नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. घराची कितीही आपण साफसफाई करत असलो तरी घरामध्ये कोळी, स्पायडर ज्याला आपण मकडी म्हणतो. ते जाळे विणल्याशिवाय अजिबात राहत नाहीत. जास्त करून छताला, कोपऱ्यात ज्या ठिकाणी तुमचा वावर कमी आहे त्या ठिकाणी हे कोळी किडे जाळे विणत असतात. कितीही तुम्ही साफसफाई केली तरी ही समस्या निश्चित जाणवते. जर तुमचे घर एक दोन दिवस बंद असेल तर याचं प्रमाण खूप वाढते.
जर तुमचे घर सात आठ दिवस बंद असेल, तुम्ही बाहेरगावी गेला असेल आणि जर तुम्ही घरी परत आला असेल तर तुम्हाला घर उघडायची भीती वाटते. इतकं जास्त प्रमाणात या मकड्या जाळी विणून ठेवतात. तर या जाळ्या कश्या घालवाव्यात याचा आज आपण स्वस्त आणि मस्त, जबरदस्त उपाय पाहणार आहोत. याचा तुम्ही एकवेळ जरी वापर केला तर सहा महिने तुमच्या घरामध्ये एकही कोळीकिडा किंवा मकडी अजिबात दिसणार नाही. याची जाळीपन घरामध्ये दिसणार नाही.
घरामध्ये जरी या जाळ्या झाल्या असतील तर घरामध्ये अतिशय घाणेरडे दिसते, घर व्यवस्थित दिसत नाही आणि जाळीवर धूळ साचते. दिसायला ते एकदम खराब दिसते. भीती वाटते या किड्याचीसुद्धा म्हणून या जाळ्या घरामध्ये होऊ नयेत किंवा झाल्या असतील तर हे कोळीकिडे घरातून निघून जावेत यासाठी आपण एक उपाय पाहणार आहोत. उपाय करण्यासाठी आपल्याला पाहिजे एक लिंबू.
एक लिंबू घ्यायचा आहे आणि त्याचा रस काढायचा आहे. एक लिटर पाण्यामध्ये तो रस टाकायचा आहे आणि हे जे कोळीकिडे आहेत, मकडी जी आहेत ते कोपऱ्यांमध्ये आणि छताच्या ठिकाणी असतात अशा ठिकाणी असतात त्या ठिकाणी चीर पडलेली असते. त्या ठिकाणी हे लिंबूपाणी स्प्रे करायचे आहे. तुम्हाला माहिती आहे लिंबाच्या रसामध्ये वास असतो आणि सायट्रिक ऍसिड असते. लिंबू हे सायट्रिक असिडचा महत्वाचा स्रोत आहे.
या लिंबाला जो वास असतो, याच्यामध्ये जे सायट्रिक ऍसिड असते यामुळे स्पायडर च्या अंगातून येणारे जे दोरा सारखा भाग आहे ज्याला आपण जाळी म्हणतो. याचा वास मकडीला अजिबात आवडत नाही. शिवाय सायट्रिक ऍसिडमुळे या मकडी अजिबात त्या ठिकाणी थांबत नाही. सायट्रिक असिडची चव त्याला अजिबात आवडत नाही आणि ज्या ठिकाणी तुम्ही हे स्प्रे केलेले आहे त्या ठिकाणी हा वास सहा महिन्यापर्यंत टिकतो.
हे कोळीकिडे किंवा मकडी अजिबात येत नाही. त्या ठिकाणी जाळी बनवत नाही. म्हणून सहा महिन्यांतून एक वेळेस फक्त हे लिंबू पाणी कोपऱ्यांमध्ये, भिंतीला ज्या ठिकाणी चीर पडली आहे ज्या ठिकाणी आपल्याला वाटते जास्त कोळीकिडे जाळी विणत आहेत अशा ठिकाणी स्प्रे करायचं आहे. त्यानंतर तो कोळीकिडा नंतर येत नाही आणि जर घरामध्ये कोळीकिडे असतील तर या वासाने बाहेर निघून जातात. कोळीकिडे पळून लावण्यासाठी हा असा सोपा, साधा आणि जबरदस्त उपाय आहे. तर हा उपाय तुम्ही नक्की करा.. नक्की घरातील कोळी किडे निघून जातील. धन्यवाद…
मित्रांनो माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.