कर्करोग टाळण्यासाठी लक्षात ठेवा या ६ गोष्टी, नाहीतर भोगावे लागतील वाईट परिणाम…

कर्करोगाचे नाव ऐकताच कोणत्याही व्यक्तीचा प्रथम जीव घाबरा होतो. हा आजार लहान मुलांपासून ते वडीलधार्‍यापर्यंत कोणालाही होऊ शकतो. सुरुवातीला हा रोग साधारण वाटतो, परंतु कर्करोग वेळेवर जर कॅन्सर समजला तर त्याचा उपचार केला जाऊ शकतो. आणि त्यांचे पुर्णपणे निर्मूलन किंवा उच्चाटन केले जाऊ शकते.

परंतु हा रोग जर वेळेवर समजला नाही, तर मात्र त्यावर उपचार करणे शक्य नाही. आपल्या शरीरात बर्‍याच वाईट पेशी असतात, तसेच आपल्या शरीरातील वाईट पेशी सारख्या संपत असतात आणि नवीन पेशी तयार होतात. परंतु कर्करोगाच्या आजारामुळे पांढर्‍या आणि लाल रक्तपेशींचे संतुलन बिघडू लागते, ज्यामुळे पेशींचा विस्तार हा नियंत्रणाच्या पलीकडे होतो.

कर्करोगाच्या पेशी शरीरातील चांगल्या पेशींच्या कार्यात बाधा आणतात आणि त्यांचे कार्य रोखण्यास सुरवात करतात, कर्करोगाच्या पेशी आपल्या शरीरात नवीन आजारी पेशी निर्माण करतात आणि ज्या अवयवांमध्ये या पेशी तयार होतात त्या त्या अवयवाच्या कार्यपद्धतीवर त्या परिणाम करण्यास सुरवात करतात.

परंतु अशा काही गोष्टी आहेत, ज्याद्वारे कर्करोगाचा फैलाव वाढण्यापासून रोखता येते. आपल्या जीवनशैलीचे योग्य नियमन केल्यास कर्करोगासारख्या गंभीर समस्या टाळता येतील. आज आम्ही आपल्याला या लेखाद्वारे कर्करोगासारख्या गंभीर आजारापासून कसे स्वत:चा बचाव करता येईल, याबद्दल माहिती देणार आहोत. चला तर मग बघूया कर्करोगाचा आजार कसा रोखता येईल.

नियमित व्यायाम करणे : तुम्हाला जर कर्करोगासारखी गंभीर समस्या टाळायची असेल तर तुम्हाला दररोज नियमित व्यायाम करावा लागेल. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, नियमितपणे व्यायाम करणार्‍या महिलांना स्तंनाच्या कर्करोगाचा त्रास होण्याची शक्यता खूपच कमी असते. तुम्हाला जर कॅन्सर या आजारापासून वाचायचे असेल, तर आठवड्यातून ५ दिवस सुमारे ३० मिनिटे व्यायाम करा.

धूम्रपानापासून वंचित राहा: आपण जर धूम्रपान करणे सोडले, तर रक्त कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो. धूम्रपान करणार्‍या व्यक्तींच्या शरीरात निकोटीन प्रवेश करते, जे अनेक प्रकारच्या कर्करोगासाठी जबाबदार असते. धूम्रपान केल्याने फुफ्फुस आणि तोंडाचा कर्करोग पसरतो. सर्व कारणांमुळे आपण धूम्रपान करणे टाळावे आणि धूम्रपान क्षेत्रात जाण्यापासून स्वत:चा बचाव करावा.

जास्त प्रमाणात साखर आणि मीठाचे सेवन करू नका: जर आपल्याला कर्करोगाचा धोका कमी करायचा असेल, तर आपण गोड पदार्थांचे सेवन जास्त प्रमाणात करणे टाळावे आणि जेवणामध्ये मीठाचे प्रमाण कमी ठेवावे. साखरेत कमी फायबर असते, जे आपल्या शरीराच्या पौष्टिक क्षमतेला कमकुवत करते आणि मिठाच्या जास्त सेवनाने पोटाचा कर्करोग होऊ शकतो, म्हणून आपण या दोन्ही गोष्टींचे सेवन कमीत कमी प्रमाणात केले पाहिजे.

लाल मांस सेवन करण्यापासून दूर राहा: जर आपण लाल मांसाचे सेवन करीत असाल, तर यामुळे आतड्याच्या कर्करोगाचा धोका वाढतो. एका अध्ययनानुसार, लाल मांस खाल्ल्याने आतड्यांच्या कर्करोगाचा धोका १२% वाढतो. ज्या स्त्रिया जास्त प्रमाणात लाल मांसाचे सेवन करतात, त्यांना स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता असते. म्हणून आपल्याला लाल मांस खाणे टाळले पाहिजे.

पारंपारिक पद्धतीने अन्न शिजवले पाहिजे : आजच्या काळात, लोक आपला वेळ वाचविण्यासाठी मायक्रोवेव्हमध्ये अन्न शिजवतात, ज्यामुळे अन्नाचे पौष्टिक मूल्य संपुष्टात येते. म्हणून आपण अन्न उकळवून आणि वाफवून शिजवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण थंड जेवण गरम करून खाण्यापासून स्वत:ला वाचवले पाहिजे.

निरोगी आहार घेणे : जर आपल्याला कर्करोगाचा त्रास टाळायचा असेल तर, जीवनसत्व आणि पौष्टिक आहार घेणे अत्यंत जरूरी आहे. आपल्या आहाराच्या वेळापत्रकामध्ये हिरव्या भाज्या आणि पालेभाज्यांचा समावेश करा. अंडी, मशरूम, गाजर, कोबी, टोमॅटो शा भाज्यांचे सेवन करा. कारण भाज्या आणि फळे यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते. फायबर आपले कर्करोगापासून संरक्षण करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *