महिलांनो एकदा बघाच… घरात सासुशीच काय, कधीही कुणाशीच भांडण होणार नाही…

स्वानंदी….! नावाप्रमाणेच शांत आणि स्वतःचा आनंद स्वतः शोधून घेणारी.. समोरचा बदलत नाही म्हणून दुर्लक्षाय नमः करून आपणच स्वतःत बदल करून स्वच्छंदी आणि आनंदी राहणारी.. फक्त आणि फक्त स्वतःच्या मनाशी मोकळेपणाने बोलणारी.. आज तिचा वाढदिवस होता म्हणून रात्री बारावाजल्यापासूनच कितीतरी मित्र आणि मैत्रीणीचे फोन आले होते मेसेजस देखील आले होते. परंतु तिचा नवरा समीर.. मात्र आठ वाजले तरी गाडच झोपलेला.. अरे समीर उठ ना.. ऑफिसला जायचं नाही का?, आठ वाजेलत, समीर डोळे चोळत ताडकन उठला, आणि म्हणाला आठ वाजलेत..!

जरा लवकर उठवायच ना स्वानंदी, उशीर झाला तर ‘बस’ निघून जाईल. अरे मी कधीपासून आवाज देतेय तुला ऊठऊठ म्हणून….!, हवं तर विचार आईना.. आता घे आंघोळ उरकुन, इथे तुझा डब्बा भरून ठेवलाय आणि आई बाबासाठी पोळ्याच्या डब्ब्यात, पोळ्यांमध्ये ज्वारीची भाकरी ठेवलीय, मऊ राहील म्हणून…. वांग्याच भरीत आणि तुरीची भाजी किचनवर ठेवते.

मी जाऊ का खूप उशीर झालाय ऑफिसला, सासूबाईनच उ नाही की चू नाही. स्वानंदी घरतून बाहेर पडताच मनातल्या मनात बोलू लागली, आज काय झालय याना रोज तर तोंडाचा पट्टा बंद नसतो.. सकाळची थोडीफार मदत केली तर काय बिगडेल. पण येवडस हलायला देखील नको.. जास्त करायचेच नाही पण कुठं चहा ठेव, डब्बे भरले तरी किती मदत होईल मला, जीव नुसता मेटाकुटीला येतो. पण जाऊदे तश्या चांगल्या आहेत.

मला कामाला जाऊ द्यायला समीर तयार नव्हता, म्हणून त्यांनीच तर त्याला समजावलं…. यायला उशीर झाला तर कधी शब्दही बोलत नाहीत, उशिरा आले स्वयंपाकाला उशीर झाला तरी समजून घेतात. पण स्वतः मात्र साधा कुकरही लावत नाहीत. स्वानंदीच मन म्हणायचं, स्वानंदी आपलं काय ठरलंय, दुर्लक्षाय नमः…. आणि नोकरी करण्याचा आठाहास तुझाच ना, मग आता कुणाला बोलतेस , स्वानंदीच हे नेहमीचच होत, समोर सगळ्यांशी गोडगोड बोलणार पण स्वतःला काय वाटतंय हे स्वतःच्या मनाशी सोडून कोणाशीच बोलणार देखील नाही, समिरशी तर अजिबातच नाही..

नोकरीमुळे दोघांना एक तर थोडाच वेळ भेटतो त्यात ह्या कुरकुरी सांगत बसलो तर तो वेळही वाया घालवायचा तिला पटत न्हवते. आज तिला दिवसभर ऑफिसमध्ये मेसेज आणि फोन येत होते तिला शुभेच्छा देण्यासाठी पण समीरचा ना कॉल, ना मेसेज , म्हणून ती थोडी नाराज होती.. आज ऑफिस सुटल्यावर तिच्या ग्रुप ने वाढदिवस साजरा करण्यासाठी केक आणला होता. त्यामूळे तिला घरी निघायला थोडा उशीर झाला.

साडेसात वाजले ऑफिस मधून निघायला, तिच्या डोक्यात विचारचक्र सुरू झालं, आता घरी जाऊन काय स्वयंपाक करायचा. गेल्या गेल्या कुकर लावते, मग कणिक मळते, पण भाजी काय करू हा मोठा प्रश्न आहे. फ्रिज मध्ये काय काय आहे, त्यातलं कोणाला काय आवडत, कोणाला काय नाही आवडत असा विचार करत करत ती घराजवळ पोहोचली. बेल वाजवली, समीरने दार उघडलं. समीर आज लवकर, मॅडम आज तुम्हालाच उशीर झालाय बर….

चला स्वयंपाकाला लागते उशीर झाला आहे, आई बाबांना भूक लागली असेल.. हो जा बर पटकन, आज मलाही खूप भूक लागलीय. हो आलेच पटकन हातपाय धुवून, ती मनात कसा आहे हा याला अजून ही नाही आठवलं आज माझा वाढदिवस आहे म्हणून…. आणि आता लगेच भूक लागली. अस वाटत ना याला बायकोच्या मनाचा काय विचारच नाही. ती फ्रेश होऊन किचन मध्ये आली. किचनमध्ये तिच्या आवडीच्या कटाच्या आमटीचा घमघमाट सुटला होता. टोपले उघडून पाहिले तर पुरणपोळी, शेजारच्या पातेल्यात भजी, हे सगळं बघून तिला आश्चर्यच वाटलं.

अरे हे काय समीर, मी आल्या पासून, बाबांना डाळीचे पदार्थ द्यायचे नाहीत म्हणून आपण पुरणपोळी कटाची आमटी कधीच अगदी सणावाराला सुद्धा करत नाही. इतर काही करतो ना. मग आज काय विशेष, आणि तुम्हा तिघांनाही कांदा भजी आवडते ना म हा थाट कोणासाठी, कोणी येणार आहे का? समीर म्हणाला विचार मातोश्रीना, समीरची आई आग स्वानंदी रोज आमच्या आवडीनुसार स्वयंपाक करतेस,

आमच्या आवडीनिवडी जपताजपता आपल्याला काय आवडत हे तर तू विसरून गेलीस. आणि तुला काय वाटलं आम्ही तुझा वाढदिवस विसरलो होय आता तिला रडूच आवरेना आई ती सासूच्या गळ्यात पडून रडू लागली सासू चेस्टने रडण्याचा कार्यक्रम उरकून घ्या आपला नियोजनात हा कार्यक्रम नाही त्यामुळे वेळ वाया घालवू नका त्यामुळे केक कापयचा स्वानंदीला आईबाबांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. स्वानंदीला आपला वाढदिवस असा साजरा झालेला. पाहून खुप खूप आनंद झाला.

सगळे उरकल्यावर स्वानंदी आपल्या मनाशी बोलू लागली कोणाची तक्रार कोणाकडे केली नाही, त्याचे हे फळ तुला त्रास होतो मान्य आहे पण तू जर भांडत बसली असतीस तर तुला हे प्रेम कधीच समजलं नसत. त्रास होतोय तर काम वाली बाई ठेव त्यांनीही त्यांच्या काळात केलेच की काम, नोकरी मुलं सांभाळ, जगुद्या त्यांनाही आता जरा मनासारखं.. कधी राग येईलही तुला पण त्यावर एकच मंत्र दुर्लक्षाय नमः स्वतःच पुटपुटली पटलं रे मन तुझं.

मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.