देवघरात या चुका करू नका देवपूजेचे फळ मिळणार नाही….

प्रत्येक घरात एक मंदिर असणे आवश्यक आहे, जे तुमच्या घरात शुभ ऊर्जेची निर्मिती व संचार करते. घरात मंदिर किंवा देवघर असल्यामुळे सर्व प्रकारच्या अडचणी स्वतःच दूर होतात. विशेषत: आरोग्य आणि मनाच्या समस्यांचे निवारण त्वरित होते. घरात मंदिर असल्यामुळे आर्थिक भरभराट होत राहते. घरात देवघर असल्यामुळे घरातील लोकांचे परस्पर संबंध अतूट राहतात.

एखाद्या मंदिराचा किंवा देवघराचा पुरेपूर फायदा तेव्हाच होऊ शकतो, जेव्हा त्याची स्थापना नियमांनुसार केली गेली असेल. यासाठी मंदिर किंवा देवघर योग्य पद्धतीने स्थापन केले गेले पाहिजे, तसेच देवतांची स्थापना करताना नियमांचे पालन केले गेले पाहिजे आणि मंदिर किंवा देवघर हे जागृत ठेवले पाहिजे.

मंदिर किंवा देवघर स्थापन करताना या गोष्टी लक्षात ठेवा : सामान्यतः देवघर किंवा मंदिर हे घराच्या ईशान्य दिशेकडे असावे. जर आपण ते ईशान्य कोपर्‍यात नाही स्थापन करू शकलो, तर किमान पूर्व दिशेचा वापर करून तेथे स्थापन करा. आपण फ्लॅटमध्ये असाल तर फक्त सूर्यप्रकाशाची काळजी घ्या. पूजा करण्याचे स्थान निश्चित असले पाहिजे आणि ते पुन्हा पुन्हा बदलू नका. पूजास्थळाचा रंग हलका पिवळा किंवा पांढरा ठेवा, गडद रंग शक्यतो टाळा. त्रिकोणी किंवा घुमट असलेले देवघर पूजास्थानी न ठेवता, फक्त एक लहान असे पूजेसाठी स्थान बनवा.

मंदिरात देवी-देवतांच्या स्थापनाचे नियम- मंदिराचा आकार ठेवण्याऐवजी पूजेचे स्थान बनवा. या ठिकाणी देवी-देवतांच्या मूर्तींची किंवा प्रतिमांची गर्दी करू नका. ज्या देवी किंवा देवतेची आपण प्रामुख्याने पूजा करतो, त्या देवाची प्रतिमा किंवा मुर्ती यांची स्थापना करा. इतर देवी-देवतांना शेजारी स्थापित केले जाऊ शकते. जर मूर्तिची स्थापना करायची असेल, तर चित्र कितीही मोठे असले, तरी मूर्ति १२ बोटाच्यापेक्षा जास्त उंच नसावी. पूजेच्या ठिकाणी शंख, गोमती चक्र आणि भांड्यात पाणी भरून जरूर ठेवा.

मंदिर किंवा देवघर जागृत कसे करावे- दोन्ही वेळेला पूजेची एकच वेळ ठरवण्याचा नियम करावा. संध्याकाळच्या पूजेस, दिवा जरूर लावावा, देवघराच्या मध्यभागी दिवा ठेवा. पूजेच्या आधी थोडे कीर्तन, जप किंवा मंत्रोच्चार केल्यामुळे संपूर्ण घर सकारात्मक उर्जेने भरून जाते. देवघरात सुकलेली फुले ठेवू नयेत. यामुळे अस्वच्छता आणि वास्तूदोष वाढतात. यामुळे सकाळी अर्पण केलेली फुले रात्री काढून टाकावीत.

मंदिर नेहमीच स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवा आणि तेथे तांब्यामध्ये पाणी भरून ठेवा. तुम्ही कोणतीही पूजा करीत असाल, जर तुम्हाला गुरु मंत्र मिळाला नसेल तर गायत्री मंत्राचा जप जरूर करावा. पूजेत अर्पण केलेले पाणी नंतर प्रसाद म्हणून ग्रहण करावे.

देवघरात मृत व्यक्तीचे फोटो लावू नयेत. मृत व्यक्तीचा फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा उत्तम राहते. देवघरात देवासोबत असे फोटो लावल्याने दुर्भाग्य वाढू शकते. देवघरात खंडित मूर्ती ठेवू नयेत. तुमच्या घरामध्ये देवाची एखादी खंडित मूर्ती असल्यास ती लगेच घरातून काढून टाका. खंडित मूर्तीची पूजा केल्यास पूर्ण फळ प्राप्त होत नाही.

पूजास्थळावर कधीही केर कचरा किंवा घाण ठेवू नका, ते दररोज स्वच्छ करा. पूजास्थळांवर पूर्वजांची छायाचित्रे ठेवू नका. शनिदेवांचे चित्र किंवा त्यांची मूर्तिसुद्धा ठेवू नका. शक्य झाले तर, पूजास्थळावर अगरबत्ती लावू नये. मंदिराचा किंवा देवघराचा दरवाजा बंद ठेवू नये. पूजास्थळाजवळ सामानाची खोली किंवा स्वयंपाकघर बनवू नका.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.