हिरव्या मिरच्या खाल्ल्याने शरीरात काय घडते, जे खातात त्यांनी एक वेळ अवश्य वाचा…

सर्वसाधारणपणे असे मनात येते, की तिखट किंवा मसालेदार खाणे चांगले नसते आणि त्याच्या सेवनाने पोटात किंवा छातीत जळजळ होते. परंतु, स्वयंपाकघरात असेलेली हिरवी मिरची फक्त जेवणाचा स्वाद वाढवत नाही तर त्याच बरोबर मिरचीचे कितीतरी फायदे आहेत आपल्या स्वास्थ्यासाठी. हिरव्या मिरचीशिवाय आपले जेवण अपूर्ण आहे. चला तर मग बघूया, काय आहेत हे फायदे:

हिरव्या मिरचीमध्ये कितीतरी पोषक तत्वे असतात, जसे की,विटामिन ए, बी ६,सी, आयरन, कॉपर, पोटेशियम, प्रोटीनआणि कार्बोहाइड्रेट. एवढेच नाही, तर यामध्ये बीटा कैरोटीन, क्रीप्टोक्सान्थिन, लुटेन -जॅक्सन्थि‍न यासारखे स्वास्थ्यवर्धक घटक पण अस्तित्वात असतात.

हिरव्या मिरचीमुळे फुफुसान्च्या कॅन्सरचा धोका कमी होतो. पुरुषांनी हिरवी मिरची खाल्ली पाहिजे, कारण त्यांना आतड्याच्या कॅन्सरचा धोका असतो. वैज्ञानिक शोधांमुळे हे सिद्ध केले आहे, की हिरवी मिरची खाल्यामुळे आतड्यांच्या कॅन्सरची समस्या नाहीशी होते. त्वचेसाठी उपयोगी: हिरव्या मिरचीत बरेच विटामिन्स आढळले आहेत, जे त्वचेसाठी खूपच फायदेशीर आहेत. जर तुम्ही हिरवी मिरची खात असाल, तर तुमची त्वचा तजेलदार दिसेल.

हिरव्या मिरचीत आढळून येणारे व्हिटॅमिन्स त्वचेच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असतात. तुम्ही जर हिरव्या मिरचीचे सेवन केले तर तुमची त्वचा उजळायला मदत होते. त्याचबरोबर हिरव्या मिरचीचा रस तुम्ही मधामध्ये मिसळून पिल्यास तुमचा दम्याचा आजार देखील बरा होऊ शकतो.

वेदना कमी करते, दमा, सायनस यामध्ये मदत : ताज्या हिरव्या मिरचीचा एक चमचा रस, मधात मिसळून रिकाम्या पोटी सेवन केल्यामुळे दम्याच्या रूग्णाला आराम पडतो. हा उपचार १० दिवस केल्याने यांचा फायदा नक्की मिळतो. तसेच, हिरवी मिरची खाल्ल्यामुळे शरीरातील उष्णता बाहेर निघते, जी वेदना दूर करते. हिरव्या मिरची मध्ये कैप्सेइसिन (Capsaicin)असते, जे नाकातील रक्त प्रवाह सुरळीत करते. त्यामुळे सर्दी आणि सायनस या समस्यांपासून आराम मिळतो.

आपला मूड उत्तम ठेवते: हिरवी मिरची आपला मूड बूस्टर मधून काम करते. ही मेंदूत एंडोर्फिनचा प्रसार करते, ज्यामुळे आपला मूड खूपच छान व आपण टवटवीत राहतो, आनंदी राहतो. मिरची आपले भोजन लवकर पचवते. तसेच, शरीराची पचनक्रिया सुरळीत करते. यामध्ये भरपूर प्रमाणात फाइबरची मात्रा असते. म्हणून, बद्धकोष्टतेला ती दूर ठेवते.

हिरव्या मिरचीत प्रतिजैविकांचाही गुणधर्म आढळून येतो, त्यामुळे शरीर निर्जंतुक राहण्यास मदत होते.हिरवी मिरची शरीरातील साखरेचे प्रमाण देखील कमी करते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी मिरची खाणं गरजेचे आहे. जर तुमची शुगर लेव्हल वाढली असेल तर ती कमी करण्यास मदत होते. त्याचबरोबर शरीरातील मेद कमी करुन मेटाबॅालिजम वाढवते. त्यामुळे मिरची मोठ्या प्रमाणात आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

जंतुसंसर्गापासून वाचवते: हिरव्या मिरचीमध्ये अॅंटी- बैक्टीरियल गुणधर्म आढळतात, जे जंतु संसर्गाला दूर ठेवतात. म्हणूनच, हिरवी मिरची खाल्ल्यामुळे तुम्हाला संसर्गजन्य त्वचा रोग होत नाहीत. आयर्न वाढविण्यास मदत : महिलांमध्ये नेहमीच आयर्नची कमतरता असते. परंतु, हिरवी मिरची भोजनात रोज खाल्ल्यामुळे तुमची ती कमतरता पूर्ण होते. यामध्ये विटामिन सी असते. परंतु, त्यांना थंड जागी ठेवावे कारण गरमीमुळे हिरव्या मिरचीतील पोषक तत्वे नाहीशी होतात.

हिरव्या मिरचीमध्ये आढळणारा घटक म्हणजे कैप्साइसिन जो वजन कमी करण्यास मदत करतो. खरे तर, कैप्साइसिन मध्ये अॅंटी-ओबेसिटीचे गुण असतात. त्यामुळे हे गुण लठ्ठपणा दूर करतात, त्याचबरोबर, वजन नियंत्रित करतात.

नोट: जर तुम्हाला आमच्याद्वारे दिलेली माहिती उत्तम वाटली, तर खाली दिलेल्या कमेन्ट बॉक्समध्ये तुम्ही कमेन्ट करू शकता. ही पोस्ट आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. या प्रकारे आम्ही नवीन माहिती लेखाच्या माध्यमातून तुमच्यासाठी घेऊन येऊ. धन्यवाद!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.