नमस्कार मित्रांनो, पांढरे शुभ्र आणि एक ओळीत बसलेले जर दात असतील तर दिसायला ही अतिशय सुंदर दिसतात आणि तुमच्या सोंदर्यामध्ये देखील वाढ होते. बोलताना पहिलं लक्ष हे दातांकडे जात आणि तुमचे दात जर रंगीत असतील खराब असतील तर तुमचं जे इम्प्रेशन आहे ते पूर्णपणे निघून जात.
गुटखा, मावा खाण्याने किंवा दातांची योग्य स्वच्छता न राखल्यामुळे दातांचा रंग बदलू लागतो आणि हळूहळू दात काळे पडू लागतात. त्यामुळे अनेकदा लोकांशी संवाद साधणे, हसणे कठीण होते. त्यात भर म्हणजे दातांवर पडलेले डाग इतके जिद्दी असतात की, ते सहज निघत नाहीत. त्यामुळे अनेकदा थट्टेला बळी पडावे लागते. पण तुम्हाला माहित आहे का? यावर काही घरगुती उपाय आहेत. ज्यामुळे हे डाग तुम्ही अगदी सहज काढू शकता. जाणून घेऊया हे उपाय…
दातांचा जो पिवळेपणा आहे जे किडलेले दात आहेत किव्हा तंबाकू, गुटका, मावा यामुळे जर तुमचे दात रंगलेले आहेत तर हे जर पुन्हा चांगले करायचे असतील पांढरे करायचे असतील तर आम्ही एक साधा सरळ उपाय घेऊन आलेलो आहोत ज्यामुळे तुमचे दात मोत्यासारखे होतील. चला तर पाहुयात हा उपाय…
यासाठी आपल्याला तीन गोष्टी लागतील एक म्हणजे हळद लागते, हळद ही सर्वांच्या घरात सहज उपलब्ध असते. दुसरी गोष्ट याच्यासाठी आपल्याला लागते तुरटी. तुरटी दातांवरचे जे काळे डाग आहेत ते काढण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे.आणि तिसरी जी गोष्ट आपल्याला लागते ती म्हणजे लिंबाची काडी..तुम्हा सर्वांना लिंबाचे गुणधर्म तर माहितच असतील…पूर्वीचे लोक दात घासण्यासाठी लिंबाच्या काडीचा उपयोग करत असत.
लिंबाच्या काडी ने दात घासले की ते हिरडीसाठी चांगले असते. ह्या तीन गोष्टीचां उपयोग करून दातावर कितीही पर्मनंट डाग असतील तर ते पूर्णपणे निघून जातात. अतिशय उपयुक्त असा हा उपाय आहे .पहिल्याच दिवशी तुम्हाला 25 टक्के फरक दिसेल..
तर आपल्याला काय करायचे आहे सकाळी दात घासताना आपल्याला थोड्या प्रमाणात हळद घ्यायची आहे. आणि तेवढ्याच प्रमाणात तुरटीची पूड घ्यायची आहे.
ही जी लिंबाची काडी आहे त्याला दाताने चावून ब्रश सारखा आकार द्यायचा आहे. हळद आणि तुरटी यांना एकत्रित करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचे दात जे पिवळे झालेले आहेत काळे पडलेले आहेत तिथे तुम्हाला लिंबूच्या काडीने ते दात घासायचे आहेत. याचा कोणताही साईड इफेक्ट नाही. याने कीड सुद्धा मरते.
दातांवर जे किडीमुळे पडलेले डाग आहेत ते सुद्धा याने हळू हळू निघून जातात. आणि दात पहिल्यासारखे पांढरे शुभ्र होतात. तर अतिशय सोपा आणि सरळ करता येईल असा हा उपाय आहे. तुम्ही करून पहा दातावर एकही डाग राहणार नाही. एक दिवस करून पहा तुम्हाला नक्की फरक पडलेला दिसून येईल.
नोट: जर तुम्हाला आमच्याद्वारे दिलेली माहिती उत्तम वाटली, तर खाली दिलेल्या कमेन्ट बॉक्समध्ये तुम्ही कमेन्ट करू शकता. ही पोस्ट आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. या प्रकारे आम्ही नवीन माहिती लेखाच्या माध्यमातून तुमच्यासाठी घेऊन येऊ. धन्यवाद!