प्रत्येक स्त्रीची असते अपेक्षा की मनातील ‘या’ इच्छा न सांगताही पतीला समजाव्यात…

जेव्हा एखादी स्त्री आपले घर सोडते आणि आपल्या सासरी कायमची येते तेव्हा सासरचे सर्व तिच्यासाठी अनोळखी असतात. काही काळ निघून जातो आणि त्या काळात ती तिच्या पतीच्या जास्त जवळ येते. अशा प

रिस्थितीत तिच्या आपल्या पतीकडून काही अपेक्षा असतात. जर नवर्‍याने त्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत, तर वैवाहिक जीवनात दुरावा निर्माण होऊ शकतो. तर मग एका पत्नीला आपल्या पतीकडून काय अपेक्षा असतात ते आपण समजून घेऊया.

खास क्षण लक्षात ठेवणे: छोटे छोटे क्षणही बायकासाठी खूप खास असतात. जसे की पहिली भेट, प्रथम चुंबन, पहिली डेट केलेली तारीख, लग्न, वाढदिवस इत्यादी क्षणांना त्यांच्या जीवनात एक विशेष स्थान असते. अशा परिस्थितीत त्या आपल्या पतीकडून अपेक्षा करतात, की पतीला प्रत्येक विशेष तारखेची आठवण ठेवतील आणि त्या विशेष प्रसंगी ते त्यांचे अभिनंदन पण करतील.

भावनिक आधार पत्नीच्या सासरच्यांपेक्षा सर्वाधिक अपेक्षा आपल्या पतीकडून असतात. जर तिच्याबरोबर काहीतरी चुकले असेल किंवा ती नाखूष असेल किंवा काही अडचणीत असेल, तर ती आपल्या पतीकडून भावनिक पाठिंबा मिळण्याची अपेक्षा ठेवते. आदर करा: महिलांना आपल्या पतीच्या पायातील वहाण म्हणून जगणे आवडत नाही. तिची अपेक्षा असते, की तिचा नवरा तिचा आदर करेल. त्यांना जो मन ती देते, तितका आदर त्यांनी द्यावा अशी अपेक्षा ठेवते.

खोटे बोलू नका: पत्नीची इछा असते, की आपल्या पतीने आपल्यापासून काहीही लपवू नये. प्रत्येक गोष्ट प्रामाणिकपणे सांगा. जर तुम्ही त्यांच्याशी खोटे बोललात आणि नंतर त्यांना सत्य कळले, तर त्यांना वाईट वाटेल. निष्ठा: वर्षानुवर्षे कोणत्याही नात्यात निष्ठा महत्वाची भूमिका बजावते. प्रत्येक पत्नीची अशी इच्छा असते की तिचा पती एकनिष्ठ असावा आणि त्याने बाहेर प्रेम प्रकरण करू नये.

मिठी मारणे : ही गोष्ट तुम्हाला कदाचित लहान वाटेल परंतु त्याचा परिणाम खूप मोठा आहे. जर आपण आपल्या पत्नीला दररोज प्रेमाने मिठी मारली तर तिचा आत्मविश्वास वाढतो. प्रेम कमी होत नाही.एकमेकांवर विश्वास ठेवणे देखील सोपे होते.

चांगली विनोदबुद्धि : जीवनात प्रणय कमी झाला तरी चालेल, परंतु विनोदबुद्धी असणे महत्वाचे आहे. पत्नीची इछा असते, की आपल्या पतींनी दररोज हसत खेळत राहावे आणि त्यांना हसवावे. यामुळे नात्यात गोडपणा आणि ताजेपणा राहतो.

आडकाठी करू नका: बायकांची अशी इछा असते, की आपल्या पतींनी त्यांच्या स्वातंत्र्यावर बंधने घालू नयेत. जर त्यांचेही मित्र असतील तर त्यांना यात पतीला कोणतीही अडचण असू नये. काय परिधान करावे, कोणाशी बोलावे आणि कुठे जावे, या सर्वांवर बंधन नसावे.

स्तुती : स्त्रिया स्तुतीसाठी भुकेल्या असतात. तिला तिच्या पतीकडून सर्वाधिक कौतुकाची अपेक्षा असते. आपण त्यांचे खूप कौतुक केले तर त्या खूप आनंदी होतात. या नात्यात त्या आनंद मानतात. त्यांचा आत्मविश्वासही वाढतो.

प्रणय : जसजसे लग्न होत जाते तसतसे प्रणय पातळी देखील कमी होते. विशेषतः पतीमध्ये उत्साह आणि प्रेमाचा अभाव दिसून येत. अशा परिस्थितीत आपल्या पतींनी प्रणयात थोडा रस घ्यावा असे पत्नीला वाटते. म्हणजे काहीतरी नवीन आणि चांगले करा. त्यांना आश्चर्यचकित करा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.