घरात गुपचूप इथे ठेवा आलेचा १ तुकडा पैसा आयुष्यात कमी पडणार नाही…

नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे. आज आपण आले म्हणजेच अद्रक. या आल्याचे आपण आज असे काही प्रभावी तोटके पाहणार आहोत, ज्योतिष उपाय पाहणार आहोत, की ज्यामुळे आपल्या घरात धन, वैभव, पैसा, हे कधीच कमी पडणार नाही. खर तर या आल्याचे जे उपाय केले जातात याचा अनेक लोक चुकीचा उपयोग करतात. मात्र योग्य पद्धतीने आणि चांगल्या हेतूने जर आपण उपाय केले तर मित्रांनो आपल्या घरात धन, वैभव, पैसा, हा कधीच कमी पडत नाही.

यासाठी आपल्याला आपल्या घरात गुपचुप या ठिकाणी आल्याचा केवळ एक तुकडा पुरायचा आहे. धन आगमनाचा हा एक अत्यंत साधा सोपा मार्ग आहे. धन म्हणजेच पैसा… पैसा प्राप्तीचा हा एक अत्यंत साधा सरळ उपाय आहे. मात्र विनंती करतो की कोणीही आल्याचे तोटके जे दुसऱ्याला त्रास देण्यासाठी, दुसऱ्याला बाधा पोचवण्यासाठी केले जातात त्यांचा वापर करू नका.

कारण चुकीच्या मार्गाने आल्याचे केलेले तोटके हे उलटल्यानंतर करणाऱ्यांवर प्रचंड असे परिणाम सोडून जातात. आलं हे लक्ष्मी कारक मानलं जातं. म्हणजे माता लक्ष्मीस आकर्षित करण्यासाठी या आल्याचा वापर शास्त्रामध्ये खूप वर्षापासून केला जात आहे. लक्षात घ्या आपण जो हा तोटका करणार आहोत हा धन प्राप्तीचा, पैसे प्राप्तीचा उपाय आहे. म्हणूनच आपण अगदी स्वच्छ जागी हा उपाय करायचा आहे. त्या ठिकाणी अस्वच्छता नसावी. घरामध्ये कितीही गरिबी असुद्या, दारिद्र्यता असुद्या, ही गरिबी दारिद्र्यता या उपायाने दूर करता येते.

यासाठी आपल्याला आल्याचा तुकडा घ्यावा लागेल. हा तुकडा स्वच्छ धुवून घ्यावा. आणि तो फुलांच्या आकारामध्ये कापून घ्यायचा आहे. ज्या प्रकारे फुलाचा आकार असतो अगदी त्या प्रकारे ह्या आल्याचा आकार करायचा आहे. आणि त्यानंतर आपल्या घराची जी मुख्य चौकट आहे जो मुख्य दरवाजा आहे ज्या मुख्य दरवाजातून आपण आपल्या घरात प्रवेश करतो. त्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला (म्हणजे तुम्ही जेव्हा तुमच्या घरात उभे आहात तेथील उजव्या हाताची बाजू) थोडासा खड्डा खणून त्या मध्ये हा आल्याचा तुकडा पुरायचा आहे.

जर तुम्हाला हे करण शक्य नसेल तर एक छोटीशी कुंडी त्या मध्ये आपण माती घेऊ शकता आणि त्या मध्ये हा आल्याचा तुकडा पुरु शकता. हा आल्याचा तुकडा आपण मातीने पुरून टाकायचा आहे. आणि त्यावरती थोडं पाणी शिंपडायचं आहे. ज्या प्रकारे आपण रोपट लावतो अगदी त्या प्रकारे आपण हा उपाय करायचा आहे. त्यानंतर थोडं हळद टाकायची आहे. आणि वरून अगरबत्ती किव्हा धूप लावायचा आहे.

मित्रांनो अगदी नित्यनियमाणे या कुंडी मध्ये किंव्हा तुम्ही जिथे तुकडा पुरलेला आहे तिथे थोडं थोडं पाणी शिंपडत चला. ज्या प्रकारे आपण झाडांची निगा राखतो अगदी त्या प्रकारे आपण याची निगा राखा. हे रोपटं जितकं चांगलं उगवेल तितकं भाग्य तुमचं साथ देईल. भाग्य सुद्धा चमकू लागेल. मात्र काळजी करू नका की जर हे रोपटं उगवलं नाही. तर सुद्धा आपल्या जीवनामध्ये या छोट्याशा उपायाने धन प्राप्ती होऊ लागेल. पैसा येऊ लागेल.

मित्रांनो काही महत्वाच्या गोष्टी आपणास माहीत असेल की आपल्या दारामध्ये आपल्या अंगणात जी तुळस आहे या तुळशीची सुद्धा आपण नित्य नियमाने पूजा करायला हवी. काही काही वृक्ष असे आहेत. उदरणार्थ झेंडू आहे या झेंडू ची लागवड आपण आपल्या अंगणात अवश्य करा. हा झेंडू सुद्धा लक्ष्मी कारक मानला जातो. तुळस प्रत्यक्षात माता लक्ष्मीचच रूप आहे.

सोबत तुमच्या घरा शेजारी जर पिंपळाचे झाड असेल वड असेल तर त्यांची सुद्धा आपण पूजा करायला हवी. ज्या दिवशी सण असेल त्या दिवशी विशेष करून या झाडांची पूजा करत चला.. या मुळे घरात सुख,शांती समृद्धी,सर्व काही येऊ लागत. हा तर उपाय आपण करू शकता. तर मित्रांनी अगदी साधा सरळ उपाय आम्ही तुम्हाला धन प्राप्ती साठी सांगितलेला आहे. नक्की करून पहा.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये. माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.