चिंचेची पाने खाल्ल्याने मुळापासून बरे होतात हे 7 रोग…

नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत चिंचेची पाने खाल्ल्याने होणारे फायदे आणि त्यापासून बरे होणारे रोग..मित्रांनो, इमली म्हणजे चिंच तुम्ही नक्की खाल्ली असेल त्याचे अनेक फायदे असतात ते आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो ,तुम्ही लहान असताना चिंचेची पाने अगदी बिनदास्त खाल्ली असतील मात्र आजच्या काळामध्ये आपण चिंचेची पाने खाणे टाळतो किंबहुना कोणत्याही वनस्पतीची पान आपल्याकडून खाल्ली जात नाहीत आपण घाबरतो.

मात्र लक्षात घ्या चिंचेची पान ही आरोग्य दृष्ट्या अतिशय महत्त्वाची आहेत अगदी लहान-सहान ते मोठं-मोठ्या आजारापर्यंत अनेक रोग बरे करण्याची क्षमता या चिंचेच्या पानांमध्ये आढळते. चला तर पाहूया की या चिंचेचे फायदे कोण- कोणते आहेत.?
मित्रांनो, चिंचेची पाने खाण्याचा सर्वात मोठा फायदा हा गर्भवती महिलांना होतो.

कारण जेंव्हा त्या बाळाला ला जन्म देतात तेंव्हा त्या बाळाला दुधाची गरज असते आणि या दुधाची गुणवत्ता वाढवण्याचं काम हे चिंचेची पान करत असतात आणि म्हणून दुधाची गुणवत्ता जर सुधरवायची असेल तर त्यासाठी गर्भवती महिलांनी गर्भावस्थेत सुद्धा आणि त्यानंतर सुद्धा चिंचेची पाने नक्की खायला हवीत.

मित्रांनो जर तुम्हाला एखाद्या जागी जखम झाली असेल तर ही जखम बरी करण्यासाठी आपल्याला काही औषधी गुणधर्मांची गरज असते आणि ही औषधी गुणधर्म चिंचेच्या पानांमध्ये आढळतात. आणि म्हणूनच आपण ही चिंचेची जी पानं आहेत ती नियमित पणे खात चला. जेंव्हा-जेव्हा तुम्हाला कुठेतरी इजा होईल, एखादा घाव होईल त्यावेळी तो लवकर भरून निघेल.

मित्रांनो, तिसरा फायदा आहे की हवेमध्ये, मातीमध्ये तसच जे काही पाणी आहे या सर्वांमध्ये लहान लहान जे काही सूक्ष्मजीव असतात. काही सूक्ष्मजीव हे घातक असतात तर या सुक्ष्मजीवांपासून जर आपला बचाव करायचा असेल म्हणजेच संक्रमनापासून जर बचाव करायचा असेल तर त्यासाठी ही चिंचेची पाने फार महत्वाची आहेत.

बऱ्याच लोकांची हाड कमजोर बनतात. जस-जसे वय वाढते हाड कमजोर बनू लागतात, ढिसुळ होत जातात. तर याच प्रमुख कारण असत की कॅलसिअम मध्ये झालेली कमतरता. तर हे कॅलसिअम वाढवण्यासाठी सुद्धा ही चिंचेची पान फार महत्वाची आहेत. तसेच या मध्ये कॅलसिअम बरोबरच जीवनसत्व ‘क’ सुद्धा मोठ्या प्रमाणात आढळलं जातं.

मित्रांनो, ही चिंचेची पाने खाण्याचा आणखी एक फायदा म्हणजे जर तुम्हाला पोटामध्ये अल्सर झालेला असेल तर हा अल्सर बरा करण्यासाठी अल्सर तुम्हाला माहिती असेल की पोटामध्ये खूप वेधना होत असतात. तर हा अल्सर बार करण्याचं काम ही चिंचेची पानं करत असतात. मित्रांनो यामध्ये जीवनसत्व ‘अ ‘ सुद्धा आहे की जे आपल्या डोळ्यांसाठी अतिशय फायदेशीर आहे. डोळ्यांची कोणतेही विकार होऊ नयेत, कोणतेही आजार होऊ नयेत असे जर तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी आपण या चिंचेच्या पानांचे सेवन नक्की करायला हवं…

मित्रांनो, शेवटचा एक फायदा म्हणजे अतिशय महत्वाचा तो म्हणजे जर आपण चिंचेची पानं खाल्ली तर आपल्या शरीरावर सूज आलेली असेल कोणत्या ना कोणत्या कारणास्तव किंवा ज्याला आपण सांधे दुखी असे म्हणतो. सांध्यांमध्ये वेधना होतात तर ते सुद्धा यामुळे बर होत.. तर मित्रानो, अशाप्रकारे या चिंचेच्या पानांचे फायदे आपल्याला दिसून येतात ..तर मित्रांनो ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की खाली लाइक आणि कंमेंट करा … धन्यवाद..

नोट: जर तुम्हाला आमच्याद्वारे दिलेली माहिती उत्तम वाटली, तर खाली दिलेल्या कमेन्ट बॉक्समध्ये तुम्ही कमेन्ट करू शकता. ही पोस्ट आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. या प्रकारे आम्ही नवीन माहिती लेखाच्या माध्यमातून तुमच्यासाठी घेऊन येऊ. धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published.