उन्हाळाचा ऋतू येताच सगळयात जास्त समस्या निर्माण होते ,ती म्हणजे डासांची समस्या होय. उन्हाळयात डास एवढे जास्त असतात कि, ते आपल्याला खुप त्रास देतात. डासांमुळे उन्हाळाच्या ऋतूत डेंगू नावाचा घातक आजार होत असतो .अनेक सारे लोक डास मारण्यासाठी बाजारात उपलब्ध असणारे उत्पादन वापरत असतात परंतु त्याचा काहीही उपयोग होत नाही म्हणून आज आम्ही तुम्हाला या लेखामध्ये डासांना मारण्यासाठी असे काही उपाय सांगणार आहोत.
ज्यामुळे तुमचे डासांपासून संरक्षण होईल. आपल्या देशात असे अनेक औषधी वनस्पती आहेत ज्यांचा वापर करून आपण अनेक समस्यांना दूर करू शकतो. आज आम्ही तुम्हाला अशा पानांबद्दल तुम्हाला सांगणार आहोत ज्यामुळे तुमची या संबंधित तक्रार लवकर दूर होईल . चला तर मग जाणून घेऊया त्याविषयी….
तेजपत्ता : तेजपत्ता मधुमेह अल्झायमर्स सर्दी-खोकला सांधेदुखी, रक्तपित्त, रक्तस्त्राव, दातांची स्वच्छता , सर्दी सारख्या अनेक रोगांमध्ये उपयोगी पडते. नेहमी हिरवा राहणारा वृक्ष असून याची पाने तमालवृक्ष . या पानाना तमालपत्र किंवा तेज पत्ता या नावाने ओळखले जाते. तेजपत्ता मसाल्याच्या स्वरूपामध्ये अनेकदा आपल्याला पाहायला मिळतो. हे हिमालय, मनिपुर ,सिक्किम आणि अरुणाचल प्रदेश मध्ये उगवतात.
तमालपत्र झाडाची पाने तोडून ऊनामध्ये त्यांना स्वतःहून सुकवून दुकानांमध्ये विकली जातात . तेजपत्ता मध्ये दर्द नाशक एंटीऑक्सीडेंट गुण उपलब्ध असतात. तेज पत्ता मधुर ,काही तीक्ष्ण ,उष्ण ,चिकना असे असतात. वात नाशक कफनाशक आणि पचनास योग्य असते. आयुर्वेदामध्ये अनेक गंभीर आजारावर तेजपत्ता गुणकारी ठरले आहे.
या पानाला जाळल्यास पुन्हा कधीच मार्टिन जळवण्याची वेळ येणार नाही.. तेजपत्ता आपल्या देशामध्ये प्रत्येक घराघरांमध्ये सहज उपलब्ध होत असतो. घरातील डासांना मारण्यासाठी सर्वात आधी चार तेजपत्ता घ्या ,यांना जळवून घरातील चार कोपऱ्यांमध्ये सोडा आणि पंधरा मिनिटासाठी घरातील सर्व खिडक्या आणि दरवाजे बंद करा. पंधरा मिनिटानंतर तेव्हा तुम्ही घरामध्ये याल तेव्हा तुम्हाला घरामध्ये डास मेलेले दिसतील. या पानांना जाळल्या नंतर पुन्हा कधी तुमच्या घरांमध्ये डास दिसणार नाही.
झोपण्याआधी रूम मध्ये फक्त एक तेज पत्ता पंधरा मिनिटासाठी जाळा. यामुळे तुम्हाला जो फायदा होईल त्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. रात्री चांगली झोप आपल्या शरीरासाठी आवश्यक असते . तुम्हाला कोणत्या प्रकारचा तणाव नसावा आणि आपले मन शांत रहावे याकरिता शांत झोप लागणे सुद्धा गरजेचे आहे परंतु हे अनेक वेळा शक्य होत नाही.
दिवसभर भलेही तुम्ही कार्यालयामध्ये असो कॉलेज शाळा किंवा घरातील अनेक कामांमध्ये अडकलेले असतात, यामुळे ताण तणाव निर्माण होऊन जातो. या तणावामुळे तुम्हाला तुम्हाला रात्री शांत झोप लागत नाही, याच कारणामुळे अनेक शारीरिक आणि मानसिक समस्या निर्माण होतात. त्याचे विपरीत परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ लागतात. जर तुम्ही छोटासा प्रयत्न केला तर तुमचा तणाव काही मिनिटातच दूर होईल. यासाठी तुम्हाला जास्त काही करण्याची आवश्यकता नाही त्यासाठी तुमच्याकडे फक्त एक तेज पत्ता हवा आहे.
तेजपत्ता प्रत्येक स्वयंपाक घरामध्येसहजच उपलब्ध होतो. या पत्त्याच्या सहाय्याने पाच मिनिटांमध्ये तुमचा संपूर्ण तणाव नष्ट होऊन जाईल . एका रशियन वैज्ञानिक ने यावर अभ्यास केलेला आहे आणि या अभ्यास अंतर्गत असे निदर्शनास आले की ,तेज पत्ता आपल्या तणावाला दूर करू शकतो म्हणूनच काय तर अनेक अरोमा थेरपीमध्ये तेजपत्ता चा वापर केला जातो ,याशिवाय तेजपत्ता त्वचेचे आजार आणि श्वसन संदर्भातले आजार यावर उपचार म्हणून सुद्धा वापरला जातो.
कसा करावा उपयोग
एकच तेजपत्ता घ्या आणि त्या पानाला एका वाटीमध्ये जाळा . आता एका रूम मध्ये ही वाटी ठेवून पंधरा मिनिटं घरातील खिडक्या दारे बंद ठेवा . यामुळे तेज पत्ताचा सुगंध संपूर्ण घरभर पसरेल. हा सुगंध तुम्हाला सुखदायक देणारा अनुभव ठरेल यामुळे काही काळ तुम्ही शांत होऊन घरामध्ये बसा आणि तुम्हाला तुमचे मन या सुगंधामुळे शांत होत आहे अशी जाणीव होईल आणि तुम्हाला चांगला अनुभव मिळेल.