2 दिवसात चेहरा उजळेल, पिंपल्स, काळे डाग कमी करण्यासाठी घरगुती रामबाण उपाय…

नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पिंपल्स, मुरूम किंव्हा फोड यावर आयुर्वेदाने कोणते उपाय सांगितले आहेत. आज आपण बाजारात मिळणारी विविध प्रोडक्ट विकत घेत आहोत. मात्र त्यांचा म्हणावं असा फायदा होताना दिसत नाही. विशेषतः तरुण वर्ग, तरुण मुल आणि मुली यांच्या चेहऱ्यावरती पिंपल्स, मुरूम किंव्हा फोड येण्याची संख्या इतकी वाढली आहे की, ते अगदी नाराज झालेले आहेत आणि त्यासाठीच आपण हा लेख आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. चला तर मग पाहुयात…

मित्रांनो तुमच्या चेहऱ्यावरती जर पिंपल्स, मुरूम, फोड जर खूप जास्त आले असतील तर आपण अत्यंत साधा आणि सरळ उपाय करायचं आहे. हा उपाय आहे जांभळाच बी…सगळ्यांना जांभूळ माहीत असेल. तर हे जांभूळ घ्यायच आहे. आणि त्याची बी घ्यायच्या आहेत. आणि ही बी एक दगड घ्या तो साफ करा आणि ही जांभळाची बी तुम्ही त्यावरती उगळून घ्या.

अशी जांभळाची बी उगाळून ती झोपताना आपल्या चेहऱ्यावरती लावा. अस केल्या नंतर सकाळी उठल्यानंतर साध्या पाण्याने तुमचा चेहरा तुम्ही स्वच्छ धुवा. हा उपाय तुम्हाला दहा ते पंधरा दिवस करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला याचा परीणाम दिसून येईल. एक ते दोन दिवसात तुम्हाला याचा परीणाम दिसून येणार नाही. त्यासाठी तुम्हाला दहा ते पंधरा दिवस हा उपाय करावा लागेल.

मित्रांनो दुसरा जो उपाय आयुर्वेदामध्ये सांगितला आहे, तो असा आहे की आपण लिंबाची पाने घ्यायची आहेत. लिंब आपल्याला माहीत असेलच. लिंबाची आपल्याला पाच ते दहा पाने घ्यायची आहेत. आणि ही पाच ते दहा पाने आपण सकाळी उठून उपाशीपोटी चावून खायची आहेत. आणि ती थुंकायची नाहीत. तुम्हाला माहीत आहे की कडुलिंब हे अतिशय कडू असत. या लिंब मध्ये खूप मोठ्या प्रमाणात Antibacterial गुणधर्म असतात. आणि त्यामुळे तुमचे पिंपल्स सुद्धा बरे होऊ शकतात. ही लिंबाची पाने खाऊन झाल्यानंतर एक ग्लास पाणी प्यायचे आहे.

तिसरा जो उपाय आहे तो आहे मुलतानी मातीचा. तर आपण मुलतानी माती घ्यायची आहे. सकाळी सकाळी ही मुलतानी माती भिजत घालायची आहे. जेणे करून दिवसभर ही भिजेल. आणि एकदा ही चांगली भिजली की रात्री झोपताना मातीचा लेफ चेहऱ्यावरती लावायचा आहे. आणि असा हा लेफ रात्रभर चेहऱ्यावरती राहुद्या.

सकाळी साध्या पाण्याने ते धुऊन टाका. माती तुम्हाला गुलाब पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे. काही दिवस हा उपाय तुम्ही करून पहा. तुमच्या चेहऱ्यावरती जे आलेले पिंपल्स, मुरूम, आहेत ते नक्की कमी झालेले दिसून येईल. आणि असा जो उपाय तुम्ही पंधरा ते वीस दिवस केला तर तुम्हाला याचा परीणाम नक्की दिसेल.

पुढचा जो उपाय आहे तो आहे जायफळाचा..तर अस हे जायफळ घ्यायच आहे आणि हे रात्री झोपताना उगाळून चेहऱ्यावरती लावायचा आहे. तुम्हाला नक्की फरक झालेला दिसून येईल. पुढचा उपय अतिशय सोपा आहे देशी गाईचे दुध घ्यायचे आहे. आणि जर देशी गाईचे दुध नाही मिळाले तर साध्या गाईचे दुध घ्यायचे आहे. तर हे दुध घेतल्यानंतर त्या मध्ये हळद टाकायची आहे.आणि रात्री झोपताना ते चेहऱ्यावर लावा. तर अस हे मिश्रण काही दिवस तुम्ही लावत रहा. तुम्हाला दहा दिवसानंतर फरक झालेला दिसून येईल..कारण हळदीमध्ये सुद्धा Antibacterial प्रमाण खूप ज्यास्त आहे.

आणि शेवटचा जो उपाय आहे दोन चिंच आपल्याला घ्यायची आहेत. आणि ती पाण्यात भिजत ठेवायची आहे. साधारण चार ते पाच चमचे पाणी तुम्ही घ्या. ह्या चिंचा दिवसभर भिजू द्या. आणि संध्याकाळी खलबत्ता मध्ये ते रगडून घ्या.आणि नंतर हे मिश्रण आपण झोपताना चेहऱ्यावर लावायचं आहे. तर अस दहा ते पंधरा दिवस आपल्याला करावं लागेल. आणि नंतर तुम्हाला पिंपल्स कमी झालेले दिसतील.

तर मित्रांनो अश्या प्रकारचे उपाय तुम्ही करू शकता. मात्र हे उपाय करताना काही पत्य तुम्ही नक्की पाळा. पत्य कोणती तर अनेकांचा आहार हा समतोल आहार नाही आहे. फास्ट फूड खूप लोक खातात. तर तर कमी करा. तेलकट पदार्थ आहेत आपल्या खाण्यात ते कमी करा. दुसरं म्हणजे अनेकांचे जागरण होत असत तर ते सुद्धा तुम्ही कमी करा. आणि एक म्हणजे सकाळचा योगा करत चला. तर अश्या ह्या गोष्टी तुम्ही पाळल्या तर नक्की तुम्हाला फरक जाणवेल..पिंपल्स, मुरूम याची समस्या मुळापासून जाईल…हे उपाय जर तुम्हाला आवडले असतील तर नक्की कंमेंट करून आम्हाला कळवा..

नोट: जर तुम्हाला आमच्याद्वारे दिलेली माहिती उत्तम वाटली, तर खाली दिलेल्या कमेन्ट बॉक्समध्ये तुम्ही कमेन्ट करू शकता. ही पोस्ट आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. या प्रकारे आम्ही नवीन माहिती लेखाच्या माध्यमातून तुमच्यासाठी घेऊन येऊ. धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published.