देवाची पुजा करताना जांभई येणे, डोळ्यात अश्रू पाणी येणे यामागील कारण जाणून घ्या…

काही वेळेला तुम्हाला जाणवले असेल, की पुजा करताना आपल्या डोळ्यात अश्रु येतात. शास्त्रानुसार,बघितले तर,पुजा करताना डोळ्यात अश्रु येणे, डोळे मिटल्यासारखे वाटणे, झोप येणे, जांभई येणे किंवा शिंक येणे, हे एक मोठे रहस्य आहे. आज आम्ही तुम्हाला पूजेच्यावेळी नकळतपणे घडणार्‍या या मजेदार गोष्टीबद्दल सांगणार आहोत. चला, तर मग जाणून घेऊया की, पुजा करताना का येतात आपल्या डोळ्यात अश्रु, का येते जांभई, का वाटते आपल्याला झोप किंवा शिंक येते आहे व हेच अश्रु आपली पुजा सफल झाल्याचा संकेत आहे का?

मनाची दोलायमान अवस्था सुरू होणे: शास्त्रामध्ये लिहिले आहे की, सच्या मनाने व भक्तिभावाने केलेली पुजा सदैव देव स्वीकार करतात. त्याचे फळ आपल्याला नक्कीच मिळते. पण,जर कोणत्याही व्यक्तिला पुजा करताना जांभई किंवा झोप येत असेल, तर त्याचा अर्थ असा होतो की, ती व्यक्ति दोलायमान मनस्थितीत आहे.

त्या व्यक्तीच्या मनात अनेक प्रकारचे विचार चालू आहेत, पूजेत त्याचे लक्ष नाही. विचारांची गुंतागुंत चालू आहे व ती मनाला शांतता मिळू देत नाही. जर तुम्ही काही संकटात आहात व त्यातून बाहेर पडण्यासाठी देवाची भक्ति करीत आहात, तर तुम्हाला जांभई किंवा झोप येऊ शकते.

देवाने आपल्याला काही संकेत देणे : शास्त्रात व पुराणात असे सांगितले गेले आहे, की जर पुजा पाठ करताना तुमच्या डोळ्यातून अश्रु येऊ लागले, तर तुम्ही समजले पाहिजे, की तुम्हास ईश्वरी शक्ति काहीतरी शुभ संकेत देत आहे. जर तुम्ही देवाच्या कोणत्याही रूपात किंवा ध्यानात व पूजेत मग्न झाला असाल.

देवाला मनोभावे प्रार्थना करीत असाल, तर त्याचा अर्थ असा की देवाच्या भक्तीत तुम्ही तल्लीन झाला आहात. आपण असेही म्हणू शकतो, की तुम्ही केलेली त्याची पुजा सफल झाली आहे, जी तुमच्या खुशीमुळे अश्रुंच्या रूपात बाहेर येते आहे. कधीही मांनापासून केलेली गोष्ट ही नेहमीच यशस्वी होते.

नकारात्मकता असणे : काही वेळेला असे बोलले जाते, की पूजेच्या वेळेला येणारे डोळ्यातले अश्रु व जांभई यांचे एक कारण म्हणजे तुमच्यातील नकारात्मकता असू शकते. जेव्हा केव्हा आपले मन पुजापाठ, धार्मिक ग्रंथ किंवा आरती करण्यामध्ये लागत नाही. शरीराला जडत्व वाटू लागते, तर तुम्ही समजले पाहिजे, की कोणतीतरी नकारात्मक ऊर्जा किंवा शक्ति तुमच्या आसपास नक्की अस्तित्वात आहे व ती तुमच्या मनाची एकाग्रता होऊ देत नाहीये. तुमचे चित्त विचलित करीत आहे.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published.