माधुरी दीक्षितची अशी झाली होती डॉक्टर नेनेशी पहिली भेट, पहिल्याच भेटीत अभिनेत्रीला…

माधुरी दीक्षित हिने श्रीराम नेने यांच्याशी सन १९९९ मध्ये लग्न केले होते. त्यांच्या लग्नाला आता जवळ जवळ २१ वर्षे झाली आहेत. ही दोघेही आपल्या वैवाहिक जीवनात खूपच आनंदात आहेत. माधुरी दीक्षित नेहमीच आपल्या पतिबरोबर वीडियो, फोटोज सोशल मीडियावर लोकांबरोबर शेयर करीत असते. या दोघांची पहिली भेट म्हणजेच त्यांची प्रेम कथा कशी सुरू झाली व कशी माधुरी डॉक्टर नेने यांच्या प्रेमात वेडी झाली होती आणि मग लग्न कसे केले, असे अनेक प्रश्न तिच्या चाहत्यांच्या मनात येत असतील, तर ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

माधुरी दीक्षित हिचा जन्म मुंबईमध्ये शंकर आणि स्नेहलता दीक्षित या मराठी मातापित्यांच्या घरी झाला. माधुरीने डिव्हाइन चाइल्ड हायस्कूल शाळेमध्ये आपले प्राथमिक शिक्षण घेतले. मुंबई विद्यापीठात प्रवेश घेतल्यावर सूक्ष्मजीवतज्ज्ञ होण्याचा तिचा मानस होता. ती तरबेज कथक नृत्यांगना आहे. तिने सुमारे ८ वर्षे नृत्याचे शिक्षण घेतले आहे.

माधुरी ९० च्या दशकातील सगळ्यात टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. असे म्हटले जाते, की जेव्हा माधुरीने लग्न केले, तेव्हा तिचे करीयर एकदम उंचीवर होते. परंतु, ती डॉक्टर श्रीराम नेने यांच्या प्रेमात इतकी वेडी झाली होती, की तिने आपल्या करियरकडे पाठ फिरवून डॉक्टर श्रीराम नेने यांच्याशी लग्न केले. बातम्यांनुसार, असे समजते आहे, की माधुरी आणि डॉक्टर श्रीराम नेने यांची पहिली भेट योगायोगाने त्यांच्या भावाच्या पार्टीत लांस एंजेलिस मध्ये झाली होती.

माधुरीने एका मुलाखतीत सांगितले की, जेव्हा ते दोघे पहिल्यांदा भेटले, तेव्हा डॉक्टर नेने यांना माहीत नव्हते की त्या एक अभिनेत्री आहेत. त्या हिन्दी फिल्म्स मध्ये काम करतात. माधुरीने पुढे सांगितले, की पहिल्या भेटीत डॉक्टर नेने यांनी तिला विचारले, की तुम्ही माझ्याबरोबर डोंगरावर बाइक राईडिंगसाठी याल का? माधुरी म्हणाली, चला ठीक आहे, बाइक पण आहे, आणि डोंगर पण आहे. परंतु, जेव्हा ते दोघे डोंगरावर पोहोचले, तेव्हा तिला या गोष्टीची जाणीव झाली, की हे खूप कठीण आहे.

माधुरी म्हणते, थोड्या वेळाने, मी डॉक्टर नेने यांना सांगितले, की हे मी नाही करू शकत. तेव्हा डॉक्टर नेने म्हणाले, तुम्हाला भीती वाटते आहे का? तुम्हाला सायकल चालवता येत नाही का? तेव्हा माधुरी म्हणाली, हे खूप कठीण आहे, मी नाही करू शकणार. श्रीराम नेने यांच्याबरोबर लग्नाच्या बाबतीत माधुरी म्हणते, की आम्ही दोघेही प्रेमात होतो. लग्न कधी न कधीतरी करायचे होतेच, मग आजच का नाही. त्याप्रमाणे, १७ ऑक्टोबर, १९९९ मध्ये माधुरी व डॉक्टर नेने एकमेकांचे जीवनसाथी झाले.

माधुरी दीक्षित ही हिंदी चित्रपटसृष्टीतील मराठी अभिनेत्री आहे. माधुरीने १९८० च्या दशकाची शेवटची काही वर्षे आणि १९९० च्या दशकात हिंदी चित्रपटांतील एक नावाजलेली अभिनेत्री आणि नृत्यांगना म्हणून आपले स्थान पक्के केले. व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी ठरलेल्या बऱ्याच चित्रपटांत तिने काम केले व आपल्या उत्कृष्ट अभिनयाची पावती मिळवली. त्यांत तिच्या अभिनयाची व नृत्यकौशल्याची खूप वाहवा झाली. सन २००८ मध्ये भारत सरकारतर्फे तिला भारताचा चौथा महत्त्वाचा नागरी सन्मान पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

डॉ. श्रीराम माधव नेने यांच्याशी माधुरी विवाहबद्ध झाली. डॉ. नेने हे हृदयविकार तज्ज्ञ आहेत. जवळ जवळ १२ वर्षे अमेरिकेमध्ये राहिल्यानंतर माधुरी आपल्या कुटुंबासमवेत ऑक्टोबर २०११मध्ये मुंबई मध्ये परत आली.

“हम आप के है कौन” या चित्रपटाने तर त्या वर्षी विक्रमी उत्पन्न कमावले आणि हिंदी चित्रपटसृष्टीच्या तत्कालीन इतिहासात सर्वाधिक कमाई करण्याचा उच्चांक गाठला. या चित्रपटाने भारतात ६५ कोटीं रुपयांहून अधिक, तर परदेशांत १५ कोटी रुपयांची कमाई केली होती.

या चित्रपटातील अभिनयाने तिला तिचा तिसरा फिल्मफेअर पुरस्कार मिळवून दिला. तसेच त्याच वर्षी आलेल्या “अंजाम” या सिनेमातील तिच्या उत्तम भूमिकेसाठीही तिला पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. “अंजाम” चित्रपटामधील अभिनयाबद्दल समीक्षकांकडून तिला प्रशंसा लाभली.

Leave a Reply

Your email address will not be published.