त्या इथं अस म्हणतात की लग्नानंतर आणखीनच कुठर ओढ कारण लग्नाच्या पहिल्या रात्रीपासूनच तीच शरीर म्हणजे त्याच्या हक्काचं खेळण. वाट्टेल तस आणि वाट्टेल तेव्हा खेळायला तिला काय हवं कसं हवं त्या क्षणाला हवं की नको याचा विचारच नाही. कारण पुरुषार्थ सिद्ध करायचा असतो ना. मित्रात पुशारखी मारायची असते. कशी बाजी जिंकली ते.
तिथं तर तिने काही बोलायलाच नको नाहीतर तुला कसं माहिती, तुला कसं कळतं. तिथं तर तिने बोलायलाच नको, मग किती लोकांसोबत अफेयर वगैरे वगैरे.. आणि या एकाच गोष्टीवरती टाकाऊ होऊन जातात. पण ते कोणाला विचारणार. तू कसं शिकलास, तुला कसं कळलं, तू एवढा सराईत कसा. किती मुलींसोबत शय्यासोबत केली. तिच्या मनातील प्रश्न मात्र अनोत्तरीत तिच्या अपूर्ण आयुष्यसारखे.
मग आयुष्य सारे एका कळसुतरी बाहुलीसारखे डोलायचे आणि किती विचित्र असते तिच्या आयुष्यातील नाती. म्हणजे बघा ना भावाचा मित्र भाऊ, नवऱ्याचा भाऊ दीर तो लहान भावासारखा, नवऱ्याचे मित्र भाऊजी म्हणजे पुन्हा भाऊच पण बहिणीची मैत्रीण प्रियसी बायकोची बहीण अर्धी बायको, बायकोच्या मैत्रिणी सुद्धा अर्ध्या बायका.
एकंदरीत काय तर सारी मर्यादा सारी बंधन ही तिच्यासाठी तिला बांधून ठेवण्यासाठी त्याला सर्वच मार्ग मोकळे, त्याला निसर्गाने दोघांनाही या संवेदना योनी इच्छा या सारख्याच दिल्या तर एकाचीच पूर्तता का? दुसऱ्याला अलिप्तता का? जवळपास दीड महिन्यांपूर्वी माझी कॉलेज मैत्रीण अनुपमा जी आता नाशिकमध्ये वास्तव्यास आहे, भावाच्या लग्नासाठी वर्धेत आली होती. मी ही गेलेली.
खूप खुश दिसत होती पण डोळ्यातील अवदासींनी जाणवत होते की कॉलेजात असल्यापासून सारं काही मनातलं एकमेकांना सांगत असू. आम्ही खूप मनाने जवळ होतो. निवांतपण गाठून जेव्हा मी तिच्याशी बोलले तेव्हा विचारात पडले जिवंतपणा सरसरून भरलेली माझी मैत्रीण इतकी गंभीर आणि उतार वयातील स्त्रीयांसारखी उदासीन ते ही वयाच्या तिशीतच.
कॉलेजमध्ये असताना रोमान्स, रोमँटिक सिनेमे, हसणं, भरभरून जगणं जगत असलेली माझी मैत्रीण जिवनापासून वैराग्यच स्वीकारलेले तिने. तिच्या म्हणेने तिच्या नवऱ्यासोबतच्या शारीरिक संबंधाचा तिला तिटकारा येतो अशी कुठलीच इच्छा वाटत नाही रोज तो येतो रात्री कपडे काढतो यंत्रावर शारीरिक क्रिया करतो आणि झोपतो. मी तशीच असते. मला काहीच वाटत नाही.
ती मला विचारत होती संबंध असेच असतात का ग. आपण पुस्तकांमध्ये बरेच काही वाचतो पण प्रत्यक्षात असं काहीच नसते. तुला पण असंच होत का. काय बोलणार मी, निरुत्तर होते. यात दोष कोणाचा जीला संभोग काय? रातक्रिया काय हे आजवर कळले नाही. जीला अजून सहवास लाभला नाही तिचा की जो जिवंत आहे जो तिला यंत्रभाग बाहुलीसारखे वापरतो त्याचा.. तुम्हाला काय वाटते कंमेंट मध्ये सांगा.
नोट: जर तुम्हाला कथा उत्तम वाटली, तर खाली दिलेल्या कमेन्ट बॉक्समध्ये तुम्ही कमेन्ट करू शकता. ही पोस्ट आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. या प्रकारे आम्ही नवीन माहिती लेखाच्या माध्यमातून तुमच्यासाठी घेऊन येऊ. धन्यवाद!