थंडीच्या दिवसात कोरड्या पडलेल्या त्वचेला मुलायम बनवण्याचे घरगुती उपाय…

थंडीमध्ये वातावरणाचे तापमान खूपच कमी असते. त्या कारणामुळे त्वचा कोरडी पडणे ही समस्या अगदी साधारण आहे. थंडीत हवेमध्ये उष्णता नसल्यामुळे वातावरणाचे तापमान खूपच कमी होते. त्यामुळे त्वचा खूपच शुष्क आणि कोरडी पडते. थंडीमध्ये शरीर डीहायड्रेट होते, तसेच शरीराचा मुलायमपणा कमी होत जातो. याशिवाय, लोक थंडीच्या दिवसात रोज आंघोळ करायला पण तयार नसतात.

त्यामुळे त्वचेवर खाज आणि त्वचेची आग होण्याची समस्या दिसायला लागते. पण तुम्हाला आता काळजी करण्याची व हैराण होण्याची बिलकुल गरज नाही. कितीतरी घरगुती उपाय असे असतात, जे तुम्हाला या सर्व त्रासापासून स्वत:चे संरक्षण करायला मदत करतात. या उपचारांसाठी वापरण्यात येणार्‍या पदार्थात असणारे पोषक तत्व कोरडी त्वचा आणि खाज यापासून तुम्हाला आराम देण्यास मदत करतात. चला तर मग जाणून घेऊया, काय आहेत हे घरगुती उपाय:

थंडीच्या दिवसात त्वचा कोरडी झाल्याने ही समस्या अधिक जाणवते. उन्हाळ्यात शरीराची त्वचा कोमल राहते. मात्र थंडीत असे नसते. पाण्याच्या कमतरतेमुळे टाचा फुटतात. यासाठी तेल मालिश गुणकारी ठरते. यासाठी काळे मीठ फारच फायदेशीर ठरते. काळं मीठ पाण्यात टाकून त्या पाण्याने स्नान केल्यास त्वचेचा कोरडेपणा दूर होतो. तसेच केसही मऊ राहतात. अनेक साबण, मास्क, टोनर तसेत क्लिंझरमध्ये काळ्या मिठाचा वापर केलेला असतो.

काळं मीठ स्क्रब आणि टोनरसारखेही काम करते. यासाठी एक चमचा बारीक काळं मीठ घ्या त्यात एक चमचा ऑलिव्ह ऑईल टाकून पेस्ट बनवा. हे मिश्रण स्क्रबसारखे चेहऱ्याला लावा. त्वचा स्वच्छ होईल.

मिल्क क्रीम मध्ये असलेले फैटी अॅसिड नैसर्गिक मोयश्चरायझर सारखे काम करते. हे त्वचेच्या पीएच पातळीला नियंत्रित करते आणि त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यास मदत करते. म्हणूनच रोज १० मिनिटे तुम्हाला त्वचेवर मिल्क क्रीम लावून ठेवले पाहिजे व नंतर आंघोळ केली पाहिजे. मध अॅंटी-ओक्सिडेंट, अॅंटी- मायक्रोबियल आणि हयुमेक्टेंट असल्यामुळे तो नैसर्गिक मोयश्चरायझर सारखे काम करतो. आंघोळीच्या आधी त्वचेवर मधाची मालीश करा आणि १० मिनिटे तसेच सोडा. तुम्हाला नक्की फरक जाणवेल.

नारळाच्या तेलात फैटी अॅसिड असते, जे त्वचेवरील मुलायमपणा तसाच ठेवण्यास मदत करते. यामध्ये विटामीन ई पण असते., जे त्वचा रुक्ष झाली असेल, तर परत मुलायम करण्यास मदत करते. आंघोळीच्या आधी नारळाचे तेल हलके गरम करून त्वचेवर लावा. यामुळे त्वचेचा कोरडेपणा दूर होईल व त्वचा मुलायम होईल.

एवोंकैडोंमध्ये ओमेगा ३ फैटी अॅसिड असते जे त्वचेला फ्री-रेडिकल्स आणि ओक्सिडेटिव तणावापासून वाचवते. यामुळे त्वचेचा रुक्षपणा कमी होतो. एवोंकैडों आणि मधाची पेस्ट बनवा आणि आपल्या त्वचेवर लावून २० मिनिटे सोडून द्या आणि नंतर हलक्या गरम पाण्याने धुवा आणि फरक अनुभवा.

ऑलिव्हच्या तेलामध्ये अॅंटी-ओक्सिडेंट आणि विटामीन ई असते. ज्यामुळे त्वचेचा कोरडेपणा किंवा रुक्षपणा कमी होतो. ते एक नैसर्गिक मोयश्चरायझर सारखे काम करते. आंघोळीच्या आधी साधारण ३० मिनिटे ऑलिव्ह तेलाने शरीराला मालीश करा आणि नंतर आंघोळ करा. तुम्हाला खूपच ताजेतवाने वाटेल त्याचबरोबर त्वचेमधील रुक्षपणा जाऊन त्वचा मुलायम होईल.

आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये टाका आणि नक्की तुमच्या मित्रमैत्रिणीबरोबर शेअर करा. आवडला असेल तर लाइक करायला अजिबात विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.