धान्यातील किडे 5 मिनिटात 100% बाहेर, पारंपारिक घरगुती उपाय, पुन्हा कधीच किडे होणार नाहीत…

नमस्कार मित्रांनो. आपण कोणत्याही प्रकारचे धान्य, कडधान्ये यामध्ये गहू, डाळी, ज्वारी, बाजरी, मुगडाळ, तूरडाळ, हरभरा डाळ तसेच मटकी, चवळी या कडधान्यांना देखील वर्षभर कीड लागू नये म्हणून म्हणजेच जाळ्या, आळ्या किंवा किडे होऊ नयेत यासाठीचे घरगुती उपाय आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो बऱ्याच घरामध्ये एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये वर्षभर लागणारे धान्य एकदाच भरून ठेवले जाते म्हणजेच साठवून ठेवले जाते.

यांना कीड, आळी किंवा जाळी लागू नयेत, खराब होऊ नयेत म्हणून आपण यात औषध किंवा गोळ्यांचा वापर देखील करतो आणि मग याचा नकळतपणे आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. म्हणून मित्रांनो कोणत्याही प्रकारचे औषध किंवा गोळ्यांचा वापर न करून आपल्या घरातील धान्ये वर्षभरासाठी जशाच तसे आणि चांगल्या पद्धतीने राहण्यासाठी, खराब न होण्यासाठी जर तुम्ही हे घरगुती उपाय केले तर आपल्या आरोग्यावर याचा कोणताही साइड इफेक्ट देखील होणार नाही आणि वर्षभर आपले धान्य देखील चांगले राहील.

तर सर्वप्रथम आपण आपल्या धान्यांना कीड लागूच नये यासाठीचा उपाय पाहणार आहोत आणि जर कीड लागली असेल तर त्यातील कीड, आळ्या आणि जाळी बाहेर काढण्यासाठी घरगुती उपाय पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण आपल्या धान्यात किडच होऊ नये यासाठी काय करावे ते पाहुया. वर्षभरासाठी आपण गहू, मूग, ज्वारी, तांदूळ कडधान्ये डाळी आपण भरतो त्या सर्वप्रथम व्यवस्थित चाळून, गाळून आणि निवडून घ्याव्यात. त्यानंतर त्याला चांगल्या प्रकारे ऊन देऊन म्हणजेच चांगल्याप्रकारे वाळवून एक दिवस थंड करून चांगल्या हवाबंद डब्यात किंवा ज्यामध्ये तुम्ही ठेवता त्यामध्ये ठेवावे.

परंतु हे ठेवत असताना आपल्याला त्यामध्ये दुसरा घटक ऍड करायचा आहे तो म्हणजे कडुलिंबाची पाने. ही कडुलिंबाची पाने आपल्याला वाळलेली घ्यायची आहेत. यामध्ये कडुलिंबाची पाने, कडुलिंबाच्या काड्या याचादेखील तुम्ही वापर करू शकता. अशी ही वाळलेली कडुलिंबाची पाने आपल्याला वेगळी करून घ्यायची आहेत. याचे बारीक बारीक तुकडे करून या धान्यात ऍड करायचे आहे. एकदा व्यवस्थित धान्य निवडून ठेवल्यानंतर वर्षभर त्यामध्ये जाळ्या, आळ्या किंवा कीड देखील लागणार नाही आणि आपल्या शरीरावर देखील याचा कोणताही परिणाम होणार नाही.

तर सर्वप्रथम आपल्याला एक थर आपल्या गव्हाचा किंवा तुमचे जे धान्य, कडधान्ये आहेत त्याचा थर ठेवायचा आहे. दुसरा थर आपल्याला या कडुलिंबाच्या पानांचा ठेवायचा आहे. परत तिसरा थर हा आपल्या धान्याचा ठेवायचा आहे. परत एकदा कडुलिंबाच्या पानांचा थर घालायचा आहे. अशाप्रकारे आपले धान्य थरावर थर असे ठेवायचे आहे. या उपायाने तुमच्या धान्यांना वर्षभर कीड लागणार नाही. वाटल्यास सहा महिन्यानंतर परत हे धान्य काढून परत एक वेळ चाळून आणि परत दुसरे कडुलिंबाची पाने अशाप्रकारे ठेवली तर वर्षभर किंवा त्यापेक्षाही अधिक वेळ जरी धान्य राहिले तरी त्याला किड, आळी किंवा जाळी होणार नाही. अशाप्रकारे मित्रानो कीड लागूच नये यासाठीचा उपाय आपण पहिला आहे.

आता आपण दुसरा उपाय पाहू जर आपल्या कडधान्यांना किड लागली आहे तर त्यातील किड, आळ्या बाहेर काढण्यासाठी काय करावे? समजा तुमच्या गव्हाला किड लागली आहे. तर ती किड बाहेर काढण्यासाठी आपल्याला लागणार आहे तो म्हणजे न्युज पेपर. या न्युज पेपरचे लहान लहान तुकडे करून घ्यायचे आहेत. अशाप्रकारे लहान लहान तुकडे ज्या धान्यांना कीड लागली असेल त्या धान्यामध्ये हे पूर्ण लहान लहान तुकडे मिक्स करायचे आहेत. मिक्स करून एका पसरट भांड्यामध्ये हे धान्य आपल्याला ठेवायचे आहे. आपल्या धान्यातील कीड पूर्णपणे बाहेर निघण्यास मदत होते. त्यानंतर परत ते चाळून, गाळून आणि त्यामध्ये जर कडुलिंबाचा पाला मिक्स करून भरून ठेवले तर त्यामध्ये किड होणार नाही आणि आहे ती किड पुर्णपणे निघून जाणार आहे.

आता उपाय नंबर तीन पाहुया. आपण एक महिन्यासाठी जे धान्य आपण बरणीमध्ये किंवा डब्यामध्ये काढलेले असते. ते धान्य देखील संपेपर्यंत जशाच तसे राहण्यासाठी किंवा त्यामध्ये किड न होण्यासाठी आपण आणखी एक उपाय नक्कीच करू शकतो. हा उपाय आपण शेंगदाणे किंवा तांदूळ, डाळी, रवा यामध्ये देखील करू शकतो. तर यासाठी आपणाला लागणार आहे लवंग आणि मिरे. एक किलो तांदळासाठी दहा बारा लवंग आणि दहा बारा मिरे ऍड करू शकता किंवा पाच किलो डब्यामध्ये एक मूठभर मिरे आणि लवंग मिक्स करू शकता. यालादेखील कुठल्याही प्रकारची किड लागत नाही. याचा आपल्या शरीरावर साईड इफेक्ट होत नाही आणि याचा वास देखील येत नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वापरत असताना त्यामधील लवंग आणि मिरे बाजूला काढून परत पुढच्या महिन्यातील धान्यामध्ये मिक्स करू शकतो.

अशाप्रकारे रोजच्या वापरातील धान्यांना देखील कीड न लागण्याचा हा उपाय आहे. म्हणून वर्षभरासाठी साठवून ठेवलेले धान्य खराब होऊ नये यासाठी किंवा त्यामध्ये किड, आळ्या, जाळी ना होण्यासाठी जर तुम्ही हे घरगुती उपाय केले तर आपले आरोग्य देखील चांगले राहील आणि आपले धान्यदेखील वर्षभरासाठी चांगले राहील.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.