जर तुम्हालाही असतील या ५ सवयी तर तुमचे ब्रेन डैमेज होऊ शकते…

आजच्या काळात माणसाला खूप व्याप असतात. सतत टेन्शन चालू असतात. अशात फक्त शारीरिक नाही तर मानसिक रुग्णांची संख्याही वाढत चालली आहे. माणसाचा मेंदू कामात इतका खर्च होतो त्याला काहीच सुधरत नाही व त्याच्या मेंदूचा र्हास चालूच राहातो. जर तुम्हाला या ५ सवयी असतील तर मेंदूचा र्हास होऊ शकतो. जाणून घेऊ या कोणत्या सवयी आहेत ते.
मिठाचे अतिसेवन करणे

जर तुम्ही मिठाचे जास्त सेवन करत असाल तर तुमच्या मेंदूलात्यापासून धोका आहे. स्वयंपाकात मिठाचा अतिरिक्त वापर करणे टाळा. JAMA न्यूरोलॉजीच्या जर्नलमध्ये प्रकाशित एका अभ्यासात मिठाला रक्तदाबात योगदान देणाऱ्या एका कारकाच्या रुपात पाहिले गेले आहे. याच्या जास्त सेवनाने स्मृती कमी होणे आणि स्ट्रोक यांचा धोका जास्त असतो. मिठाचा अतिवापर तुम्ही टाळायला हवा.

नाश्ता न करणे, नाश्ता हा आपला आवश्यक आहार आहे आणि नष्ट स्किप केल्याने तुमच्या मेंदूला पर्याप्त पोषक तत्वे मिळत नाहीत.जर तुम्ही सकाळी पोटभर पोषक नाश्ता केलात तर दिवसभर उर्जा राहाते. जर तुम्ही नाश्ता केला नाहीत तर तुमच्या शरीरात उर्जा राहत नाही आणि नकारात्मक उर्जा तयार होते. याने तुमच्या मेंदूला धोका पोहोचू शकतो. सकाळी उठल्यावर हलका फुलका नाश्ता करून आपल्या दिवसाची सुरुवात केलीत तर तुमचे शारीरिक तसेच मानसिक आरोग्य नेहमीच चांगले राहील.

मोबाईलचा अति वापर, मोबाईलच्या अति वापराने तुमच्या मेंदूला धोका संभवतो. याने झोपेचे विकार सुद्धा होतात. टीओआईच्या एका रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे कि एम्स द्वारा केल्या गेलेल्या एका अभ्यासात असे म्हणतात कि मोबाईलच्या अति वापराने ब्रेन ट्यूमरचा धोका वाढतो. मोबाईल वापरताना नेहमीच काळजी घ्या.

झोप कमी घेणे, पुरेशी झोप नसल्याने आपल्याला अनेक आजारांचा सामना करावा लागतो.असे म्हणतात कि कमी झोप घेतल्याने मेंदूला आराम पडत नाही आणि त्याला धोका असतो. असे आहे कि झोप हे मस्तकाला विषाक्त पदार्थ साफ करायची परवानगी देते जी जागल्यानंतर काही तास राहाते. जर तुम्हाला झोप येत नसेल तर तुमचा मेंदू हळू हळू पोखरू शकतो.

ओवरईटिंग म्हणजेच अति खाणे, अति खाण्याने तुमच्या शरीराचे नुकसान होऊ शकते आणि मेंदुचेही. याने फक्त तुमचे वजनच वाढत नाही तर तुमच्या मेंदूचे कार्य कमी होऊ लागते. असेही म्हणतात कि अति खाल्ल्याने मेंदूचा विकास थांबतो. खाताना नेहमी प्रमाणात खा आणि जास्त खाणे खाऊ नका.

तर या ५ गोष्टी आहेत ज्यामुळे तुमच्या मेंदूला धोका पोहोचू शकतो. या गोष्टी टाळा आणि उत्तम आरोग्य राखा.

नोट: जर तुम्हाला आमच्याद्वारे दिलेली माहिती उत्तम वाटली, तर खाली दिलेल्या कमेन्ट बॉक्समध्ये तुम्ही कमेन्ट करू शकता. ही पोस्ट आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. या प्रकारे आम्ही नवीन माहिती लेखाच्या माध्यमातून तुमच्यासाठी घेऊन येऊ. धन्यवाद!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.