नमस्कार मित्रांनो, बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की लिंबाचं झाड याला महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी लिंबुनी अस म्हणतात. तर अस हे लिंबाचं झाड वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरासमोर आपल्या अंगणात असायला हवं का? हे शुभ आहे की अशुभ आहे. मित्रांनो बऱ्याच वर्षीपूर्वी असा गैरसमज पसरला होता की लिंबाचं झाड हे घरासमोर नसावं…हे लिंबाचं झाड निगेटिव्ह एनर्जी निर्माण करतात, निगेटिव्ह एनर्जी पसरवत असा लोकांचा गैरसमज होता.
मात्र मित्रांनो वास्तू शास्त्र अस म्हणत की लिंबाचं झाड हे शुभ असत. परंतु झाड विशिष्ठ दिशेला असेल तर…जर हे लिंबाचं झाड अयोग्य ठिकाणी असेल तर यांपासून घरात मोठमोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात. मित्रांनो वास्तुशास्त्राने दोन नियम सांगितलेले आहेत लिंबाचं झाडाबद्धल..पहिली गोष्ट आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारा समोर म्हणजेच आपल्या घरचा मुख्य दरवाजा आहे त्याच्या समोर हे लिंबाचं झाड नसावं.
दुसरी गोष्ट आपल्या अंगणाच्या मध्य भागी सुद्धा हे लिंबाचं झाड नसावं. कारण अश्या ठिकाणी असलेलं झाड हे आपल्या घरात मोठ्या प्रमाणात निगेटिव्ह एनर्जी निर्माण करत असत. निगेटिव्ह एनर्जी घरात प्रवेश करते. यामुळे घरात समस्या निर्माण होतात. मग यावर्ती उपाय काय? तर या झाड भोवती तुळशीची काही झाडे लावा. तुम्हाला माहीत असेल की हिंदुशास्त्रामध्ये तुळशीचे फार महत्व आहे.
वास्तुशास्त्र सुद्धा मानत की ज्या ठिकणी तुळस असते त्या ठिकाणी निगेटिव्ह एनर्जी काम करत नाही. आणि म्हणून तुम्ही अश्या लिंबाच्या झाडा भोवती जर तुळशीची रोपे लावली तर मित्रांनो या लिंबाच्या झाडापासून होणारे परीणाम आहेत जो नकारात्मक प्रभाव आहे तो खूप मोठ्या प्रमाणात कमी होतो.
मित्रांनो अनेक जणांना माहिती नसतं की तुमच्या दारात जे लिंबाचं झाड आहे ते तुम्हाला अनेक फायदे पोहचवू शकत…. उदा. बऱ्याच वेळी जी लहान मुलं असतात त्यांना नजर लागते, काही जणांना रात्री वाईट स्वप्न पडतात. तर अश्या वेळी एक हिरव्या रंगाचा लिंबू घ्या. आणि झोपतेवेळी तो उशीखाली ठेऊन झोपा तुम्हाला वाईट स्वप्न पडणार नाहीत. तर खूप सारे फायदे आहेत या लिंबाचे..
अगदी प्राचीन काळापासून हे उपाय आपण करत आलेलो आहोत. ज्यांच्या घरात वारंवार बाधा होतात त्यांनी हे झाड अवश्य लावा.
मग आता प्रश्न असा पडतो की लिंबाचं झाड कोठे असावे? तर वास्तुशास्त्रानुसार आपल्या घराच्या कोणत्याही कोपऱ्यात मात्र मुख्य प्रवेशद्वार समोर येणार नाही तर हा भाग सोडला तर तुम्ही हे अंगणात कोठेही लावू शकता.
मित्रांनो महत्वाची गोष्ट याचे आरोग्य दृष्टीने खूप फायदे आहेत आज काल प्रत्येक जण रोगप्रतिकारक शक्ती वाढवत आहे. आणि अश्या वेळी ज्याच्या शरीरात विटामिन C असत त्याच्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि म्हणून आपल्या दैनंदिन आहारामध्ये आपण लिंबूचा वापर अवश्य करा. जेणे करून विटामिन C चा पुरवठा आपल्या शरीरात होईल. परिणामी अनेक आजारांपासून आपले रक्षण होईल.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.