पेरू कापून संपूर्ण तुम्हीच खा, होतील हे १० आश्चर्यकारक फायदे…

फळे ही माणसाच्या शरीराला खूप फायदेशीर आहेत. परंतु, प्रत्येक फळाच्या फायद्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. तसे तर, आंबा हा फळांचा राजा असल्याचे म्हटले जाते, पण पेरूदेखील आंब्यांपेक्षा कमी लोकप्रिय नाही, विशेषत: हिवाळ्यात बाजारात येणारे पेरुची गोष्ट काही वेगळीच असते.

या दिवसात येणार्‍या पेरूमध्ये एक वेगळीच चव असते, जी प्रत्येकाला चाखून बघायची इच्छा असते. परंतु हा सगळीकडे आढळत नाही आणि जिथे मिळतो, तेथे त्याची किंमत दुप्पट असते. पेरू केवळ चवीसाठीच नाही तर हा खाल्ल्याने त्याचे बरेच फायदे देखील आहेत. अन्यथा तुम्हीच विचार करा, की प्रत्येकजण हिवाळ्याच्या पेरुची वाट का पाहात असतो? आपल्याला त्याबद्दल माहित असणे आवश्यक आहे आणि या फळाच्या चवीचा आनंद जरूर घेतला पाहिजे.

का प्रत्येकजण वाट बघतो, हिवाळ्याच्या येणार्‍या पेरूची? तुम्ही कधी चाट मसाल्याबरोबर पेरू खाण्याचा आनंद घेतला आहे का? जर नसेल, तर आजच जा आणि पेरू आणून चाट मसाल्याबरोबर खा. तो खाल्ल्यानंतर, आपण ही आमची पोस्ट बर्‍याच वेळा शेअर कराल, कारण हे सत्य आहे, विशेषत: हिवाळ्यातील पेरूची बाब काही वेगळीच आहे. पेरुमधील जीवनसत्त्वे आणि खनिजे शरीराला बर्‍याच रोगांपासून वाचवतात, म्हणून चला तुम्हाला सांगतो, थंडीत पेरु खाण्याचे काय फायदे आहेत…

१. पेरू हा मॅंगनीजचा एक चांगला स्त्रोत मानला जातो, जो आपल्या शरीराला इतर खाद्य पदार्थांमधून मिळणार्‍या महत्त्वपूर्ण पोषक द्रव्य सेवन करावयास मदत करतो. पेरूमध्ये असलेल्या पोटॅशियममुळे रक्तदाबाची पातळी सामान्य राहाते. या व्यतिरिक्त, पेरू हृदय आणि स्नायू देखील मजबूत व सुढृद्ध ठेवतो.

२. पेरू हा ८० टक्के पाणी मिश्रित असतो, ज्यामुळे तो त्वचेचा ओलावा टिकवून ठेवतो. या व्यतिरिक्त तो व्यक्तीची प्रतिकारशक्ती वाढवतो. पेरूमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, जे मधुमेहाच्या रूग्णांसाठी खूपच फायदेशीर असते. ३. जर आपण हिवाळ्यामध्ये नियमितपणे पेरूचे सेवन केले, तर सर्दी- खोकल्यासारखा सामान्य आजार होण्याचा धोका खूपच कमी असतो. पेरूमध्ये आढळणारे जीवनसत्त्वे ए आणि ई हे डोळे, केस आणि त्वचेला भरपूर पोषण देतात.

४. पेरूमध्ये असलेले लाइकोपीन नावाचे पोषक तत्व शरीरात होणार्‍या कर्करोग आणि ट्यूमर सारख्या गंभीर आजाराचा धोकादेखील दूर ठेवतो. पेरुमध्ये बीटा कॅरोटीन आढळते, जे शरीराला त्वचेच्या अनेक आजारांपासून वाचवते. ५. बरेच लोक पेरुचे बी खात नाहीत, पण तुम्हाला हे ठाऊक नसेल, की त्याचे बी खाणे सर्वात फायद्याचे आहे, ज्यामुळे पोट साफ होते. पेरू चयापचय क्रिया योग्य ठेवतो, जेणेकरून शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहते.

६. पेरू खाल्ल्याने दात आणि हिरड्या मजबूत होतात आणि पेरुच्या पानांनी तोंडात आलेले फोड किंवा छाले बरे होतात. या व्यतिरिक्त, पेरुचा रस कोणत्याही प्रकारची जखमा फार लवकर भरतो. ७. नियमित पेरूचे सेवन लोहाची कमतरता भरून काढते.

८. वजन कमी करण्यासाठी पेरूची पाने उपयोगी आहेत. पाने सुकवून त्याची पाऊडर पाण्याबरोबर घ्या. ९. पेरुमुळे हिरड्यांची सूज, तोंडाचे विकार दूर होतात. १०. दातांमधील वेदना पेरुच्या पानांच्या गुळण्या करून कमी करता येतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *