नमस्कार मित्रांनो , आज आपण एका अत्यंत महत्वाच्या समस्ये वर उपाय पाहणार आहोत, ही समस्या आहे पांढऱ्या केसांची …
आजकाल अगदी कमी वयात म्हणजे अकाली केस पांढरे होण्याचे प्रमाण खूप वाढलंय आणि ह्याच्या माग अनेक कारणं आहेत ती सुद्धा आपण पाहणार आहोत आणि अकाली पांढरे झालेले केस कसे काळे करायचे यावर आपल्या व्हिडिओ मध्ये एक रामबाण औषध आम्ही सांगणार आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांचे केस सद्या काळे आहेत पण पांढरे होण्याच्या मार्गावर आहेत जे कालांतराने पांढरे होऊ शकतात आशा लोकांनी सुद्धा जरी हा उपाय वापरला तर त्यांचे सुद्धा केस काळे राहतील ते अकाली पांढरे होणार नाही. एक गोष्ट मात्र नक्की की वयो मानानुसार म्हणजे आपलं ज्या वेळी वय होईल, आपण ज्या वेळी 45-50 या टप्प्या मध्ये जाऊ, त्यावेळी मात्र केस पांढरे होणारच, त्याला पर्याय नाही .
हा तरी सुध्दा जरी त्या वयोगटाच्या व्यक्तींनी हा उपाय केला तरी देखील काही प्रमाणात त्यांना त्यांचे केस काळे ठेवण्यास किंवा पांढरे केस काळे होण्यास मदत होऊ शकते ही जी माहिती आम्ही या ठिकाणी एकत्रित केली आहे ही विविध जे स्रोत आहेत म्हणजे इंटरनेट वर आणि इतर माहिती जे स्रोत आहेत त्या माध्यमातून गोळा केली आहे..ज्यांना स्किन चे प्रॉब्लेम असतील, ऍलर्जी असेल या लोकांसाठी विशेष सूचना आहे त्यांनी हा उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा/ वैद्यांचा सल्ला अवश्य घ्यावा .. चला तर आपण माहिती करून घेऊयात ….
वरील उपाय करण्यासाठी आपल्या लागणारा अत्यंत बहुमूल गुणी असणारा त्याचा नाव आहे कांदा ..तर आपण एक कांदा घ्यायचा आहे. कांद्याच्या 2 जाती आहेत त्यामध्ये एक पांढरा कांदा आणि लाल कांदा. तर पांढरा कांदा उपलब्ध झाला तर अतिशय चांगलच आहे ..लाल कांद्या पेक्षा जास्त गुणकारी पांढरा कांदा आहे..पांढऱ्या कांद्या मुळे लवकर गुण येऊ शकतो… लाल कांदा सुद्धा चांगला आहे, त्यातही विषय नाही दुसर साहित्य म्हणजे चाकू किंवा सूरी अस कोणतही साहित्य वापरा, कांदा कापताना मध्यम बारीक चिरून घ्यायचा आहे
मित्रांनो, केस पांढरे होण्याचे जी अनेक कारण असतात त्या कारणांमध्ये आपण जर एखाद्या गोष्टीच व्यसन आपल्याला असेल, उदारणार्थ- सिगारेट, तंबाखू, दारू वगैरे तर त्यामुळे सुद्धा केस पांढरे होणं ही समस्या होऊ शकते. तसेच आपण जर आजारी असू आणि एखाद्या औषधाचा जर खूप मोठ्या कालावधी साठी जर आपण वापर केला त्याने सुद्धा किंवा दीर्घकाळ जर आपण एखादे औषध घेत असू तर त्याचा सुद्धा परिणाम आपले केस पांढरे होण्यावरती झालेला दिसून येतो…आपल्या शरीरामध्ये मेल्यानीन नावाचा एक रंगद्रव्य असतो. तो मेल्यानीन द्रव्य आपले केस काळे करण्यासाठी महत्वाचा असतो.
तर एखाद्या कारणास्तव मेल्यानीन च प्रमाण कमी झालं तरी सुद्धा आपले केशर पांढरे होऊ शकतात. तर आपण आपला कांदा चिरून घ्यायचा आहे हा चिरलेला कांदा आपण मिक्सर मध्ये टाकणार आहोत आणि मिक्सर मध्ये टाकल्या नंतर आपण त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे जितकी बारीक पेस्ट करता येईल तितकी बारीक करून घ्यायची आहे त्यानंतर आपण एक स्वच्छ धुतलेले कापड घ्यायचं आहे रुमाल असेल तरीसुद्धा चालेल. ते कापड एका वाटीवर ठेवायचं आहे आणि आपण केलेली कांद्याची बारीक पेस्ट त्या कापडावरी ठेवून केलेली पेस्ट गाळून घ्यायची आहे. गाळल्यामुळे काय होईल तर कांद्याचा जो रस आहे हा रस त्या वाटीमध्ये आपल्याला मिळेल हा रस वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे.
ह्या आपण काढलेल्या रसाचा उपयोग करायचा आहे सकाळी अंघोळीपूर्वी …तर हा रस अंघोळीपूर्वी आपल्या डोक्यांवरील केसांना लावायचा आहे. आपण ज्या प्रकारे केसांना तेल लावून केसांच्या मुळा पर्यंत तेल जाई पर्यंत चोळतो त्याच प्रकारे हा कांद्याचा रस केसांच्या मुळा पर्यंत जाई पर्यंत चोळायच आहे जेणेकरून हा रस डोक्याच्या त्वचेत मुरला पाहिजे,केसांच्या मुळात मुरला पाहिजे आशा प्रकारे आपल्याला रस डोक्यावर केसांना चोळायच आहे इंग्लिश मध्ये आपण त्याला मॉलिश म्हणतो त्या प्रकारे आपल्याला करायचं आहे .. यानंतर आपण हा रस अर्धा तास केसांमध्ये मुरू द्यायचा आहे. अर्ध्या तासानंतर आपण अंघोळ करताना स्वच्छ डोक धुऊन घ्यायचं आहे. दिवसभर ठेवायचं नाह , कांदा हा तिखट गुणधर्माचा आहे तो दिवसभर ठेवायची गरज नाही..अर्ध्या तासाने तुम्ही तुमच डोकं स्वच्छ धुऊन टाका..
तर मित्रांनो, असा हा उपाय तुम्ही दररोज सकाळी पंधरा दिवस जरी केलात तर तुम्हाला हळू हळू दिसू लागेल की तुमचे पांढरे केस हे हळू हळू काळे व्हायला लागलेत… मित्रांनो केस पांढरे होण्याचे जे प्रमाण वाढलंय त्यामध्ये आपला आहार सुद्धा कारणीभूत आहे..आपल्या आहारात जर जीवनसत्व ब, प्रथिनं, कॉपर, आयोडीन इत्यादी घटकांचा आभाव असेल म्हणजे हे घटक असणारे पदार्थ आपण आपल्या आहारामध्ये घेत नसू तरी सुद्धा आपले केस अकाली पांढरे होऊ शकतात ..याचा अर्थ असा की हे घटक असणारे पदार्थ आपल्या आहारात घेतले पाहिजेत खाल्ले पाहिजेत .।
अनुवंशिकता हा एक घटक आहे की जो आपले केस अकाली पांढरे करतो. आपल्या वडिलांचे, आईचे, आजोबांचे किंवा आज्जी यांचे केस जर अकाली पांढरे झाले असतील तर त्यांच्याकडून ते अनुवंशिकतेनं ते आपल्याकडे येऊ शकत. त्यानंतर अस्वच्छता हे एक कारण आहे. आपण जर आपल्या केसांची योग्य ती निगा राखत नसू किंवा आपल्या कडून वारंवार जे लोक शहरामध्ये राहतात त्यांना धुळीचा आणि धुराचा सामना करावा लागतो त्याला प्रदूषण आपण म्हणतो. तर या प्रदूषणा मुळे सुध्दा आपले केस अकाली पांढरे होतात तर ही जी सर्व काही कारणे आहेत ही केस पांढरे होण्याची कारणे आहेत …
कोणत्याही गोष्टी करण्यापूर्वी डॉक्टरचा सल्ला घेणे कधीही उत्तमच कारण प्रत्येकाचे शरीर वेगळे असते. त्यामुळे एखादा सल्ला किंवा उपाय हा सर्वांसाठी लागू होईल असे नसते. त्यामुळे लेखातील कोणतेही उपाय करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्या शिवाय कोणतेही पाऊल उचलू नये मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.