फक्त 21 दिवस हे करा आणि जीवनातील चमत्कार पहा…

रात्री लवकर झोपावे आणि सकाळी लवकर उठावे हा विचार आपल्या आजीपासून आईपर्यंत सर्वच सांगतात. हा विचार पटतोही. पण वळत मात्र नाही. कारण काहीही करा सकाळी लवकर जाग येत नाही ती नाहीच. केवळ सकाळी लवकर उठता येत नाही म्हणून मनात ठरवलेले कित्येक चांगले संकल्प तडीस जात नाही. वाचायचं असतं, व्यायाम करायच असतो, दिवसभरात जास्तीत जास्त कामं उरकायची असतात. पण हे लवकर उठणंच होत नाही. त्यामुळे सर्व कामं रखडतात. संपूर्ण दिवस जर ऊर्जेनं आणि उत्साहानं काम करायचं असेल तर सकाळची उठण्याची वेळ ( लवकरची) ती पाळायलाच हवी. ती पाळ्णं होत नसेल तर काही गोष्टी करून पाहायला हव्यात. झोपेला शिस्त लावून, उठण्याच्या संबंधातले काही नियम पाळले तर पहाटे लवकर उठणं हे कोणाहीसाठी अशक्यप्राय कधीच होणार नाही.

तुम्ही नेहमीच वडीलधार्‍या माणसांना सांगताना ऐकले असेल, की सकाळी लवकर उठण्याची सवय लावली पाहिजे. परंतु, आताच्या काळात खूप कमी लोक आहेत, जे हा नियम अमलात आणतात. तुम्हाला कदाचित माहीत नसेल, सकाळी लवकर उठणे हे आपल्या तब्येतीसाठी खूपच फायदेशीर आहे. ते म्हणतात ना, “जो झोपला, तो संपला”. चला तर मग, आज आम्ही तुम्हाला सकाळी लवकर उठण्याचे कितीतरी उत्तम फायदे सांगणार आहोत.

वेळ मिळतो: सकाळच्या वेळात बर्‍याच लोकांकडे वेळेची कमतरता असते. परंतु, जर तुम्ही सकाळी लवकर उठायची सवय लावून घेतलीत, तर तुमच्या जवळ खूप वेळ असेल. अशा वेळेस, तुम्ही सकाळचा थोडा वेळ वॉकिंग, व्यायाम, किंवा वाचन यासाठी देऊ शकता. या प्रकारे, तुम्ही सकाळी लवकर उठल्यामुळे तुमच्या शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्यावर सकारात्मक प्रभाव पडतो. तुम्हाला दिवसभर उत्साही वाटते.

पौष्टिक न्याहारी: या गोष्टीची आपल्या सर्वांनाच माहिती आहे, की न्याहारी आपल्या जेवणाचा एक महत्वपूर्ण भाग आहे. राजासारखी न्याहारी करावी असे जुन्या काळातील लोक सांगतात. म्हणजेच, पोटभर व पौष्टिक न्याहारी करावी. परंतु, काही लोक वेळेअभावी किंवा ऑफिसला लवकर जाण्याच्या गडबडीत, न्याहारी किंवा नाश्ता करत नाहीत, ज्याचा आपल्या तब्येतीवर वाईट परिणाम होतो. विशेषत: तुम्हाला पूर्ण दिवस थकवा आणि भूक जाणवते आणि तुमचे कामात लक्ष लागत नाही. परंतु, तुम्ही सकाळी लवकर उठलात, तर तुमच्याकडे पुरेसा वेळ असेल त्यामुळे तुम्ही पौष्टिक न्याहारी बनवू शकता व खाऊ शकता.

हैप्पी हार्मोन्स : सकाळी लवकर उठल्यामुळे आणि व्यायाम केल्यामुळे तुमच्या शरीरातील हैप्पी हार्मोन्स मोकळे होतात. या प्रकारे तुम्ही तंदुरुस्त तर राहाताच, त्याचबरोबर पूर्ण दिवस तुम्हाला चांगले वाटते. सुर्योदय पाहणं आजकाल प्रत्येकाच्या नशिबात असतेच असे नाही. कारण अनेकांची दिवसाची सुरूवात सुर्य डोक्यावर आल्यावर होते.

सुर्योदय पाहणं हा एक अद्भूत अनुभव असतो. कारण त्यामुळे दिवसाची सुरूवात उत्साह आणि आनंदाने होते. रात्रीच्या काळ्या गर्भातून होणारा अरुणोदय नवसंजीवनी देणारा असतो ]. शिवाय कोवळ्या उन्हात फिरल्यामुळे तुम्हाला व्हिटॅमीन डी पुरेशा प्रमाणात मिळते. थोडक्यास सकाळी लवकर उठून सुर्याचे दर्शन घेतल्यामुळे तुमचे शरीर आणि मन दोन्ही निरोगी आणि आनंदी होते.

उत्तम झोप: तुम्हाला ऐकून नवल वाटेल, की सकाळी लवकर उठल्यामुळे तुमची झोप उत्तम होते व चांगल्या स्वास्थ्यासाठी उत्तम झोप आवश्यक आहे. खरे तर, जेव्हा तुम्ही लवकर उठायची सवय कराल, तेव्हा तुम्हाला रात्री पण लवकर झोप लागते. झोपेची वेळ निश्चित होते. त्यामुळे तुमची झोप पूर्ण होते आणि एक चांगली सवय पण लागते.

जीवनात यश: बरेच शोध ही गोष्ट सिद्ध करतात, की जे लोक सकाळी लवकर उठण्याची सवय करतात, ते जीवनात सफल होतात. इतकेच नाही, जेवढ्या लोकांनी जीवनात सफलता प्राप्त केली आहे, त्यांनी इतर सवयींबरोबर सकाळी लवकर उठण्याची सवय लावून घेतली आहे. तुमचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहते व झोप उत्तम लागते. त्यामुळे तुम्ही सदैव क्रियाशील राहाता. जीवनात तेच लोक प्रगति करू शकतात. त्यामुळे ही उत्तम सवय लवकरात लवकर लावून घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *