कोणत्याही कारणाने बायको नाराज झाली असेल तर आजमावून पहा या टिप्स…

परिवार सुखात राहायला पाहिजे असेल, तर हे जरूरी आहे, की पति पत्नीच्या मध्ये प्रेम असले पाहिजे आणि घरात शांतता असली पाहिजे. राग येणे ही साधारण गोष्ट आहे, परंतु, काही लोक विनाकारण आणि खूप लवकर चिडतात. जर घरात पत्नीला जास्त राग येत असेल, तर पती नेहमी तिला समजून न घेता स्वत: खूप आरडाओरड करायला सुरुवात करतात. यामुळे, घराची आणि परिवाराची सुख शांति नाहीशी होते. जर तुमच्या पत्नीला खूप जास्त राग येत असेल, तर समजूरदारपणा तुम्हालाच दाखवावा लागेल. तुम्हाला सांगतो अशा काही टिप्स ज्या उपयोगात आणून तुम्ही तुमच्या पत्नीचा राग शांत करू शकता.

प्रथम स्वत: शांत राहा: नेहमीच, जेव्हा पति पत्नी मध्ये भांडण होते, आणि पत्नीला जास्त राग येतो, तेव्हा पतिने थोड्या वेळासाठी शांत राहिले पाहिजे. जेव्हा तुम्ही दोघेही रागात असाल, तेव्हा भांडण विकोपाला जाईल. जर पत्नी जास्त रागात असेल, तेव्हा तुम्ही शांत राहा. थोड्या वेळाने तिचा राग शांत होईल. त्यानंतर, तुम्ही तिची प्रेमाने समजूत काढू शकता. जेव्हा तुम्ही शांत असाल, तेव्हाच तुम्ही समजू शकाल, की तुमची चूक किती आहे व तिची चूक किती आहे. थोड्या कालावधीसाठी शांत राहा आणि नंतर तुम्हाला तुमच्या मनात काय आहे जे सांगायचे आहे ते सांगा.

कारण समजून घ्या: पत्नी रागावल्यावर स्वत: तोंड फुगवून बसू नका. तिच्या रागाचे कारण जाणून घ्या. हे जाणून घ्यायचा प्रयत्न करा, कोणती गोष्ट त्यांना वाईट लागली आहे. जर कोणतीही अडचण असेल, तर ती जाणून घ्यायचा प्रयत्न करा. स्वत: पुढाकार घेऊन ती अडचण दूर करा त्यात भर घालू नका. त्या गोष्टी लक्षात घ्या, ज्यामुळे पत्नी लगेच नाराज होते. ज्या गोष्टींमुळे ती नाराज होते, त्या समजून घ्यायचा प्रयत्न करा.

पत्नीला कामात मदत केलेली आवडते. अशा वेळी तिला तिच्या कामात मदत करा, मुलांना सांभाळा जेणेकरून तिला बरे वाटेल.
असे म्हणतात कि कोणाच्या हृदयात शिरण्याचा मार्ग हा पोटातून जातो. जर तुम्ही उत्तम पदार्थ बनवलेत तर नक्की तिचा राग कमी होईल आणि तुमचे भांडण मिटेल. जर तुम्ही तिच्या आवडीचे पदार्थ बनवून तिला खाऊ घातलेत तर नक्कीच तिचा राग शांत होईल.

योग्य वेळ तिला द्या: जर तुमची पत्नी खूप नाराज होत असेल, किंवा लगेच चिडत असेल, तर असेही असेल, की त्याला अनेक कारणे असतील, फक्त एकच नाही. बर्‍याच वेळा, पति जेव्हा आपल्या पत्नीला खूपच कमी वेळ देतो, तेव्हा पत्नीची चिडचिड होते. तिला असे वाटते, की ओरडल्यामुळे ती स्वत:चा राग पतीवर काढू शकेल.

बरेचदा बायका वाद झाल्यावर बोलणे बंद करतात पण तसे करणे चुकीचे आहे. तिच्याकडे लक्ष दिलेत थोडी काळजी घेतलीत तर नक्की तिचा राग शांत होऊन ती बोलायला येईल आणि वाद मिटेल. तुम्ही थोडा वेळ एकत्र घालवा किंवा बाहे जाऊन या जेणेकरून तुमच्यातील नाते आणखी घट्ट होईल. तिच्याकडे जास्त लक्ष दिलेत आणि तिच्यासाठी काही केलेत तर नक्की ती विरघळेल आणि तुमचे नाते आणखी दृढ होईल.

आपल्या पत्नीबरोबर थोडा वेळ घालवा. तिला घेऊन फिरायला जा. असेही असू शकेल, तुमचे लक्ष वेधण्यासाठी ती आरडाओरड करीत असेल. त्यांच्याबरोबर वेळ घालवा आणि त्यांना खुश करायचा प्रयत्न करा. मग बघा, ती तिचा राग कमी करेल आणि त्याचे कारण असेल, तिला तुमचा योग्य सहवास व वेळ हवा असेल.

माहेरच्या लोकांची प्रशंसा: एका स्त्रीसाठी तिचे माहेर हे सगळ्यात खास असते. जर तुम्ही तिच्याकडून अपेक्षा करता, की तिने तुमच्या परिवाराला आपले म्हणून समजून घेतले पाहिजे तर त्यासाठी तुम्हाला सुद्धा तिच्या परिवाराला आपले मानले पाहिजे. कितीतरी वेळा बोलण्यात पति पत्नीच्या माहेरच्या लोकांबद्दल काहीतरी बोलून जातात, त्यामुळे पत्नीला खूप राग येतो. जर तुमचे भांडण या कारणांमुळे होत असेल, तर तुमची ही सवय बदलून टाका.

मैत्री करा: सगळ्यात चांगले नाते ते असते, जिथे दोन माणसे पति पत्नी असतात, त्याचबरोबर एकमेकांचे चांगले मित्र असतात. असा प्रयत्न करा, की तुम्ही तुमच्या पत्नीचे मित्र व्हाल. जेव्हा ती नाराज होईल, तेव्हा आपला पति हा मुखवटा बदलून मित्राचा मुखवटा धारण करा. तिला आपल्या मित्राप्रमाणे समजवा व तिची बाजू पण समजून घ्या. असे केल्यामुळे हळू हळू तिचा रंग कमी होईल व तुमच्यातील प्रेम वाढेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published.