अशा जर समस्या असतील तर त्या दूर व्हाव्यात, यासाठी अशा विशिष्ट तिथींना करायचे, काही उपाय शास्त्रांमध्ये सांगितले आहेत. या तिथींना केलेले उपाय शीघ्र फलदायी ठरतात. म्हणजेच काही दिवसांमध्ये त्याचा सकारात्मक परिणाम दिसू लागतो.

मित्रांनो होळी पौर्णिमेच्या रात्री येते. या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक खास उपाय केले जातात. मित्रांनो आता पुढील सांगितलेल्या वस्तू माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरी घेऊन यायच्या आहेत. या वस्तू आपल्याला होळीच्या आधीच घरांमध्ये आणायचे आहेत. प्रत्येक व्यक्तीला पैसा हवा असतो, आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या गरजा पूर्ण करता याव्यात, आपले जीवन आनंदी असावे असे प्रत्येकालाच वाटत असते.

तरी यासाठी आपल्याला होळीच्या आधी काही वस्तू आपल्या घरामध्ये आणायचे आहेत. पहिली वस्तू आहे ती म्हणजे महालक्ष्मी यंत्र, कुबेर धन वर्षा यंत्र किंवा लक्ष्मी कुबेर यंत्र. यापैकी कोणतेही एक यंत्र आपल्याला होळीच्या आधी घरी आणायचे आहे. आणि होळीच्या दिवशी देवघरामध्ये हे यंत्र आपल्याला स्थापित करायचे आहे. या यंत्राची स्थापना देवघरामध्ये करायची आहे. असे केल्याने तुमच्या घरात कोणतीही धन समस्या राहणार नाही. आर्थिक अडचणी येणार नाहीत.

दुसरी वस्तू आहे ती म्हणजे पिंपळाचे पान. आज पासून ते होळीच्या दिवसापर्यंत दररोज एक पिंपळाचे पान घरी आणायचे आहे. आणि त्या पानावरती कुंकवाने तुमच्या मनातील इच्छा लिहायची आहे. कुंकुवा मध्ये थोडेसे पाणी मिक्स करून त्या मिश्रणाने पानावरती तुमच्या मनातील इच्छा लिहायची आहे. असे दररोज होळीच्या दिवसापर्यंत करायचे आहे. आणि होळीच्या दिवशी तुम्हीही सर्व पाने होळीमध्ये अर्पण करायचे आहेत. आणि अशी प्रार्थना करायची आहे की, माझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे.

मित्रांनो तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे तुळस. जर तुम्हाला तुळस आणायचची असेल तर होळीच्या आधी आपल्या घरामध्ये तुळस अवश्य आणा. तुळशीमध्ये दिव्यशक्ती आकर्षित करण्याची क्षमता असते. आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा तुळशीच्या प्रभावाने नष्ट होते. मित्रांनो पुढील गोष्ट आहे ती म्हणजे चांदीचा सिक्का. माता लक्ष्मी किंवा गणेशाचे चित्र असणारा चांदीचा सिक्का तुम्हाला होळीच्या आधी घरामध्ये आणायचा आहे आणि होळीच्या दिवशी या शिक्क्याची विधिवत पूजा करून तिजोरीमध्ये जिथं तुम्ही तुमचे मौल्यवान वस्तू किंवा धन ,पैसे ठेवतात इथे तुम्हाला हा शिक्का ठेवायचा आहे.

शेवटची गोष्ट आहे ती म्हणजे मोरपंख. मित्रांनो होळीच्या आधी तुम्हाला हे मोरपंख आणायचे आहेत. तुम्ही हे मोरपंख घरातील विविध कोपऱ्यामध्ये ठेवू शकता. होळीच्या दिवशी हे मोरपंख होळी पेटत असताना त्यावर सात वेळा फिरवून आपल्या घरामध्ये ठेवायचे आहे. तुम्ही तुमच्या हॉलमध्ये, किचनमध्ये, देवघरात कुठेही ठेऊ शकता. यामुळे जर तुमच्या घरामध्ये वादविवाद होत असतील पती-पत्नीमध्ये कलह होत असतील तर ते दूर होतात. आणि कुटुंबातील व्यक्ती मध्ये प्रेम वाढेल.

मित्रांनो या वस्तू सांगितल्या ज्या होळीच्या आधी आणायचे आहेत कारण जर त्या दिवशी सांगितल्या तर त्या आणता येत नाहीत. त्यामुळे होळीच्या आधी ज्या वस्तू आणायच्या आहे त्याची तयारी आतापासून करावी. आणि या सर्व वस्तू आपल्या घरामध्ये आणाव्या. असे केल्याने तुमच्या जीवनात ज्या आर्थिक अडचणी असतील, काही समस्या असतील आणि पैसा टिकत नसेल तर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी वरील उपाय अवश्य करा. कमेन्ट बॉक्स मध्ये “जय माता दी” लिहायला विसरू नका.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा Mahiti.in उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात. Mahiti.in कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका. धन्यवाद!.

Leave a Reply

Your email address will not be published.