गरुड पुराण: या 4 लोकांच्या घरी चुकूनही जेवण करू नका, नाहीतर…

हिन्दू धर्मात पुराण आणि शास्त्रांना खूप महत्व आहे. या पुराणांमध्ये एक पुराण आहे- “गरुड़ पुराण”. गरुड़ पुराणाची रचना महर्षि वेदव्यास यांनी केली होती. या पुराणात मनुष्याच्या जीवनाशी संबंधित कितीतरी रहस्यांचे वर्णन केले गेले आहे, त्याचबरोबर काही मनोरंजक गोष्टी पण सांगितल्या आहेत. या पुराणात अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या मनुष्याच्या जीवनसाठी खूपच आवश्यक आहेत. या पुराणात काही अशा लोकांबद्दल सांगितले आहे, ज्यांच्या घरी आपण कधी चुकूनही भोजन करू नये. आज आम्ही आपल्याला याबद्दल थोडी माहिती देणार आहोत.

गु न्हे गा र किंवा चोर: गरुड़ पुराणामध्ये सांगितले आहे की, कधीही कोणत्याही गु न्हे गा र किंवा चोर माणसांच्या घरी भोजन करू नये. कारण की, अशी व्यक्ति स्वत: मेहनत करीत नाही, कोणालातरी लुबाडून त्याने पाप कर्म करूनच ही संपत्ति साठवलेली असते. अशा वेळी, जर आपण अशा व्यक्तीच्या घरी भोजन केले, तर कुठे न कुठे आपणसुद्धा त्याच्या पापाच्या कमाईचे भागीदार होतो.

म्हणूनच, कधीही अशा व्यक्तीच्या घरी भोजन करू नये. चरित्रहीन स्त्री: गरुड़ पुराणामध्ये सांगितले आहे की, चरित्रहीन स्त्री किंवा वाईट वर्तन असलेल्या स्त्रीच्या घरी कधीही भोजन करू नये. असे यासाठी, की अशी स्त्री साध्या व सरळ मार्गी लोकांना धोका देते. अशा स्त्रीच्या घरी भोजन करण्यामुळे तुम्हीपण तिच्या मलिन वर्तणुकीचे भागीदार होता. एवढेच नाही, तर अशा स्त्रीशी संबंध ठेवल्यामुळे समाजात आपली प्रतिमा खराब होते.

सावकार: असे लोक जे दुसर्‍याला उधार देतात आणि त्यांच्याकडून व्याज वसुल करतात, असे लोक सावकार म्हणून ओळखले जातात. अशा लोकांपासून नेहमीच दूर राहिले पाहिजे. असे लोक जरुरीच्या वेळेस पैसे देऊन लोकांची मदत तर करतात, परंतु ते पैसे दामदुप्पट व्याज आकारून वसुल करून लोकांना त्रास पण देतात.

म्हणून, अशा लोकांकडे भोजन करू नये, कारण तर ते तुम्हाला त्यांच्या वाईट प्रवृतीला बळी पाडू शकतात. तसेच त्यांच्या कमाईमध्ये लोकांकडून दामदुपटटीने व्याजाचे पैसे वसुल केलेले असतात, जे लोकांना त्रास देऊन मिळवलेले असतात. त्या त्यांच्या प्रवृतीचा आपणही भागीदार होऊ शकतो, म्हणून त्यांच्याकडे भोजन करणे टाळावे.

रागीट व्यक्ति: गरुड़ पुराणामध्ये अशा लोकांकडे भोजन करण्यापासुन सावधान केले आहे, जे छोट्या छोट्या बाबतीत चिडतात, ज्यांना पटकन राग येतो. अशा रागीट लोकांबद्दल आपण काही सांगू शकत नाही. कोणती गोष्ट त्यांना राग यायला किंवा चिडायला कारणीभूत ठरू शकेल, याचा अंदाज कोणीच करू शकत नाही. म्हणून, अशा लोकांकडे भोजन करू नये, जे तुमचे रागाच्या भरात कोणतेही नुकसान करू शकतात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा. 

Leave a Reply

Your email address will not be published.