आचार्य चाणक्य हे पाटलिपुत्रचे महान विद्वान होते. चाणक्यना आपल्या न्यायप्रिय वागणुकीसाठी ओळखले जात असे. एवढ्या मोठ्या साम्राज्याचे मंत्री असूनही ते एका सामान्य झोपडीत राहत असत. त्यांचे जीवन ते अगदी सध्या पद्धतीने जगत असत. चाणक्यनी आपल्या जीवनात आलेले अनुभव आपल्या “चाणक्यनीति” या पुस्तकात नमूद करून ठेवले आहेत.
चाणक्यनीति मध्ये काही अशा गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत, ज्या कोणत्याही व्यक्तीने अमलात आणल्या, तर त्याला जीवनात सफलता किंवा यश मिळवण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. चाणक्यनीतिमध्ये काही अशा कामांचा उल्लेख केला आहे, जी कामे व्यक्तीने शरम न बाळगता म्हणजेच बेशरमपणे केली पाहिजेत.
जर ही कामे त्याने निर्लज्ज होऊन नाही केली, तर तो जीवनात काहीच करू शकणार नाही. पण जर त्याने ही कामे शिकून घेतली, तर मात्र तो नेहमीच सुखी व खुश राहील. कोणती आहेत, ती ३ कामे, चला जाणून घेऊया.
बेशरम होऊन केली पाहिजेत ही ३ कामे: असे तर कधीही उधारी करू नये. परंतु, जर तुम्हाला पैशाची जरूर असेल, तर कोणाकडे मागायला संकोच करू नये. त्याचे पैसे वेळेत त्याला परत करा. पैशाच्या व्यवहारात देवाण-घेवाणीत कधीही लाज बाळगू नये. असे यासाठी, की जी व्यक्ति व्यापार आणि व्यवहार याच्या देवाण-घेवाणीत लाज बाळगेल, तो जीवनात कधीही प्रगति करू शकणार नाही. म्हणूनच, पैसे मागायला लाज बाळगू नये. हो, पण ते पैसे लवकरात लवकर परत करण्याचा प्रयत्न जरूर केला पाहिजे.
आचार्य चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार, अभ्यासाच्या किंवा विद्येच्या बाबतीतही कोणातीही लाज बाळगू नये. आपण पाहिले असेल की असे काही विद्यार्थी असतात, जे काही विचारायला लाजतात किंवा घाबरतात. ते लाजेमुळे ज्या गोष्टी समजलेल्या नसतात, त्या विचारत नाहीत. पण तसे कधीही करू नये. जो माणूस ज्ञान घेताना लाजतो, तो आयुष्यात काहीही मोठे व यशस्वी काम करू शकत नाही. म्हणून अभ्यासात कधीही लाज बाळगू नये. ज्या गोष्टी समजल्या नाहीत त्या त्वरित विचारल्या पाहिजेत.
आचार्य चाणक्य यांनी तिसरी गोष्ट सांगितली आहे की जी व्यक्ति जेवताना लाजतात ते जीवनात काहीही चांगले साध्य करू शकत नाही. ते आपले संपूर्ण आयुष्य दू:खात घालवितात. आचार्य चाणक्य यांच्या मते, जी व्यक्ति जेवताना लाजते, ती व्यक्ती उपाशी राहते. जी व्यक्ति स्वत: च्या अन्नासाठी बोलू शकत नाही तो पुढे काय बोलेल? म्हणूनच, खाताना लाज लज्जा सोडून दिली पाहिजे, व पोटभर खाल्ले पाहिजे.
तर ह्या आहेत त्या ३ गोष्टी ज्या व्यक्तिने निर्लज्जपणाने केल्या पाहिजेत. जर आपण या गोष्टी निर्लज्जपणे करणे शिकलात, तर जीवनात अशी कोणतीच गोष्ट नाही, जी आपण साध्य करू शकत नाही. म्हणून, आता कोणाकडूनही पैशाची मागणी करण्यास लाज बाळगू नका. उघडपणे स्पष्ट प्रश्न विचारा आणि जास्तीत जास्त ज्ञान गोळा करण्याचा प्रयत्न करा आणि पोटभर जेवण करा.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.