बॉलीवुडमध्ये सिंघम या नावाने प्रसिद्ध असलेले अजय देवगणला बघून आज सुद्धा लाखो मुलींची हृदये धडकतात. तर त्यांची पत्नी काजोल यांचे सौन्दर्य आणि त्यांचा अदानवर मुलगे त्यांचे चाहते आहेत. अजय-काजोल यांची प्रेम-कथा खूपच खास आहे. दोघांनी वयाच्या २१ व्या वर्षाआधीच लग्न केले आणि लाखो लोकांची निराशा झाली.
कारण, त्या वेळी सुद्धा मुलगे आणि मुली या दोघांवर एकदम फिदा होते. दोघांची जोडी फिल्म्समध्ये खूप छान जमली होती, त्याशिवाय खर्या आयुष्यात पण त्यांची जोडी खूप छान आहे. जशी त्यांची केमिस्ट्री सिनेमाच्या पडद्यावर आहे, तशीच उत्तम केमिस्ट्री दोघांच्या वैवाहिक जीवनात आहे.
काजोलच आहे का अजयचे पहिले प्रेम: तसे तर बॉलीवुडमध्ये कितीतरी कपल्स आहेत, पण या दोघांना बघून मनात नेहमीच विचार येतो, कि दोघांमध्ये प्रेम कसे जमले असेल. कोणी पुढाकार घेतला असेल, आणि काजोलने कोणत्या दुसर्या अभिनेत्याशी लग्न का केले नाही आणि सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे, की काजोलच आहे का अजयचे पहिले प्रेम? चला तर मग आम्ही तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे देतो:
कसे जवळ आले अजय-काजोल: त्या काळात दोघेही बॉलीवुडमध्ये चांगल्या स्थानावर होते. दोघांची जोडी जेव्हा पण पडद्यावर येत असे, खूप कमाल होती त्यांची जोडी, व पडद्यावर धमाल करत असत दोघेही. दोघांच्या प्रेमाची सुरुवात फिल्म हलचल पासून झाली. या फिल्म मुळे दोघे जवळ आले आणि जेव्हा मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले, तेव्हा दोघांनी २४ फेब्रुवरी, १९९९ मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. या दोघांचा मुलाचे नाव युग आणि मुलीचे नाव न्यासा आहे.
या कारणाने केले लग्न: खरे तर, जेव्हा दोघांनी लग्न केले, त्याच्या आधी काजोलने या इंडस्ट्रीमध्ये ९ वर्षे काम केले होते. दोघांनीही कितीतरी फिल्म्समध्ये एकत्र काम केले होते. बर्याच वेळा काजोलच अजयकडून एक मित्र म्हणून टिप्स घेत असे. दोघांमध्ये चांगली मैत्री होती. जेव्हा दोघांनाही एकमेकांचा सहवास आणि साधेपणा आवडू लागला, तेव्हा दोघांनीही लग्न करून स्थिरस्थावर होण्याचा निर्णय घेतला.
अजयचे या अभिनेत्रींबरोबर जोडले गेले आहे नाव: तसे तर अजयचे पहिले प्रेम काजोल नाहीये. हे खरे आहे, की अजयने आपली पत्नी काजोल, हिच्या आधी रवीना टंडन आणि करिश्मा कपूर यांना डेट केले आहे. प्रेक्षकांना पण करिश्मा-अजय ही जोडी खूपच पसंत पडली होती.
त्या वेळच्या फिल्म मॅगजीन मध्ये असे छापून आले होते की, जेव्हा अजय रवीना टंडनला डेट करत होता, तेव्हा करिश्मा कपूरने त्याच्या जीवनात प्रवेश केला. पण नंतर, शेवटी अजयने रवीना-करिश्मा दोघींना बाजूला ठेवून काजोल बरोबर लग्न केले.
रवीनाने पण नंतर लग्न केले आणि करिश्मा कपूरने लग्न तर केले., पण तिचे लग्न जास्त दिवस टिकले नाही. करिश्माने सन २०१६ मध्ये संजय कपूर पासून घटस्फोट घेतला.