वाईट स्वप्न पडल्यामुळे अचानक झोपमोड होत असेल तर करा हे सर्वोत्तम घरगुती उपाय…

झोपेत स्वप्न पडणे ही अतिशय सामान्य गोष्ट आहे, परंतु, कधी कधी असे होते, की लोकांना झोपेत भीतीदायक स्वप्ने पडतात. भितीदायक स्वप्ने लोकांची झोप उडवतात. भितीदायक स्वप्न पडणे ही काही लोकांची रोजची समस्या होऊन बसते. जर तुम्ही पण याच समस्येने हैराण असाल, तर या पासून वाचण्यासाठी वास्तु शास्त्राची मदत घेतली जाऊ शकते. वास्तु शास्त्रामध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्याच्यामुळे वाईट आणि भयानक स्वप्नांपासून तुमची सुटका होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया, कोणते आहेत ते उपाय:

जवळपास सगळ्यांचीच सवय असते की, आपल्याला पडलेल्या स्वप्नाबद्दल आपण जवळच्या व्यक्तीला सांगतो. पण शास्त्रानुसार काही बाबी गुप्त ठेवायला हव्यात. वाईट स्वप्न त्याचवेळी विसरून जायला हवं, ते कोणालाही सांगू नये. आपण जर वाईट स्वप्न लक्षात ठेवलं, कुणाला सांगितलं तर सतत त्याचबद्दल विचार करता, त्यामुळं कुणाला ते सांगू नये.

छोटी वेलची: जर तुम्ही वाईट स्वप्नांमुळे तुमच्या आयुष्यात हैराण असाल आणि तुम्हाला त्यापासून मुक्ति हवी असेल, तर ५ ते ६ छोट्या वेलच्या घ्या, त्या कपड्यात बांधा आणि तुमच्या उशीच्या जवळ किंवा उशीच्या खाली ठेवा. असे केल्यामुळे रात्री तुम्हाला पडणार्‍या वाईट व भयानक स्वप्नांपासून तुमची सुटका होईल. वाईट स्वप्ने पडणार नाहीत.

पाण्याने भरलेले तांब्याचे भांडे: बर्‍याच लोकांना झोपेत घाबरण्याची समस्या असते व बर्‍याच लोकांना झोपेत मध्ये मध्ये जागे होण्याची तक्रार असते. जर, तुम्हाला पण हा त्रास असेल, तर कोणत्याही तांब्याच्या भांड्यात किंवा घडयात पाणी भरा व तो घडा रात्रभर आपल्या बिछान्याखाली ठेवा. नंतर, सकाळी उठल्यावर ते पाणी आपल्या घरातील झाडांना घाला. असे केल्यामुळे, झोपेत भीती वाटत नाही व तुमची झोप पूर्ण होईल.

पिवळे तांदूळ: वास्तु शास्त्रानुसार पिवळ्या तांदुळाच्या मदतीने भीती किंवा वाईट स्वप्नांपासून आपला बचाव होऊ शकतो. वास्तु शास्त्रातील जाणकार लोक म्हणतात, कि जर तुम्हाला वाईट स्वप्ने पडल्यामुळे झोप न येण्याची अडचण असेल, तर पिवळे तांदूळ यावर रामबाण उपाय आहे. पिवळ्या तांदुळांच्या मदतीने भयानक आणि वाईट स्वप्नांपासून स्वत:ला वाचवता येऊ शकते. जर तुम्हाला वाईट स्वप्नांपासून वाचायचे असेल, तर फक्त तुमच्या उशीखाली कोणत्याही कागदात किंवा कपड्यात थोडे पिवळे तांदूळ बांधून ठेवा. यांचे परिणाम तुम्हाला खूपच लवकर बघावयास मिळतील.

उशीजवळ चाकू ठेवा: झोपताना खास करून जेव्हा मुलांना घाबरवणारी किंवा भयानक स्वप्न पडतात व मुले आपल्या त्या स्वप्नांबद्दल सांगू शकत नाहीत. त्यामुळे त्रास जास्त वाढतो. जर तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना भयानक, घाबरवणारी स्वप्ने पडत असतील व त्यांनी तुम्ही त्रासला असाल, तर उशीजवळ किंवा उशीखाली एक छोटा चाकू ठेवा. असे केल्यामुळे, तुम्हाला खूपच आराम पडेल.

टोकदार(अणकुचीदार) वस्तु: तसे तर वास्तु शास्त्रानुसार उशीखाली चाकू ठेवल्यामुळे भयानक स्वप्ने पडत नाहीत, परंतु, तुम्ही चाकू ऐवजी कोणतीही टोकदार वस्तु वापरू शकता. म्हणजेच, कात्री, नेलकटर, किंवा कांटा हे सुद्धा तुम्ही उशीजवळ ठेवू शकता. या वस्तु आपल्या उशीजवळ किंवा उशीखाली ठेवल्यामुळे रात्री भीती वाटत नाही आणि भितीदायक स्वप्ने पडत नाहीत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.